फोटो सौजन्य - istock
सोशल मिडीया प्लॅटफॉर्म X त्यांच्या युजर्सचा डेटा वापरून AI ला प्रशिक्षण देत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोशल मीडिया वापरणाऱ्यांची संख्या कोटींमध्ये आहे. दररोज लोक सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या गोष्टीबद्दल पोस्ट करत असतात. याच पोस्टचा वापर करून आता AI ला प्रशिक्षण दिलं जात असल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, Elon Musk च्या मालिकीच्या असलेल्या X वर युजर्सच्या पोस्टचा वापर करून AI ला प्रशिक्षण दिलं जात आहे. याचा अर्थ तुमच्या X वरील पोस्टचा वापर AI ला प्रशिक्षण देण्यासाठी केला जात आहे.
हेदेखील वाचा- भन्नाट फीचर्स आणि उत्कृष्ट डिझाईनसह POCO Buds X1 ‘या’ दिवशी होणार लाँच!
या संपूर्ण प्रकाराबाबत X ने त्यांच्या युजर्सना आधीच माहिती दिली आहे. X च्या हेल्प पेज लेखामध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. अनेक युजर्सनी याबाबत तक्रारी देखील केल्या आहेत. काही युजर्सचे म्हणणे आहे की त्यांच्या पोस्ट त्यांच्या परवानगीशिवाय वापरल्या जात आहेत. तुम्हाला देखील जर तुमच्या पोस्ट AI प्रशिक्षणासाठी वापरल्या जात आहेत, याबाबत आक्षेप असल्यास तुम्ही तुमच्या अकाऊंटमध्ये छोटीशी सेटिंग करून तुम्ही AI प्रशिक्षणासाठी तुमचा डेटा वापरणे थांबवू शकतात.
हेदेखील वाचा- AI Tool बनतील तुमचे पर्सनल आणि प्रोफेशनल Assistant! जाणून घ्या सविस्तर
X ने देखील हे स्पष्ट केलं आहे. X ने म्हटलं आहे की, युजर्सच्या सार्वजनिक ट्विट आणि त्यांच्या संभाषणांचा डेटा X वर AI चॅटबॉटला प्रशिक्षण देण्यासाठी वापरला जातो. जर युजर्सची इच्छा असेल तर ते Grok AI च्या प्रशिक्षणासाठी त्यांचा डेटा वापरणे थांबवू शकतात. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या पोस्टवर नियंत्रण मिळवता येईल.