जिओ सिम युजर्सची स्पॅम कॉल्स आणि मॅसेजपासून होणार सुटका! अशी आहे सोपी प्रोसेस, आत्ताच ट्राय करा
आपल्या सर्वांकडे वेगवेगळ्या ब्रँडचे स्मार्टफोन असतात. प्रत्येक स्मार्टफोनचे फिचर्स, कॅमेरा क्वालिटी आणि किंमत वेगळी असते. पण सर्व स्मार्टफोन युजर्सची एकच समस्या असते, ही समस्या म्हणजे स्पॅम कॉल्स. सतत येणाऱ्या स्पॅम कॉल्स आणि मॅसेजमुळे प्रत्येक स्मार्टफोन युजर हैराण होतो. यासाठी आता जिओ त्यांच्या युजर्सना स्पॅम कॉल्स आणि मॅसेज ब्लॉक करण्याचा पर्याय देणार आहे. जिओ युजर्स काही सोप्या स्टेप्स फॉलो करून स्पॅम कॉल्स आणि मॅसेज ब्लॉक करू शकतात.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
तूम्ही जिओ युजर्स आहात का? जर तुम्ही स्पॅम कॉल्स आणि फेक एसएमएसने कंटाळले असाल आणि स्पॅम कॉल्स आणि मॅसेजपासून मुक्त होण्याचा मार्ग शोधत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही अगदी सहज जिओ सिमसाठी स्पॅम कॉल्स आणि मॅसेजना ब्लॉक करू शकता. कसे ब्लॉक करायचे ते आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – pinterest)
स्पॅम कॉल्स आणि मॅसेजपासून स्वत:ला सुरक्षित ठेवणे हे एक मोठं आव्हान बनले आहे, सायबर स्कॅमर लोकांना फसवण्यासाठी रोबोकॉलसारखे तंत्र वापरत आहेत. म्हणून, जर तुमच्याकडे जिओ सिम असेल, तर तुम्ही खाली नमूद केलेली पद्धत वापरून अशा स्पॅम कॉल्स आणि मॅसेजना त्वरित ब्लॉक करू शकता.
MyJio ॲपद्वारे एक क्लिक करून स्पॅम कॉल आणि मॅसेज ब्लॉक करण्याचा एक सोपा मार्ग आहे. युजर्स ओटीपीसह ब्रांडकडून महत्त्वाचे मॅसेज आणि अपडेट प्राप्त करू शकतात आणि स्पॅम कॉल्स आणि मॅसेज ब्लॉक करू शकतात. तसेच तुम्हाला जाहिरात कॉल्स चालू ठेवून पार्शियल पद्धतीने स्पॅम कॉल्स आणि मॅसेज ब्लॉक करण्याचा पर्याय देखील आहे.
जिओ नेटवर्कवर स्पॅम कॉल आणि एसएमएस ब्लॉक करण्यासाठी, तुम्हाला डू नॉट डिस्टर्ब (DND) सेवेचा पर्याय इनेबल करावा लागेल. ही सेटिंग स्पॅम कॉल आणि एसएमएससह काही टेलीमार्केटिंग कॉल देखील ब्लॉक करेल.
जिओसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
युजर्स येथे ब्लॉक केल्या जाणाऱ्या कॉल आणि मॅसेजच्या कॅटेगरी निवडून देखील डू नॉट डिस्टर्ब सर्व्हिस इनेबल करू शकतात. यामध्ये बँकिंग, रिअल इस्टेट, शिक्षण, आरोग्य, पर्यटन आणि बरेच काही यासारख्या पर्यायांचा समावेश आहे.