Moto G35: मोटोरोलाचा बजेट स्मार्टफोन लाँच, 50MP कॅमेरा आणि 5000 mAh बॅटरीने सुसज्ज
स्मार्टफोन कंपनी मोटोरोलाने त्यांचा नवीन स्मार्टफोन Moto G35 आज भारतात लाँच केला आहे. हा स्मार्टफोन बजेट सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 5000 mAh बॅटरीने कंपनीचा नवीन स्मार्टफोन Moto G35 सुसज्ज आहे. वीगन लेदर फिनिश डिझाईनसह हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन UniSOC T760 प्रोसेसरने सुसज्ज आहे.
मोटोरोलाचा हा नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy A14 5G ला टक्कर देणार असल्याचं सांगितलं जात आहे. सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा FHD प्लस डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 90 Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. डिव्हाइसमध्ये 4GB रॅमसह 128GB स्टोरेज आहे. Moto G35 स्मार्टफोनची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी आहे. यात 12 5G बँड असतील, जे अखंड कनेक्टिव्हिटीसह अधिक चांगला युजर्स अनुभव देईल. (फोटो सौजन्य – X)
मोटोरोलाने बजेट सेगमेंटमध्ये हा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. Motorola च्या Moto G35 स्मार्टफोनच्या 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 9999 रुपये ठेवली आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटशिवाय, तुम्ही हा फोन ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. 16 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता Moto G35 स्मार्टफोनची विक्री सुरु होणार आहे. कंपनीने हा फोन लीफ ग्रीन, ग्वावा रेड आणि मिडनाईट ब्लॅक अशा तीन रंगांमध्ये लाँच केला आहे.
डिस्प्ले – कंपनीच्या मते, Moto G35 हा सेगमेंटमधील सर्वात वेगवान फोन आहे. फोनमध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. यात व्हिजन बूस्टर आणि नाईट व्हिजन सारखे मोड आहेत असे म्हटले जाते. फोन 240Hz च्या टच सॅम्पलिंग रेटसह कार्य करतो. डिस्प्लेला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 चे संरक्षण आहे
प्रोसेसर – परफॉर्मंसाठी या स्मार्टफोनमध्ये Unisoc T760 चिपसेट आहे. फोन 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये 12 GB पर्यंत रॅम वाढवण्याचा पर्याय देखील आहे.
कॅमेरा – फोनच्या मागील पॅनलवर डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा आहे, तो 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो. यात सेल्फीसाठी 8MP अल्ट्रा वाइड आणि 16MP सेंसर आहे. स्मार्टफोन डॉल्बी ॲटमॉससह ड्युअल स्टीरिओ स्पीकरला सपोर्ट करतो.
बॅटरी आणि चार्जिंग – स्मार्टफोनमध्ये 5,000 mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 20W चार्जिंगला सपोर्ट करते. धूळ आणि स्प्लॅशपासून सुरक्षित ठेवण्यासाठी याला IP52 रेटिंग आहे. फोनला एक वर्षाचे ओएस अपग्रेड मिळेल. हे Android 14 सह येते आणि 15 वर अपग्रेड करण्यायोग्य आहे.