फोटो सौजन्य - Samsung
Samsung सिक्स्थ-जनरेशन फोल्डेबल स्मार्टफोन्स आणि इकोसिस्टम प्रोडक्ट्समधील Samsung Galaxy Z Fold6, Z Flip6, Watch Ultra, Watch7 आणि Buds3 च्या विक्रिला सुरुवात झाली आहे. धमाकेदार ऑफर्ससह तुम्ही हे डिव्हाइस खरेदी करू शकता. तुम्ही Samsung च्या अधिकृत वेबसाईट किंवा ई कॉमर्स वेबसाईट Amazon आणि Flipkart वरून Samsung च्या या प्रोडक्ट्सची खरेदी करू शकता. Samsung Galaxy Z Fold6 आणि Z Flip6 ही कंपनीची आतापर्यंतची सर्वात यशस्वी Z सिरीज ठरली आहे. येथे पहिल्या 24 तासांमध्ये प्री-ऑर्डर्समध्ये मागील जनरेशन फोल्डेबल्सच्या तुलनेत 40 टक्क्यांची वाढ झाली आहे.
हेदेखील वाचा- Mobile AI मुळे आपली जगण्याची पध्दत बदलणार का? Samsung ने केला मोठा खुलासा
Samsung Galaxy Z Fold6 आणि Z Flip6 आतापर्यंतचे सर्वात स्लिम व वजनाने हलके गॅलॅक्सी झेड सिरीज डिवाईसेस आहेत. यामध्ये परिपूर्ण सममितीय डिझाइन आणि स्ट्रेट एजेस आहे. Samsung Galaxy Z सिरीज सुधारित आर्मर अॅल्युमिनिअम आणि कॉर्निंग गोरिला ग्लास व्हिक्टस 2 सह सुसज्ज आहे, ज्यामुळे ही आतापर्यंतची सर्वात टिकाऊ Galaxy Z सिरीज आहे. Samsung Galaxy Z Fold6 आणि Z Flip6 मध्ये सर्वात प्रगत स्नॅपड्रॅगन मोबाइल प्रोसेसर 8 Gen 3 आहे. यामध्ये सीपीयू, जीपीयू आणि एनपीयू कार्यक्षमता आहे. Samsung Galaxy Z Fold6 आणि Z Flip6 ला कंपनीचे डिफेन्स-ग्रेड सॅमसंग नॉक्सचे संरक्षण देण्यात आले आहे. हे मल्टी-लेयर सिक्युरिटी प्लॅटफॉर्म आहे, जे महत्त्वपूर्ण माहितीचे संरक्षण करते.
हेदेखील वाचा- Samsung या दिवशी लाँच करणार Galaxy Ring! जाणून घ्या खास फीचर्स
Samsung Galaxy Z Flip6 ची किंमत 109999 रूपयांपासून सुरू होते आणि हा फोन ब्ल्यू, मिंट व सिल्व्हर शॅडो या तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे. ग्राहक जवळपास 24 महिन्यांसाठी नो-कॉस्ट ईएमआयसह फक्त 4250 रूपयांमध्ये Samsung Galaxy Z Flip6 खरेदी करू शकतात. तर Samsung Galaxy Z Fold6 ची किंमत 164999 रूपयांपासून सुरू होते आणि हा फोन सिल्व्हर शॅडो, नेव्ही व पिंक या तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे. ग्राहक जवळपास 24 महिन्यांसाठी नो-कॉस्ट ईएमआयसह फक्त 6542 रूपयांमध्ये Galaxy Z Flip6 खरेदी करू शकतात. Samsung Galaxy Z Fold6 आणि Z Flip6 खरेदी करणाऱ्या ग्राहकांना Galaxy Z अशुअरन्स मिळेल, जेथे त्यांना फक्त 2999 रूपयांमध्ये इंडस्ट्री-फर्स्ट दोन स्क्रिन/पार्ट्स रिप्लेसमेंट्स मिळतील.
गॅलॅक्सी वॉच पोर्टफोलिओअंतर्गत नवीन व सर्वात शक्तिशाली डिवाईस Watch Ultra लाँच करण्यात आलं आहे. Watch Ultra अल्टिमेट इंटेलिजन्स व क्षमतांसह फिटनेस अनुभवांमध्ये वाढ करतो. तर Watch7 सह, युजर्स 100 हून अधिक वर्कआऊट्स अचूकपणे ट्रॅक करू शकता. वर्कआऊट रूटिनसाठी Watch7 बेस्ट ठरते. Watch7 मध्ये झोपेच्या विश्लेषणासाठी नवीन प्रगत Galaxy AI अल्गोदिरम आहे, जेथे युजर्सना इलेक्ट्रोकार्डियोग्राम (ईसीजी) आणि ब्लड प्रेशर (बीपी) मॉनिटरिंगसह हृदयाच्या आरोग्याबाबत सखोल माहिती मिळू शकते. Watch Ultra ची किंमत 59999 रूपये आहे आणि Watch7 ची किंमत 40 मिमी व्हेरिएण्टसाठी 29999 रूपयांपासून सुरू होते. ग्राहक त्यांच्या खरेदीवर जवळपास 24 महिन्यांच्या नो-कॉस्ट ईएमआयचा लाभ घेऊ शकतात.
यासोबतच Galaxy AI च्या फीचरसह लाँच करण्यात आलेल्या Galaxy Buds3 ची विक्री देखील सुरु झाल आहे. Galaxy Buds3 अतुलनीय साऊंडचा अनुभव देण्यासाठी डिझाइन करण्यात आलं आहे. Galaxy Buds3 नवीन कम्प्युटेशनल ओपन-टाइप डिझाइनसह येते. Galaxy Buds3 ची किंमत 14999 रूपये आहे. ग्राहक Watch Ultra, Watch7 आणि Buds3 खरेदी करताना जवळपास 18000 रूपयांच्या मल्टीबाय फायद्यांचा आनंद घेऊ शकतात.