Year Ender 2024: हे आहेत डिसेंबर 2024 मधील बेस्ट स्मार्टफोन्स, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स सर्वच कमाल
काही दिवसांतच नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. 2024 मध्ये स्मार्टफोन्सची किंमत वाढणार आहे, असं सांगितलं जात आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यात तुम्ही फोन खरेदी केल्यास तुम्हाला बराच फायदा होऊ शकतो. नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार तर केला, पण कोणता स्मार्टफोन्स खरेदी करावा, यामध्ये अनेकजण गोंधळलेले असतात. यासाठी आज आम्ही तुम्हाला डिसेंबर 2024 मधील लेटेस्ट आणि बेस्ट स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत.
Samsung Galaxy S24 Ultra हा स्मार्टफोन कंपनीचा फ्लॅगशिप फोन आहे, जो Galaxy AI फीचर सह लाँच करण्यात आला आहे. कंपनीने हा फोन भारतात 1,29,999 रुपयांच्या किंमतीत लाँच केला आहे. Galaxy S24 Ultra 5G स्मार्टफोन Galaxy AI फीचरसह लाँच करण्यात आला आहे, ज्यामध्ये लाइव्ह ट्रान्सलेट, टू-वे, फोन कॉल्समध्ये लाईव्ह व्हॉईस आणि टेक्स्ट ट्रान्सलेशन सारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.
यासोबतच, इंटरप्रिटर, चॅट असिस्ट आणि सारांश देण्यासाठी नोट असिस्ट सारखी वैशिष्ट्ये देखील उपलब्ध आहेत. या Galaxy S24 Ultra स्मार्टफोनमध्ये गुगलचे सर्कल टू सर्च फीचर देखील उपलब्ध आहे. Samsung च्या Galaxy S24 Ultra स्मार्टफोनचा कॅमेरा खूप पॉवरफुल आहे. या फोनमध्ये क्वाड टेलि सिस्टीमसह 5x ऑप्टिकल झूम आहे, जे 50MP कॅमेरा लेन्ससह कार्य करते. यासोबतच हे 100x डिजिटल झूमलाही सपोर्ट करते. या सॅमसंग फोनमध्ये 200MP प्राथमिक कॅमेरा आणि 12MP अल्ट्रा-वाइड सेन्सर तसेच 10MP टेलिफोटो लेन्स आहे.
iPhone 16 Pro Max मध्ये 6.9-इंचाचा LTPO सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले आहे. हा फोन Apple Intelligence ला सपोर्ट करतो. iPhone 16 Pro Max मध्ये 6.9 इंच डिस्प्ले आहे. iPhone 16 Pro Max चा बेस व्हेरिएंट 256GB स्टोरेजसह येतो, जो 1,44,900 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. iPhone 16 Pro Max चा 512GB व्हेरिअंट 1,64,900 रुपयांना आणि 1TB व्हेरिअंट 1,84,900 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो.
16 Pro Max मध्ये साइड कॅमेरा कंट्रोल फीचर दिले आहे.16 Pro Max मध्ये Motion Create फीचर देखील देण्यात आले आहे. यासोबतच यात 48MP प्रायमरी कॅमेरा असेल.
Google Pixel 9 Pro मध्ये 6.3-इंच (1280 x 2856 pixels) 1.5K LTPO AMOLED डिस्प्ले आहे. यात 3000 निट्स पीक ब्राइटनेस आहे. स्क्रीनच्या संरक्षणासाठी यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 आहे. यात अल्ट्रासोनिक डिस्प्ले आहे. या गुगल हँडसेटमध्ये Tensor G4 चिपसेटसोबत Titan M2 सुरक्षा चिप आहे.
या हँडसेटची किंमत 1,09,999 रुपये आहे. Google Pixel 9 Pro मध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा सेटअप आहे, ज्यात Samsung GNK सेन्सर आहे. यामध्ये 48MP सेकेंडरी कॅमेरा आहे, ज्यामध्ये 123 डिग्री अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आहे. यात 48MP 5x टेलीफोटो कॅमेरा देखील आहे. यात 42MP टेलिफोटो कॅमेरा आहे.
Google Pixel 8a स्मार्टफोन नवीन Tensor G3 चिपसेटसह नवीन डिझाइनसह लाँच झाला आहे. गुगलचा हा स्मार्टफोन AI फीचर्सलाही सपोर्ट करतो. गुगलच्या या पिक्सेल स्मार्टफोनमध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. Google Pixel 8a स्मार्टफोनमध्ये फ्लॅट 6.1-इंचाच्या सुपर ॲक्टुआ डिस्प्लेस आहे. या OLED पॅनेलचा रिफ्रेश दर 120Hz आहे. Google चा नवीनतम Pixel 8a स्मार्टफोन Tensor G3 चिपसेटसह येतो. या Google फोनमध्ये Wi-Fi 6, Bluetooth 5.3, NFC, USB Type-C पोर्ट आहे.
Google Map Update: गुगल मॅप ठरतोय अपघाताचं कारण? सुरक्षित प्रवासासाठी लक्षात ठेवा या टीप्स
या फोनमध्ये एक फिजिकल सिम स्लॉट आणि एक eSIM चा सपोर्ट आहे. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर उपलब्ध आहे. सर्कल टू सर्च, एआय इमेज एडिटिंग, ऑडिओ मॅजिक इरेजर, बेस्ट टेक असे अनेक फीचर्स या फोनमध्ये देण्यात आले आहेत. Google चा Pixel 8a भारतात 128GB आणि 256GB अशा दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. दोन्ही व्हेरियंट 8GB रॅम सह सादर करण्यात आले आहेत. या दोन प्रकारांची किंमत अनुक्रमे 52,999 रुपये आणि 59,999 रुपये आहे.
iPhone 16 सीरीज 79,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आली. याच्या 128GB व्हेरिअंटची किंमत 79,900 रुपये, 256GB व्हेरिअंटची किंमत 89,900 रुपये आणि 512GB व्हेरिअंटची किंमत 1,09,900 रुपये आहे. iPhone 16 मालिकेत 48MP प्रायमरी कॅमेरा आहे. फोनमध्ये 12MP अल्ट्रा वाईड सेन्सर आहे. हा कॅमेरा सेन्सर मॅक्रो फोटोग्राफीलाही सपोर्ट करतो.
