LinkedIn वरील 'या' चिमुकल्याचं अकाऊंट पाहिलत का? नेटवर्कच आहे नेट वर्थ! (फोटो सौजन्य - LinkedIn )
तुम्हाला आठवतं का तुम्ही LinkedIn वर तुमचं अकाऊंट कधी तयार केलं होतं? पूर्वी कॉलेज संपलं की त्यानंतर लोकं LinkedIn वर अकाऊंट तयार करत होते. पण सध्या नोकरी मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्ट्रगल करावं लागत आहे. त्यामुळे कॉलेज सुरु असतानातच लोकं LinkedIn वर त्यांचं अकाऊंट ओपन करतात. नोकरीचं टेशन इतक प्रचंड वाढलं आहे की, आता चक्क एका 2 वर्षाच्या मुलाचं LinkedIn वर अकाऊंट पाहायला मिळत आहे. वाचून थोडं आश्चर्च वाटेल पण होय हे खरं आहे. जेथे मोठी माणसं नोकरी मिळण्यासाठी स्ट्रगल करत आहेत, त्याच स्पर्धेत आता हा चिमुकला सुध्दा उतरणार का?
हेदेखील वाचा- Airtel तबब्ल 10 वर्षांनंतर बंद करणार विंक म्युझिक ॲप! सर्व कर्मचारी Airtel इकोसिस्टममध्ये होणार सहभागी
जर तुम्हाला विचारले की तुम्ही पहिल्यांदा LinkedIn वर कधी आलात, तर बऱ्याच लोकांचे उत्तर वेगळे असेल. पण कोणी तुम्हाला सांगिलतं की, मी 2 वर्षाचा असल्यापासून LinkedIn आलो आहे, तर? आता हे घडले आहे. LinkedIn वर एका व्यक्तीने आपल्या 2 वर्षाच्या मुलाचं अकाऊंट तयार केलं आहे. या अकाऊंटवर LinkedIn युजर्सच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. LinkedIn या चिमुकल्याच्या अकाऊंटची प्रचंड चर्चा आहे. टायगर चौहान असं या 2 वर्षांच्या चिमुकल्याचं नाव आहे.
टायगरच्या वडीलांनी LinkedIn वर त्याचं अकाऊंट तयार केलं आहे. त्याने त्याच्या प्रोफाईलमध्ये लिहीलं आहे की, एक मूल जगात आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. तर अबाऊट सेक्शनमध्ये लिहीलं आहे की, मी अजूनही लहान आहे, मी आज दोन वर्षांचा झालो (26/08/24). माझ्या वडिलांचे मित्र नेहमी म्हणतात की नेटवर्कच नेटवर्थ आहे. म्हणून मी एक नेटवर्क तयार करण्यासाठी येथे आहे जे मला माझ्या करिअरमध्ये मदत करेल.
हेदेखील वाचा- टेलिग्राम बंद झालं तर होईल मोठं नुकसान? युजर्सना मिळणार नाहीत ‘हे’ फीचर्स; WhatsApp पेक्षा टेलिग्रामला दिली जाते अधिक पसंती
या प्रोफाईलवर काही पोस्ट देखील करण्यात आल्या आहेत. त्याच्या पहिल्या पोस्टमध्ये त्याने सांगितले आहे की, हा चिमुकला एक नेटवर्क तयार करण्यासाठी LinkedIn वर आला आहे, जे त्याला चांगल्या प्री-स्कूलमध्ये जाण्यासाठी मदत करेल. त्याच्या प्रोफाईल फोटोमध्ये एक गोंडस फोटो देखील अपलोड करण्यात आला आहे. टायगर चौहानचं LinkedIn वरील अकाऊंट सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
LinkedIn वर लहान मुलाचे अकाऊंट तयार करणे हा इंटरनेट युजर्ससाठी चर्चेचा विषय बनला आहे. यावर युजर्सकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘जेव्हा तुम्हाला वयाच्या 20 व्या वर्षी 20 वर्षांचा अनुभव दाखवावा लागतो, तेव्हा ही पद्धत चांगली आहे. त्याच वेळी, दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले की, तुमचे नेटवर्किंग डेव्हलपमेंट सुरू होते जेव्हा तुम्हाला चालणे किंवा कसे बोलावे हे देखील माहित नसतं. नोकरीचं टेंशन इतकं वाढलं आहे की, आता चक्क एक दोन वर्षांचा मुलगा या स्पर्धेत उतरला आहे.