Jio vs Airtel vs BSNL: हे आहेत कंपन्यांचे स्वस्त प्लॅन, मिळणार 28 दिवस व्हॅलिडीटी आणि सुपरफास्ट इंटरनेट
Jio, Airtel आणि BSNL या तिन्ही टेलिकॉम कंपन्या त्यांच्या युजर्सना वेगवेगळे रिचार्ज प्लॅन ऑफर करतात. काही प्लॅनची किंमत प्रचंड असते तर काही प्लॅनची किंमत अगदी कमी असते. प्रत्येक युजर त्याच्या गरजेनुसार रिचार्ज प्लॅन खरेदी करतो. प्रत्येक प्लॅनची व्हॅलिडीटी आणि त्याचे फायदे वेगळे असतात.
BSNL धमाकेदार प्रीपेड प्लॅन, परवडणाऱ्या किंमतीत मिळणार 160 दिवसांची व्हॅलिडीटी आणि बरचं काही
आता आम्ही तुम्हाला तिन्ही कंपन्यांच्या अशा प्रीपेड रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्याची व्हॅलिडीटी 28 दिवस आहे. तिन्ही कंपन्यांच्या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडीटी जरी 28 दिवस असली तरी या रिचार्ज प्लॅनची किंमत आणि फायदे वेगळे आहेत. चला तर मग या तिन्ही कंपन्यांच्या 28 दिवसांची व्हलिडीटी असणाऱ्या रिचार्ज प्लॅनबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
एअरटेलच्या 28 दिवसांची व्हॅलिडीटी असलेल्या प्रीपेड प्लॅनची किंमत 299 रुपये आहे. एअरटेलच्या या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 1GB डेटा ऑफर केला जातो. यामध्ये ग्राहकांना दररोज 100 एसएमएसही दिले जातात. एअरटेलच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉलही दिले जातात. या प्लॅनमध्ये 100 एसएमएसच्या दैनंदिन मर्यादेनंतर, ग्राहकांकडून लोकल एसएमएससाठी 1 रुपये आणि एसटीडी एसएमएससाठी 1.5 रुपये आकारले जातात. त्याचप्रमाणे, दैनंदिन डेटा वापर मर्यादेनंतर, ग्राहकांना 64Kbps च्या वेगाने डेटा ऑफर केला जातो. एअरटेलच्या या प्लॅनमध्ये युजर्सना विंकवर मोफत हॅलो ट्यून देखील ऑफर केल्या जातात. ग्राहक दर महिन्याला एक विनामूल्य ट्यून सेट करू शकतात.
Airtel प्रमाणे, Jio देखील आपल्या युजर्सना 299 रुपयांचा 28 दिवसांचा प्रिपेड रिचार्ज प्लॅन ऑफर करते. या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 1.5GB डेटा ऑफर केला जातो. त्यामुळे, या प्लॅनमध्ये युजर्सना संपूर्ण 28 दिवस एकूण 42GB डेटा दिला जातो. या प्लॅनमध्ये युजर्सना अनलिमिटेड कॉलिंगचे फायदेही दिले जातात. याशिवाय दररोज 100 एसएमएस देखील युजर्सना दिले जातात. जिओच्या 28 दिवसांच्या 299 रुपयांच्या या प्लॅनमध्ये युजर्सना JioTV, JioCinema आणि JioCloud सबस्क्रिप्शन देखील दिले जातात. येथे या प्लॅनमध्ये, डेटा मर्यादा संपल्यानंतर, युजर्सना 64Kbps च्या वेगाने इंटरनेट डेटा ऑफर केला जातो.
Jio, Airtel, Vi आणि BSNL युजर्सनी लक्ष द्या! 1 डिसेंबरपासून बदलणार OTP चे नियम, ट्रायने दिल्या सूचना
बीएसएनएल आपल्या युजर्सना फक्त 187 रुपयांमध्ये 28 दिवसांची व्हॅलिडीटी असलेला प्रीपेड रिचार्ज प्लॅन देते. या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 1.5GB डेटा ऑफर केला जातो. डेटा मर्यादा संपल्यानंतर, युजर्सना 40Kbps च्या वेगाने इंटरनेट डेटा ऑफर केला जातो. या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 100 एसएमएस देखील दिले जातात. याव्यतिरिक्त, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग फायदे देखील प्रदान केले जातात. यामध्ये युजर्सना 28 दिवसांसाठी मोफत ट्यून देखील देण्यात आल्या आहेत.