फोटो सौजन्य - pinterest
जगभरातील AI ची वाढती क्रेझ बघता अनेक कंपन्यांनी त्यांचे AI Assistant लाँच केले आहेत. OpenAI कंपनीने जगातील पहिलं AI chatbot माॉडेल chatGPT लाँच केलं. यानंतर सर्वत्र chatGPT ची क्रेझ वाढत गेली. लोकं त्यांच्या अनेक कामांसाठी chatGPT चा वापर करू लागली. नोकरी, शाळा, कॉलेज, व्यवयास, या सर्वच ठिकाणी chatGPT चा वापर वाढू लागला. AI ची वाढती क्रेझ पाहता इतर कंपन्यांनी देखील त्यांचे AI Assistant लाँच केले. जसे की Google ने AI Assistant जेमिनि लाँच केलं. यानंतर मायक्रोसॉफ्टने AI मॉडेल Copilot, भारतीय कंपनी Ola ने AI मॉडेल Krutrim, Apple ले Apple Assistant, Samsung ने Galaxy AI असिस्टंट आणि Meta ने Meta AI लाँच केलं.
हेदेखील वाचा- OpenAI करणार Google सोबत स्पर्धा! AI चॅटबॉट नंतर लाँच केलं नवीन सर्च इंजिन
कंपन्यांचे हे AI Assistant तुमच्या अनेक कामांमध्ये मदत करू शकता. पर्सनल ते प्रोफेशनल अशा प्रत्येक कामांसाठी हे AI चॅटबोट्स तुमचे Assistant बनू शकतात. यामुळे तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामात मदत होऊ शकते आणि तुमची कामं अगदी सहज शक्य होतात. ज्यामुळे तुमचा वेळ वाचतो. चला तर मग पाहूया हे AI Assistant तुम्हाला तुमच्या कामात कशा प्रकारे मदत करू शकतात.
सध्या अनेक प्रकारचे AI Tools उपलब्ध आहेत. ChatGPT पासून Meta AI पर्यंत अनेक प्रकारची AI टूल्स लोकांच्या मोबाईल फोनवर उपलब्ध आहेत. अनेक छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, माहिती शोधण्यासाठी, लोकं या AI टूल्सचा वापर करतात. विविध प्रकारच्या प्रतिमा तयार करण्यासाठीही या AI Tools चा वापर केला जातो. शाळांमध्ये मुलांना नवीन AI तंत्रज्ञानाचे शिक्षणही दिले जात आहे.
हेदेखील वाचा- दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांनो सावधान! हा AI कॅमेरा केवळ चेहरा पाहून सांगणार सत्य
Microsoft Copilot हे एक AI टूल आहे, ज्याचा वापर लोक त्यांच्या व्यावसायिक जीवनात तसेच वैयक्तिक आयुष्यात करू शकतात. Microsoft Copilot तुम्हाला एखाद्या पर्सनल Assistant प्रमाणे मदत करू शकतो. Copilot च्या मदतीने तुम्ही व्हिडिओच्या मध्यभागी कोणत्याही YouTube व्हिडिओशी संबंधित प्रश्न देखील विचारू शकता. यासोबतच व्हिडिओच्या मधोमध कोणतीही जाहिरात दिसली तर त्याची माहिती Copilot कडून घेता येईल. Microsoft च्या मते, हे AI टूल तुमच्या सोयीनुसार तुमच्या कोणत्याही ट्रिपचे नियोजन करण्यास सक्षम आहे. याशिवाय, या टूलद्वारे तुम्ही तुमच्या कल्पनेनुसार कोणतीही AI इमेज तयार करू शकता. जर आपण प्रोफेशनल लाईफबद्दल बोललो तर तुमचा पर्सनल असिस्टंट तुमच्या जागी कोणत्याही मीटिंगमध्ये सहभागी होऊ शकतो आणि तुम्हाला त्याच्याशी संबंधित सर्व माहिती देऊ शकतो.
CHAT GPT चा फुल फॉर्म CHAT जनरेटिव्ह प्रीट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर, असा आहे. हे टूल OpenAI कंपनीने तयार केले आहे. chatGPT जगातील पहिलं AI CHAT GPT माॉडेल आहे. CHAT GPT लोकांच्या प्रश्नांची उत्तरे सोप्या पद्धतीने देते. हा एक संगणक प्रोग्राम आहे आणि त्यात साठवलेल्या माहितीनुसार तो लोकांसमोर माहिती सादर करतो.
Meta AI प्रत्येक WhatsApp युजर्सच्या फोनच्या शीर्षस्थानी एक आयकॉन म्हणून उपस्थित असतो. Meta AI वरून लोक अनेक प्रकारचे प्रश्न विचारू शकतात. यासोबतच कोणत्याही घटनेशी संबंधित काल्पनिक चित्रेही Meta AI द्वारे तयार करता येतात.