नव्या रंगात लाँच झाले मोटोरोलाचे हे दोन स्मार्टफोन, लूक असा की पाहतच राहाल
स्मार्टफोन कंपनी Motorola ने त्यांचे फ्लॅगशिप स्मार्टफोन Motorola Razr 50 Ultra आणि Motorola Edge 50 Neo नवीन रंगात लाँच केले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन आता Pantone च्या 2025 कलर ऑफ द इयर, ‘Mocha Mousse ‘ मध्ये उपलब्ध असणार आहे. याबबात कंपनीने त्यांच्या एक्स अकाऊंटवर व्हिडीओ शेअर केले आहेत.
Year Ender 2024: हे आहेत डिसेंबर 2024 मधील बेस्ट स्मार्टफोन्स, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स सर्वच कमाल
क्लॅमशेल डिझाईन असलेला Motorola Razr 50 Ultra फोन याआधी पीच फज, मिडनाईट ब्लू आणि स्प्रिंग या कलर पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला होता. तर Motorola Edge 50 Neo लाटे, ग्रिसाइल, नॉटिकल ब्लू आणि पॉइन्सियाना कलरमध्ये उपलब्ध होता. आता कंपनीने या दोन्ही स्मार्टफोनसाठी एक नवीन रंग उपलब्ध करून दिला आहे. (फोटो सौजन्य – X)
Dipped and wrapped in elegance, harmony, and a tasteful touch of glamour 🤎.
Showstoppers are in the town: motorola razr 50 ultra and motorola edge 50 neo in @Pantone Color of the Year 2025, Mocha Mousse. Learn more: https://t.co/iG9R1PJR3r#coloroftheyear #COY2025 #mochamousse pic.twitter.com/b4hwLrKQzp
— motorola (@Moto) December 5, 2024
Motorola Razr 50 Ultra आणि Edge 50 Neo चे नवीन Pantone Mousse कलर व्हेरियंट बॅक पॅनलवर टेक्सचर्ड फिनिशसह ब्राऊन टोन फिनिश ऑफर करते. या व्हेरिएंटमध्ये सरफेसवर कॉफीच्या एलिमेंट्स आणि सस्टेनेबिलिटीसह एक सॉफ्ट सजावट करण्यात आली आहे. कंपनीच्या मते, पँटोन मोचा मूस रंग साधेपणा आणि आकांक्षेची भावना प्रतिबिंबित करतो, त्याला वर्सटाइल अपील देतो.
रंगाव्यतिरिक्त, दोन्ही स्मार्टफोनमध्ये वैशिष्ट्ये आणि डिझाइनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सध्या, नवीन कलर व्हेरियंटची किंमत जाहीर करण्यात आलेली नाही, परंतु येत्या काही दिवसांत हा स्मार्टफोन खरेदीसाठी उपलब्ध केला जाणार आहे. तसेच, कंपनी हा कलर व्हेरिएंट फक्त काही निवडक मार्केटमध्ये उपलब्ध असेल.
Razr 50 Ultra 12 GB रॅम आणि 512 GB स्टोरेजसह 99,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला. तथापि, सध्या हा फोन Amazon वर केवळ 79,999 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. तसेच, Edge 50 Neo चा 8GB + 256GB व्हेरिअंट 23,999 रुपयांना लाँच करण्यात आला होता. मात्र आता हा फोन फ्लिपकार्टवरून 21,999 रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. हे दोन्ही स्मार्टफोन भारतात कधी लाँच होणार, यबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.
Motorola Razr 50 Ultra मध्ये 4-इंचाचा कव्हर केलेला LTPO pOLED डिस्प्ले आहे. त्याची पीक ब्राइटनेस 2,400 निट्स आहे आणि रिझोल्यूशन 1272×1080 पिक्सेल आहे. यात स्नॅपड्रॅगन 8s Gen 3 प्रोसेसर आहे. फोनमध्ये 68W चार्जिंगसह 4000 mAh बॅटरी आहे, जी 15W वायरलेस आणि 5W रिव्हर्स चार्जिंगला सपोर्ट करते.
फायनली! सॅमसंग युजर्सना मिळालं One UI 7 बीटा अपडेट, AI फिचर्ससह मिळणार नवीन अनुभव
Edge 50 Neo मध्ये 8GB RAM सह MediaTek Dimensity 7300 प्रोसेसर आहे, जो रोजची कामे सहज हाताळू शकतो. डिव्हाइस Android 14 वर चालते. Neo ला पाच वर्षांची OS अपडेट्स आणि 5 वर्षांपर्यंतची सुरक्षा अपडेट मिळाली आहेत.