लोकप्रिय टेक कंपनी Samsung लवकरच त्यांची पहिली स्मार्ट Galaxy Ring लाँच करणार आहे. कंपनीच्या या रिंगमध्ये तुम्हाला अनेक नवीन फीचर्स मिळणार आहेत. Galaxy Ring थेट बॅटरीशी जोडली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. कंपनी ९ वेगवेगळ्या आकारत ही रिंग लाँच करणार आहे.
फोटो सौजन्य - samsung
लोकप्रिय टेक कंपनी Samsung 10 जुलै रोजी त्यांची पहिली स्मार्ट Galaxy Ring लाँच करणार आहे. Samsung च्या या Galaxy Ring मध्ये अनेक नवीन फीचर्सचा समावेश आहे.
या रिंगमध्ये SpO2,हृदयाची गती, झोप याबद्दल माहिती मिळणार आहे. कंपनीच्या या रिंगमध्ये तुम्ही काय करता हे सर्व ट्रॅक करता येणार आहे. कंपनी ९ वेगवेगळ्या आकारत ही रिंग लाँच करणार आहे.
Samsung च्या Galaxy Ring ची किंमत 449 युरो म्हणजेच सुमारे 40,500 भारतीय रुपये आहेत. फ्रानस्मध्ये Galaxy Ring ब्लॅक, सिलव्हर आणि गोल्डन अशा तीन रंगात लाँच करण्यात येणार आहे.
Galaxy Ring थेट बॅटरीशी जोडली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. Galaxy Ring भारतासाठी पूर्णपणे नवं प्रोडक्ट आहे. कारण असे उत्पादन प्रथमच भारतात लाँच होणार आहे.
Galaxy Ring साठी कंपनी 4 लाख युनिट्स बॅटरी बनवण्याची तयारी करत आहे. युजर्सच्या फीडबॅकनंतर यामध्ये बदल करण्यात येईल, असे कंपनीने सांगितलं आहे.