यासोबतच दोन्ही मॉडेल्समध्ये 12MP फ्रंट कॅमेरा सेन्सर आहे. कंपनीने नवीन कॅमेरा कंट्रोल बटण दिले आहे. आयफोन 16 मध्ये A18 चिप आहे. iPhone 16 मध्ये प्रगत ड्युअल कॅमेरा प्रणाली आहे. iPhone 16 iPhone 15 पेक्षा दोन तास अधिक व्हिडिओ प्लेबॅक ऑफर करतो. iPhone 16 मध्ये AI-आधारित Apple Intelligence सपोर्ट आहे.
Samsung ने अनेक अपग्रेड केलेल्या वैशिष्ट्यांसह Galaxy S23 FE चा उत्तराधिकारी म्हणून Samsung Galaxy FE S24 लाँच केला. यामध्ये AI फीचर्स देण्यात आले आहेत. Galaxy S24 FE मध्ये 6.7-इंचाचा फुल-HD+ डायनॅमिक AMOLED पॅनेल आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा 8GB RAM आणि देशानुसार 256GB/512GB पर्यंत स्टोरेजसह येतो. Galaxy S24 FE मध्ये Exynos 2400e SoC प्रोसेसर आहे.
डिव्हाइसमध्ये 4,700mAh बॅटरी आहे, जी 25W वायर्ड आणि 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. यात ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा, 12MP अल्ट्रावाइड लेन्स आणि 3x ऑप्टिकल झूमसह 8MP टेलिफोटो शूटर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी समोर 10MP स्नॅपर आहे.
OnePlus 12 मध्ये Snapdragon 8 Gen 3 Soc चिपसेट आहे. हा फोन अँड्रॉइड 14 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे आणि त्यात 24 LPDDR5X रॅम आहे. OnePlus 12 मध्ये 6.82-इंचाचा क्वाड डिस्प्ले आहे. या डिस्प्लेमध्ये 1440×3168 पिक्सेल रिझोल्यूशन सपोर्ट आहे. फोनच्या मागील पॅनलवर हॅसलबँड ब्रँडिंगसह ट्रिपल कॅमेरा आणि सेल्फीसाठी 32-मेगापिक्सेल कॅमेरा आहे.
OnePlus 12R मध्ये Snapdragon 8 Gen 2 चिपसेट, 6.78 इंच AMOLED डिस्प्ले आणि 5,500mAh बॅटरी सारखी वैशिष्ट्ये आहेत. OnePlus 12R मध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 2780 x 1264 रिझोल्यूशन, डॉल्बी व्हिजन, HDR 10+, 4500 nits पीक ब्राइटनेस आणि गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 संरक्षणासह 6.78-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. यात 6,000nits पीक ब्राइटनेस आहे.
यामध्ये AI फीचर्सही देण्यात आले आहेत. चिपसेट 16GB LPDDR5X RAM आणि 256GB UFS 4.0 स्टोरेजसह जोडलेला आहे. हँडसेट Android 14 आधारित OxygenOS कस्टम स्किन आउट ऑफ द बॉक्सवर चालतो. OnePlus 12R मध्ये 112-डिग्री 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरासह Sony IMX890 50MP प्राथमिक सेन्सर आहे. सेल्फीसाठी 16MP फ्रंट कॅमेरा आहे.
Asus ROG Phone 9 Pro आणि ROG Phone 9 फोन लाइनअपमध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसर 24GB पर्यंत RAM आणि 1TB पर्यंत स्टोरेज आहे. या Asus ROG Phone 9 सिरीजमध्ये IP68 रेटेड बिल्ड आणि AMOLED डिस्प्ले आहे. या फोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्राथमिक कॅमेरा 50-मेगापिक्सेल सोनी लिटिया 700 सेन्सर आहे.
ROG Phone 9 आणि ROG Phone 9 Pro या दोन्हींमध्ये सेल्फीसाठी 32-मेगापिक्सेलचा RGBW कॅमेरा आहे. कॅमेरा युनिट एआय ऑब्जेक्ट सेन्स, एआय हायपरक्लॅरिटी आणि एआय हायपरक्लॅरिटीसह अनेक एआय वैशिष्ट्यांना समर्थन देते. Asus ROG Phone 9 आणि ROG Phone 99 Pro मध्ये 5,800mAh बॅटरी आणि 65W वायर्ड चार्जिंग सपोर्ट आणि 15W वायरलेस चार्जिंग सपोर्ट आहे.
CMF फोनमध्ये MediaTek Dimensity 7300 5G 8-core 4nm TSMC प्रोसेसर आहे. फोनमध्ये 6GB/8GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. CMF फोन 1 मध्ये 6.67 इंच सुपर AMOLED LTPS, 2000 nits पीक ब्राइटनेस, 120 Hz अडॅप्टिव्ह रिफ्रेश रेट सपोर्ट आहे. CMF फोन 1 मध्ये 50MP + 2MP ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. फोनमध्ये 16MP सेल्फी कॅमेरा आहे. CMF फोन 1च्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 15,999 रुपये आहे. 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 17,999 रुपये आहे.