
सणासुदीत नवीन वाहन घेण्याचा विचार करताय? फोनपे ॲपवर मिळणार कार-बाइक इन्शुरन्सचे अनेक पर्याय
बाइक विमा २,७०० रुपयांपासून, कार विमा ७,२०० रुपयांपासून
फोनपेच्या माहितीनुसार, नवीन दुचाकीचा विमा अंदाजे २,७०० रुपयांपासून, तर नवीन कारचा विमा ७,२०० रुपयांपासून उपलब्ध आहे. कंपनीने आपल्या विमा योजनांवर ९० टक्क्यांपर्यंत बचतीचा दावा केला आहे. यामध्ये कार विम्यावर ४० हजार रुपये, तर दुचाकी विम्यावर ४ हजार रुपयांपर्यंत बचत होऊ शकते. हे दर विशिष्ट वाहनांच्या उदाहरणांवर आधारित असून प्रत्यक्ष प्रीमियम वाहनाचे मॉडेल, आरटीओ क्षेत्र आणि निवडलेल्या विमा संरक्षणानुसार बदलू शकतो.
वाहनाची डिलिव्हरी मिळण्यापूर्वीच विमा निवडता येणार
फोनपेवर ग्राहकांना शोरूममधून वाहनाची डिलिव्हरी मिळण्यापूर्वीच विमा पर्याय तपासून प्रीमियम निश्चित करण्याची सुविधा आहे. वाहनाचे इनव्हॉइस मिळाल्यानंतर इंजिन आणि चेसिस क्रमांक अपडेट करून अधिकृत विमा पॉलिसी दस्तऐवज मिळवता येतात. याशिवाय चारचाकी वाहनांसाठी थर्ड पार्टी आणि ओन डॅमेज कव्हरचा समावेश असलेला ३+३ वर्षांचा मल्टी-इअर विमा पर्यायही उपलब्ध असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
चार सोप्या टप्प्यांत विमा खरेदी
फोनपे ॲपच्या माध्यमातून विमा खरेदी करण्याची प्रक्रिया सोपी आहे. ग्राहकांना पुढील चार टप्प्यांत विमा घेता येतो.
Ans: फोनपेच्या माहितीनुसार, नवीन बाइकचा विमा अंदाजे २,७०० रुपयांपासून, तर नवीन कारचा विमा ७,२०० रुपयांपासून सुरू होतो.
Ans: ग्राहकांना झिरो डेप्रिसिएशन, इंजिन प्रोटेक्ट आणि कन्झ्युमेबल्स कव्हर यांसारखे अतिरिक्त विमा संरक्षण निवडता येते.
Ans: फोनपे ॲपमध्ये New Car Insurance किंवा New Bike Insurance हा पर्याय निवडून वाहनाचे मॉडेल आणि आरटीओ लोकेशन भरावे. त्यानंतर विमा योजना निवडून पेमेंट करावे आणि इंजिन व चेसिस क्रमांक अपडेट करून पॉलिसी डाउनलोड करता येते.