Most Visited Website: लोकं कोणत्या वेबसाइट्सना सर्वाधिक भेट देतात माहित आहे का? जाणून घ्या
लहानपांसून मोठ्यापर्यंत सर्वचजण सोशल मिडीया अॅप्सचा वापर करतात. आपल्यातील प्रत्येकजण सोशल मिडीयासोबत प्रचंड अॅडिक्टेड आहे. काहीजण तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सोशल मिडिया अॅप्सचा वापर करतात. आपल्याकडे एखाद्या व्यक्तिचा नंबर नसला तरी देखील चालेल, पण त्या व्यक्तिचं सोशल मिडीया अकाऊंट असंल पाहिजे, असा ट्रेंडच जणू सध्या सुरु आहे. आपण प्रत्यक्षात एखाद्या व्यक्तिला भेटण्यापेक्षा सोशल मिडियावर भेटणं जास्त सोयीस्कर समजतो.
सोशल मिडीयामुळे बिघडतय तरुणांचे मानसिक आरोग्य! एक तासाचा ब्रेक खूप महत्त्वाचा
हल्ली सोशल मिडीया इतका अपडेट झाला आहे, की या ठिकाणी लग्न देखील जुळवली जातात. सोशल मिडियाचे जेवढे फायदे आहेत, त्याच्यापेक्षा अधिक त्याचे तोटे आहेत. सोशल मिडियाचा अतिवापर आपल्यासाठी संकट निर्माण करू शकतो. सोशल मिडियावरून फसणुकीच्या देखील अनेक घटना घडतात. प्रत्येक सोशल मिडिया अॅपची एक वेगळी खासियत आहे.
कोणी तुम्हाला तुमच्या कामासाठी मदत करतो, तर कोणत्या अॅपवर तुम्ही फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करू शकता. पण तुम्हाला माहिती आहे का जगातील कोणती वेबसाइट आणि ॲप्स आहेत जिथे लोक सर्वात जास्त वेळ घालवतात? येथे आम्ही तुम्हाला अशाच काही वेबसाइट्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांना सर्वाधिक भेट दिली जाते. (फोटो सौजन्य – pinterest)
जगभरात गुगलचा सर्वाधिक वापर केला जातो. तुम्हाला कोणत्याही गोष्टीची माहिती मिळवायची असेल, तर तुमच्या मनात सर्वप्रथम गुगल येते. गुगलला मासिक विजिटची संख्या 83.1 अब्ज आहे. गुगल ज्ञानाचा खजिना आहे. गुगल तुम्हाला जागातील प्रत्येक माहिती देऊ शकतो.
व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म यूट्यूबची क्रेझही कमी नाही. दर महिन्याला 29.6 अब्ज विजिट येतात. यूट्यूबची मूळ कंपनी गुगल आहे. 2006 मध्ये, गुगलने यूट्यूब खरेदी करण्यासाठी 1.65 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी मोठी रक्कम दिली होती.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या वेबसाइट्समध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. दर महिन्याला येथे वेळ घालवणारे करोडो वापरकर्ते आहेत. फेसबुकवर 12.7 अब्ज मासिक विजिट आहेत. मेटाच्या मालकीचे हे प्लॅटफॉर्म फेब्रुवारी 2004 मध्ये लाँच झाले.
सोशल मिडीयापासून सुटका मिळवण झालंय अवघड? या सोप्या टीप्स तुम्हाला मदत करतील
इंस्टाग्रामवर दर महिन्याला 5.9 अब्ज विजिट आहेत. हा प्लॅटफॉर्म 2010 मध्ये सुरू झाला.
मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या वेबसाइट्सच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. येथे दर महिन्याला 4.7 अब्ज विजिट येतात. आधी त्याचे नाव ट्विटर होते, पण मस्कने ते विकत घेतले आणि त्याचे नाव बदलले.
Simlarweb च्या डेटानुसार, WhatsApp ला दर महिन्याला 4.5 अब्ज विजिट दिल्या जातात, ज्यामुळे ते यादीतील 6 व्या क्रमांकाची वेबसाइट बनले आहे. हे एक मॅसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. येथे तुम्ही व्हिडिओ, फोटो, लोकेशन आणि कॉन्टॅक्ट नंबरसह अनेक गोष्टी शेअर करू शकता.