Google Pixel 9a: कधी लाँच होणार गुगलचा नवीन स्मार्टफोन? नवीन अपडेट आलं समोर
टेक कंपनी गुगलच्या नवीन स्मार्टफोन Google Pixel 9a चे काही स्पेफिकेशन्स समोर आले आहेत. तसेच या स्मार्टफोनचे डिझाईन देखील सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. आता अलीकडेच या फोनचे काही नवीन डिझाईन समोर आले आहेत. या डिझाईवरून असा अंदाज लावला जाऊ शकतो की, Pixel 9 सीरीजमध्ये मोठ्या हॉरिजॉन्टल कॅमेरा बारऐवजी मागील कॅमेरा सेन्सरसाठी एक लहान गोलाकार आकाराचा लेआउट मिळेल. मात्र कंपनीने अधिकृतपणे अद्याप याबाबत कोणतीही माहिती शेअर केली नाही.
Most Visited Website: लोकं कोणत्या वेबसाइट्सना सर्वाधिक भेट देतात माहित आहे का? जाणून घ्या
Google Pixel 9a चे काही डिझाईन सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये फ्रंट आणि बॅक डिझाईन्स दाखवले आहेत. समोरच्या बाजूला, फोनमध्ये सेल्फी स्नॅपर, फ्लॅट एज आणि नॅरो बेजेल्ससाठी मध्यभागी पंच-होल कटआउट आहे. हा फोन बॉक्सी चेसिससह येण्याची अपेक्षा आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
मागील पॅनेलच्या डाव्या बाजूला ओवल आकाराचे मॉड्यूल आहे, ज्यामध्ये दोन कॅमेरा सेन्सर आहेत. लेआउटच्या पुढे एक एलईडी फ्लॅश आहे. मागील पॅनलमध्ये गुगल लोगोच्या जागी एक अद्वितीय पॅटर्न डिझाइन आणि वेगळा लोगो आहे. सध्या समोर आलेले डिझाईन हे प्रोटोटाइप आहे की अंतिम प्रोडक्ट आहे हे स्पष्ट झालेले नाही.
Google Pixel 9a लाँच होण्यापूर्वी अनेक स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.
डिस्प्ले: Google Pixel 9a फोनमध्ये 60-120Hz ॲडॉप्टिव्ह रिफ्रेश रेटसह 6.3-इंचाचा डिस्प्ले असल्याचे म्हटले जाते. तुलनेत, Pixel 8a मध्ये 6.1-इंच स्क्रीन आहे.
प्रोसेसर: Google Pixel 9a मध्ये Pixel 9 लाइनअप प्रमाणे Tensor G4 चिपसेट असू शकतो. हे Pixel 8a चे अपग्रेड असेल, ज्यामध्ये Tensor G3 आहे.
बॅटरी: Google Pixel 9a फोनमध्ये 5000mAh बॅटरी असण्याची शक्यता आहे, जी 18W वायर्ड आणि 7.5W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करेल.
मेमरी: Pixel 8a प्रमाणे, यात 8GB RAM आणि 256GB स्टोरेज पर्याय असू शकतात.
कॅमेरा: Pixel 9a मध्ये Pixel 9 Pro Fold प्रमाणेच 48MP सेन्सर असल्याचे सांगितलं जात आहे. Pixel 8a मध्ये 64MP मुख्य सेन्सर आहे. हँडसेटला पाणी आणि धूळ प्रतिरोधासाठी IP68 रेटिंग मिळू शकते. हे Pixel 8a मधील IP67 रेटिंगचे अपग्रेड आहे.
किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, Pixel 9a ची किंमत 499 डॉलर म्हणजेच अंदाजे 42,300 रुपये असू शकते. Pixel 8a भारतात 52,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला होता. Pixel 9a मार्च 2025 मध्ये लाँच होण्याची अपेक्षा आहे.