Jio यूजर्ससाठी मुकेश अंबानीचं खास गिफ्ट! 11 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार हाय स्पीड इंटरनेट डेटा
वाढत्या रिचार्ज प्लॅनच्या किंमतीमुळे अनेक जिओ युजर्सनी त्यांचे सिम बीएसएनएलमध्ये पोर्ट केलं. युजर्सनी जिओवर प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता जिओ युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. मुकेश अंबानी यांनी जिओ युजर्ससाठी एक नवीन डेटा प्लॅन लाँच केला आहे. याची किंमत केवळ 11 रुपये असून युजर्सना या प्लॅनमध्ये हाय स्पीड इंटरनेट डेटा वापरण्याची संधी मिळणार आहे.
हेदेखील वाचा- Jiostar Coming Soon! नेटफ्लिक्स आणि प्राइम व्हिडिओच्या अडचणी वाढल्या, लवकरच लाँच होणार नाव ॲप
देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ आपल्या युजर्ससाठी अनेक नवीन प्लॅन ऑफर करते. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये ग्राहकांच्या गरजेनुसार विविध फायद्यांसह प्लॅन उपलब्ध आहेत. आता कंपनीने यूजर्ससाठी एक नवीन डेटा प्लॅन आणला आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना मर्यादित काळासाठी हाय स्पीड इंटरनेट डेटा दिला जातो. या नवीन प्लॅनची किंमत केवळ 11 रुपये आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
जिओचा हा प्रीपेड प्लॅन 11 रुपयांचा आहे, जो अधिकृत वेबसाइटवर लिस्ट करण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 1 तासासाठी हाय स्पीड इंटरनेट अनलिमिटेड डेटा दिला जातो. ज्या ग्राहकांना कमी वेळेत जास्त डेटाची गरज आहे, त्यांच्यासाठी हा जिओचा हा नवीन डेटा प्लॅन उत्तम आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना हाय स्पीडवर 10 GB डेटा मिळतो. 10 GB डेटा संपल्यानंतर स्पीड कमी होतो.
जिओचा नवा डेटा प्लॅन 11 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 1 तासाची व्हॅलिडीटी मिळणार आहे. या प्लॅनसाठी, बेस प्लॅन आधीपासून जिओ युजर्सच्या नंबरवर सक्रिय असणे आवश्यक आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 10 GB डेटा मिळतो. पण यूजर्सला हा डेटा एका तासात वापरावा लागेल.
ज्या युजर्सना काही काळासाठी अधिक डेटाची गरज आहे त्यांच्यासाठी हा प्लॅन खूप उपयुक्त ठरू शकतो. जिओचा हा प्लॅन युजर्ससाठी काही भारी फाइल्स किंवा गेम्स डाउनलोड करताना खूप उपयुक्त ठरू शकतो. जिओच्या रिचार्ज पोर्टफोलिओमध्ये अधिक डेटा प्लॅन उपलब्ध आहेत. जिओ सोबत, एअरटेल आणि इतर दूरसंचार कंपन्या देखील ग्राहकांना डेटा प्लॅन ऑफर करतात.
जिओचा 359 रुपयांचा डेटा प्लॅन
व्हॅलिडीटी – 30 दिवस
डेटा – 50 जीबी
जिओचा 289 रुपयांचा डेटा प्लॅन
व्हॅलिडीटी – 30 दिवस
डेटा – 40 जीबी
जिओचा 219 रुपयांचा डेटा प्लॅन
व्हॅलिडीटी – 30 दिवस
डेटा – 30 जीबी
हेदेखील वाचा- Jio, Airtel आणि VI च टेन्शन वाढलं! स्टारलिंकची लाँचिंग डेट जवळ; सॅटेलाइट इंटरनेट कधी उपलब्ध होणार?
जिओचा 175 रुपयांचा डेटा प्लॅन
व्हॅलिडीटी – 28 दिवस
डेटा – 10 जीबी
OTT सब्सक्रिप्शन – Sony, Zee5, Jio Cinema सह 11 ॲप्स
जिओचा 49 रुपयांचा डेटा प्लॅन
व्हॅलिडीटी – 1 दिवस
डेटा – अनलिमिटेड
जिओचा 11 रुपयांचा डेटा प्लान
व्हॅलिडीटी – 1 दिवस
डेटा – 10 GB (अनलिमिटेड डेटा 64Kbps सह)