ऑनलाईन शॉपिंगच्यावेळी ऑर्डर कॅन्सल केल्यास भरावा लागणार कँसलेशन चार्ज, या प्लॅटफॉर्मने लागू केले नवीन नियम
ई-कॉमर्स पोर्टल्स देशात आल्यापासून शॉपिंगचा अनुभव पूर्णपणे बदलला आहे. बाजारात किंवा गर्दीच्या ठिकाणी जाऊन खरेदी करण्यापेक्षा लोक घरी बसून ऑनलाईन शॉपिंग करण्याला अधिक प्राधान्य देतात. दुकान किंवा शोरूममध्ये जाण्याचे टेंशन नाही. लिमिटेड ऑप्शन्स किंवा साईझची देखील चिंता नाही. तसेच ऑफर्स आणि डिस्काऊंटसह शॉपिंग करणं म्हणजे पैशांची बचत. या सर्व फायद्यांमुळे हल्ली बाजारात जाऊन शॉपिंग करण्यापेक्षा ऑनलाईन शॉपिंग केली जाते.
Tech Tips: स्मार्टफोन हॅक होण्यापूर्वी देतो हे सिग्नल, अशा प्रकारे स्वत:ला ठेवा सुरक्षित
ऑनलाईन शॉपिंगचा आणखी एक फायदा म्हणजे तुम्हाला प्रोडक्ट आवडत नसेल तर रिटर्न आणि कॅन्सल करण्याचा पर्यायही आहे. तुम्ही एखादे शर्ट ऑर्डर केले आणि तुम्हाला कलर किंवा डिझाईन आवडली नाही. तर तुम्ही ते रिर्टन करून दुसरं शर्ट ऑर्ड करू शकता किंवा तुमची ऑर्डर कॅन्सल करू शकता. आतापर्यंत तुम्ही तुमची ऑर्डर कॅन्सल केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण पैसे परत केले जात होते. मात्र तुम्ही एखादी ऑर्डर कॅन्सल केली तर तुमच्याकडून 20 रुपये कँसलेशन चार्ज आकारला जाणार आहे. ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म मिंत्रा आणि फ्लिपकार्टने हा नवीन नियन सुरु केला आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
ई-कॉमर्स पोर्टल ऑर्डर रद्द करण्यावर शुल्क आकारण्याची तयारी करत आहेत. यासाठीही ठराविक कालमर्यादा असेल, परंतु त्यानंतर निश्चित शुल्क भरावे लागेल. अहवालानुसार, फ्लिपकार्ट आणि मिंत्रा ऑर्डर रद्द केल्यावर 20 रुपये आकारू शकतात. त्यामुळे आता तुम्हाला एका ठरावीक कालावधीनंतर तुमची ऑर्डर रद्द करायची असेल तर तुम्हाला 20 रुपये भरावे लागणार आहेत.
Redmi Note 14 Series: रेडमीची नवीन सिरीज भारतात लाँच, दमदार फीचर्स मिळणार इतक्या किंमतीत
ऑर्डर रद्द करणे आणि रिटर्न करणे ही ई-कॉमर्स कंपन्यांसाठी सर्वात मोठी डोकेदुखी आहे. विशेषतः जेव्हा ऑर्डर पॅक केली जाते किंवा डिलीव्हरीनंतर रिटर्न केली जाते, तेव्हा कंपन्यांसाठी ही गोष्ट मोठी डोकेदुखी ठरते. पोर्टलपासून ते विक्रेत्यापर्यंत यासाठी भरपूर पैसा खर्च करावा लागतो. अनेक युजर्स असे आहेत, की जे एखादी वस्तू ऑर्डर करतात. त्याचा वापर करतात आणि त्यानंतर ती रिटर्न करतात. अनेक वापरकर्ते याचा गैरवापर करताना पकडले गेले आहेत.
या सर्वांमुळे कंटाळलेल्या कंपन्यांनी आजकाल प्लास्टिकचे टॅग लावायला सुरुवात केली आहे. जर हा टॅग तुटला तर तुमची ऑर्डर रिटर्न होऊ शकत नाही. तसेच आता Flipkart आणि Myntra ऑर्डर रद्द करण्यासाठी 20 रुपये आकारू शकतात. टेक एक्सपर्ट अभिषेक यादव यांनी फ्लिपकार्टच्या सपोर्ट पेजचा स्क्रीन शॉट शेअर केला आहे. ऑर्डर रद्द केल्यावर 20 रुपये भरावे लागतील हे स्पष्टपणे दिसत आहे.
Flipkart and Myntra Introduce ₹20 Order Cancellation Fee as Part of New Policy. 🥴 😂#Flipkart #Myntra #Cancel pic.twitter.com/FlwPLhoMqO
— Abhishek Yadav (@yabhishekhd) December 9, 2024
मात्र, हे मॅन्युअली करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. परंतु एकदा ऑर्ड रद्द करण्याची विंडो उदाहरणार्थ 12 तास किंवा 24 तास बंद झाली की, पैसे भरावे लागतील. उत्पादनानुसार, 500 रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाऊ शकते. आत्तापर्यंत कंपनीने याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नसले तरी या पोस्टनंतर अनेक रंजक कमेंट्स नक्कीच येत आहेत.