डिसेंबर महिन्यात लाँच होणार Realme चा स्मार्टफोन, बजेट किंमतीत मिळणार Cool Features
स्मार्टफोन कंपनी Realme ने त्यांच्या आगामी स्मार्टफोन सिरीज Realme 14x ची घोषणा केली आहे. ही स्मार्टफोन सिरीज येत्या काही दिवसांतच भारतात लाँच केली जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. Realme च्या या स्मार्टफोनबद्दल सांगितले जात आहे की हा तीन व्हेरिअंट आणि कलर पर्यायांमध्ये रिलीज केला जाऊ शकतो. Realme ने त्याच्या आगामी स्मार्टफोनबद्दल अजून कोणतीही माहिती अधिकृत शेअर केलेली नाही. मात्र या स्मार्टफोनचे काही डिटेल्स लिक झालेल आहेत. त्यानुसार आपण Realme 14x च्या फीचर्सचा अंदाज लावू शकतो.
स्मार्टफोनसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
Realme 14x स्मार्टफोन बद्दल, असे सांगितले जात आहे की भारतात त्याची विक्री 18 डिसेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र कंपनीने अद्याप याबाबत अधिकृतपणे कोणतेही डिटेल्स शेअर केले नाहीत. यासोबतच, रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, हा फोन Realme 14x स्मार्टफोन येत्या काही आठवड्यात रिलीज होऊ शकतो. त्यामुळे कपंनी लवकरच त्याचे टिझर देखील शेअर करेल. (फोटो सौजन्य – Pinterest)
Realme 14x स्मार्टफोनमध्ये 6.67-इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्यामध्ये HD+ रिझोल्यूशनसह एक IPS LCD पॅनेल असेल. यासोबतच, Realme 14x स्मार्टफोन कंपनीच्या डायमंड डिझाइन पॅनेलसह लाँच केला जाऊ शकतो. या डिझाईनबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही, पण कंपनीने याआधीच डायमंड डिझाइन असलेले स्मार्टफोन लाँच केले आहेत.
Realme 14x तीन व्हेरिअंटमध्ये लाँच केला जाण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये 6GB + 128GB, 8GB + 128GB आणि 8GB + 256GB या व्हेरिअंटचा समावेश असणार आहे. Realme 14x स्मार्टफोन क्रिस्टल ब्लॅक, गोल्डन ग्लो आणि ज्वेल रेड या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच केला जाण्याची शक्यता आहे.
कंपनी Realme 14x स्मार्टफोनमध्ये स्क्वेअर शेप कॅमेरा मॉड्यूल ऑफर करण्याची शक्यता आहे. याआधी कंपनीने गोलाकार कॅमेरा मॉड्यूल असलेले फोन लाँच केले आहे.
Realme 14x स्मार्टफोनबद्दल असे सांगितले जात आहे की हा IP69 रेटिंग आणि 6000mAh बॅटरी सह लाँच केला जाईल. हा फोन बजेट सेगमेंटमध्ये लाँच केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. Realme 14x स्मार्टफोन भारतात 15,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत लाँच केला जाईल.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
Realme च्या आगामी स्मार्टफोनबद्दल असे सांगितले जात आहे की कंपनी लवकरच आपल्या Realme 14 सीरीज स्मार्टफोनचे आणखी एक नवीन मॉडेल लाँच करणार आहे. Realme पुढील महिन्यात जानेवारी 2025 मध्ये Realme 14 Pro आणि Realme 14 Pro+ स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. यासोबतच काही रिपोर्ट्समध्ये असे सांगितले जात आहे की कंपनी यासोबत Redmi 14 Pro Lite देखील लाँच करू शकते. हा प्रो सीरीजचा नवीन स्मार्टफोन आहे.