Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung ने परत मागवले 10 लाखांहून अधिक इलेक्ट्रिक स्टोव्ह; 250 आगीच्या घटना, 40 लोक जखमी

Samsung ने 2013 पासून अमेरिकेत विकले गेलेले 10 लाखांहून अधिक इलेक्ट्रिक स्टोव्ह परत मागवले आहे. इलेक्ट्रिक स्टोव्हमुळे आतापर्यंत 250 आगीच्या घटना समोर आल्या आहेत. या घटनांमध्ये मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुमारे 40 लोकं गंभीर जखमी झाले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 11, 2024 | 11:36 AM
Samsung इलेक्ट्रिक स्टोव्हमुळे 250 आगीच्या घटना (फोटो सौजन्य - pinterest)

Samsung इलेक्ट्रिक स्टोव्हमुळे 250 आगीच्या घटना (फोटो सौजन्य - pinterest)

Follow Us
Close
Follow Us:

Samsung इलेक्ट्रॉनिक्स जगातील टॉप टेक कंपन्यांपैकी एक आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू जसं की, फोन, टॅबलेट, टिव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, एसी, मायक्रोव्हेव, इलेक्ट्रिक स्टोव्ह, यांसारख्या अनेक वस्तूंचा कंपनी पुरवठा करते. कंपनीच्या सुमारे सर्वच प्रोडक्ट्सचा रिव्ह्यु अतिशय चांगला असतो. या सर्व इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सची युजर्सना मोठ्या प्रमाणात मदत होते. कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सची मोठ्या प्रमाणात विक्री होते.

हेदेखील वाचा- WhatsApp वर Meta AI व्हॉईससह आले एकूण 5 नवे फीचर! युजर्सचा अनुभव पूर्णपणे बदलणार

पण आता अशातच कंपनीला एका समस्येचा सामना करावा लागत आहे. कंपनीने 2013 पासून अमेरिकेत विकले गेलेले 10 लाखांहून अधिक इलेक्ट्रिक स्टोव्ह परत मागवले आहे. या इलेक्ट्रिक स्टोव्हमुळे आतापर्यंत 250 आगीच्या घटना घडल्याचं समोर आलं आहे. आगीच्या घटनांमुळे मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुमारे 40 लोकं गंभीर जखमी झाले आहेत. तसेच या घटनांमध्ये अनेक पाळीव प्राणी मारले गेले आहेत. या सगळ्या घटना गांभीर्याने घेत आता कंपनीने अमेरिकेत विकले गेलेले 10 लाखांहून अधिक इलेक्ट्रिक स्टोव्ह परत मागवण्याचा निर्णय घेतला आहे.

दक्षिण कोरियाची सर्वात मोठी कंपनी डझनभर स्टोव्ह मॉडेल्सच्या खरेदीदारांना मोफत लॉक आणि कव्हर देणार आहे. यूएस कंझ्युमर प्रोडक्ट सेफ्टी कमिशनच्या वेबसाइटवर पोस्ट केलेल्या सूचनेनुसार, यासाठी त्यांचे फ्रंट-माउंट रेंज नॉब ‘ऑफ’ स्थितीत असणे आवश्यक आहे. Samsung देशभरात बेस्ट बाय ते कॉस्टकोपर्यंत किरकोळ विक्रेत्यांमार्फत 1,250 ते 3,050 डॉलरच्या दरम्यान स्टोव्हची विक्री करते.

हेदेखील वाचा- पासपोर्ट साईज फोटोसाठी स्टुडिओमध्ये जाण्याची चिंता मिटली! आता Blinkit करणार होम डिलीवरी

मिळालेल्या माहितीनुसार, Samsung च्या इलेक्ट्रिक स्टोव्हमुळे आतापर्यंत 250 आगीच्या घटना घडल्या आहेत. या घटनांंमध्ये 40 लोकं जखमी झाली असून अनेक पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाला आहे, तर मालमत्तेचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे आता कंपनीने 2013 पासून अमेरिकेत विकले गेलेले 10 लाखांहून अधिक इलेक्ट्रिक स्टोव्ह परत मागवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कंपनीला मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. टेक उद्योगात मोठी प्रगत करत असतानाच आता कंपनीला या समस्येचा सामना करावा लागत आहे. या सगळ्या घटना कंपनीने अतिशय गांभीर्याने घेतल्या आहेत.

याबाबत कंपनीने एक निवेदन देखील सादर केले आहे. Samsung ने एका निवेदनात उपाययोजना आणि विक्रीच्या तपशीलांची पुष्टी केली आहे. मात्र या निवेदनात आग किंवा जखमींचा कोणताही उल्लेख नाही. कंपनीशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितलं की, फ्रंट-माउंट नॉबची समस्या उद्योगव्यापी आहे आणि Samsung सुरक्षा मानकांचे निराकरण करण्यासाठी कमिशन आणि इतर प्रमुख ब्रँड्ससह काम करत आहे. कंपनी फक्त बोल्ट-ऑन फिक्सेस ऑफर करण्याची योजना आखत आहे आणि यामध्ये परतावा किंवा एक्सचेंज नाही. जगभरातील ग्राहक ब्रँड उत्पादनांच्या आठवणींशी परिचित आहेत. Samsung ने 2016 मध्ये टेक उद्योगात आतापर्यंतचे सर्वात मोठे पुनरागमन केले.

Web Title: Samsung recalled more than 10 lakh electric stove because 250 fire incidents reported

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2024 | 11:36 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.