गाणी ऐकण्याची मजा होणार दुप्पट! OnePlus ने लाँच केले नवीन इयरबड्स, एवढ्या तासांचा आहे प्लेबॅक टाईम
टेक कंपनी OnePlus ने चीनमध्ये त्यांचे नवीन स्मार्टफोन OnePlus Ace 5 Pro आणि OnePlus Ace 5 लाँच केले आहेत. या स्मार्टफोनसोबत कंपनीने नवीन इयरबड्स देखील लाँच केले आहेत. कंपनीने गुरुवारी चीनमध्ये त्यांचे नवीनतम इयरबड्स OnePlus Buds Ace 2 TWS लाँच केले आहेत.
Bluesky New Feature: X चा हा खास फीचर आता Bluesky वर मिळणार, कशा प्रकारे काम करेल? जाणून घ्या
OnePlus Buds Ace 2 TWS इयरबड्स गुरुवारी चीनमध्ये OnePlus Ace 5 Pro आणि OnePlus Ace 5 हँडसेटसह लाँच करण्यात आले. बड्समध्ये 12.4mm डायनॅमिक ड्रायव्हर्स, AI-सपोर्टेड ड्युअल मायक्रोफोन युनिट्स आणि एक्टिव नॉइज कँसलेशन (ANC) सपोर्ट देण्यात आला आहे. या इअरबड्समध्ये धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी IP55-रेटेड बिल्ड आहे. ड्युअल डिव्हाइस कनेक्टिव्हिटी आणि 43ms पर्यंत लो-लेटन्सीसाठी सपोर्ट देखील आहे. Buds Ace 2 हे OnePlus Buds Ace चे अपग्रेड म्हणून लाँच करण्यात आले आहेत, OnePlus Buds Ace फेब्रुवारी 2023 मध्ये चीनमध्ये लाँच करण्यात आले होते. (फोटो सौजन्य – X)
चीनमध्ये OnePlus Buds Ace 2 इयरबड्स CNY 179 म्हणजेच अंदाजे 2,100 रुपयांच्या किंमतीत लाँँच करण्यात आले आहेत. फर्स्ट सेलमध्ये हे इयरबड्स CNY 169 म्हणजेच अंदाजे 2,000 रुपयांच्या विशेष किंमतीत उपलब्ध आहेत. पण ही ऑफर केवळ मर्यादित कालावधीसाठीच आहे. शिवाय OnePlus Ace 5 सिरीजमधील किमान एक स्मार्टफोन खरेदी केल्यास, हे इयरबड्स CNY 159 म्हणजेच अंदाजे 1,900 रुपयांमध्ये खरेदी केले जाऊ शकते. हे बड्स इतर ई-कॉमर्स साइट्ससह ओप्पो चायना ई-स्टोअरवर सूचीबद्ध करण्यात आले आहेत. OnePlus Buds Ace 2 TWS फ्लॅश ब्लू आणि सबमरीन ब्लॅक कलर पर्यायांमध्ये लाँच करण्यात आले आहे.
OnePlus Buds Ace 2 इयरबड्समध्ये राउंडेड स्टेम्ससह ट्रेडिशनल इन-ईयर डिझाईन आहेत जे OnePlus Nord Buds 3 च्या डिझाइनसारखेच आहे. प्रत्येक इअरबडवरील टच सेन्सर थोड्याशा इंडेंटने चिन्हांकित केले आहे. इयरबड्स 12.4mm डायनॅमिक ड्रायव्हर्स आणि AI-सपोर्टेड ड्युअल-मायक्रोफोन युनिटसह सुसज्ज आहेत.
Lava Yuva 2 5G भारतात लाँच, 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणार हे जबदरस्त फीचर्स
OnePlus मधील नवीनतम TWS इयरबड्स ANC आणि BassWave 2.0 तंत्रज्ञानासह येतात, जे वापरकर्त्यांना उत्कृष्ट बेस ऑफर करण्याचा दावा करतात. हे बड्स AAC आणि SBC ऑडिओ कोडेक्स आणि ड्युअल डिव्हाइस कनेक्टिव्हिटी तसेच ब्लूटूथ 5.4 ला देखील समर्थन देतात. त्यांना धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी IP55 रेटिंग आहे. ते मिनिमम लॅगसाठी 47ms पर्यंत लो-लेटेंसीला सपोर्ट करतात.
OnePlus ने प्रत्येक बडमध्ये 58mAh बॅटरी दिली आहे, तर चार्जिंग केसमध्ये 440mAh बॅटरी आहे. कंपनीने दावा केला आहे की हे बड्स एका चार्जवर 12 तासांपर्यंत प्लेबॅक टाईम देतात, तर केस 43 तासांपर्यंत प्लेबॅक प्रदान करते. मॅग्नेटिक चार्जिंग केस USB Type-C चार्जिंग पोर्टसह येतो.
OnePlus Buds Ace 2 इयरबड्स 29.99 x 20.30 x 23.87 मिमी आणि वजन 4.2 ग्रॅम आहेत. त्याच वेळी, चार्जिंग केसचे मोजमाप 66.50 x 51.24 x 24.83 मिमी आहे आणि हेडसेटसह त्याचे वजन 46.2 ग्रॅम आहे.