फोटो सौजन्य - Social Media
सॅमसंग गॅलॅक्सी झेड फोल्ड७ ने भारतात दमदार एंट्री घेतली असून, निवडक बाजारपेठांमध्ये या प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोनचा साठा अवघ्या काही दिवसांत संपला आहे. भारतातील ग्राहकांकडून मिळालेल्या अपार प्रतिसादामुळे सॅमसंगने आपल्या नोएडा प्लांटमध्ये उत्पादन वाढवण्याचे पावले उचलले आहेत. अवघ्या ४८ तासांमध्ये २.१ लाखांहून अधिक प्री-ऑर्डर्स मिळवणाऱ्या झेड फोल्ड७, फ्लिप७ आणि फ्लिप७ एफई या सातव्या पिढीतील फोल्डेबल्सने भारतात मोठा ट्रेंड निर्माण केला आहे.
गॅलॅक्सी झेड फोल्ड७ सध्या सॅमसंगचा सर्वात सडपातळ व हलका फोल्डेबल स्मार्टफोन आहे. याचे वजन केवळ २१५ ग्रॅम असून, गॅलक्सी एस२५ अल्ट्रापेक्षाही हलका आहे. फोल्ड केल्यावर याची जाडी ८.९ मिमी आणि उघडल्यावर ४.२ मिमी आहे. ब्लू शॅडो, सिल्व्हर शॅडो, मिंट आणि जेट ब्लॅक अशा चार रंगांत उपलब्ध असलेला हा स्मार्टफोन प्रीमियम फिनिशसह येतो.
गॅलॅक्सी झेड फोल्ड७ मध्ये अनेक इनोव्हेटिव्ह फीचर्स आहेत. वन यूआय ८ इंटरफेसमध्ये AI आधारित मल्टीटास्किंग क्षमतांपासून सुरक्षेसाठी नवे “KEEP” एनक्रिप्टेड प्रोटेक्शनही दिले गेले आहे. गूगल जेमिनी लाइव्हसह स्क्रिन शेअरिंग आणि इमेज बेस्ड AI सल्ले यांसारख्या फिचर्स वापरकर्त्यांचा अनुभव आणखी समृद्ध करतात.
डिव्हाईसची मजबुतीदेखील लक्षणीय आहे. नवीन आर्मर फ्लेक्स हिंज, गोरिला ग्लास सिरॅमिक २, आणि अल्ट्रा थिन ग्लाससह हे डिव्हाइस अधिक टिकाऊ व हलके आहे. टायटॅनियम प्लेटिंगमुळे मजबुती वाढवण्यात आली आहे, तर २००MP वाइड अँगल कॅमेरा फोटोग्राफी अनुभवाला नवा आयाम देतो. पॉवरफुल स्नॅपड्रॅगन ८ एलाइट फॉर गॅलक्सी प्रोसेसरमुळे हे डिव्हाईस AI साठी विशेष तयार करण्यात आले आहे. एनपीयू, CPU आणि GPU मध्ये लक्षणीय वाढ झाल्यामुळे याचे परफॉर्मन्स अधिक प्रभावी आहे.
सॅमसंगचे प्रतिनिधी आणि रिटेलर्स म्हणतात की, ग्राहक प्रचंड प्रमाणात फोल्डेबल स्मार्टफोन्सकडे वळताना दिसत आहेत. यामुळे झेड फोल्ड७ ही डिव्हाईस केवळ नव्या तंत्रज्ञानाची ओळख नसून, ग्राहकांच्या पसंतीचे प्रतिक ठरत आहे.