Vivo X200 सिरीज या दिवशी भारतात करणार एंट्री! लाँचिंगपूर्वी स्पेसिफिकेशन्स लीक
लोकप्रिय स्मार्टफोन कंपनी विवोची नवीन स्मार्टफोन सिरीज भारतात लाँच होणार आहे. लाँचिंगपूर्वी या सिरीजचे काही डिटेल्स आणि स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेतं. स्पेसिफिकेशन्सवरून असं सांगितलं जात आहे, की विवोची ही आगामी सिरीज भरतात धमाका करणार आहे. विवोची नविन सिरीज युजर्सच्या पसंतीस उतरणार आहे.
स्मार्टफोनसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
Vivo X200 सीरीजचे स्मार्टफोन भारतात 12 डिसेंबर रोजी लाँच होतील. कंपनीने या सिरीजची भारतातील लाँचिंग डेट कन्फर्म केली आहे. यापूर्वी, Vivo X100 लाइनअप कंपनीने गेल्या वर्षी जानेवारीमध्ये लाँच केले होते. याचा अर्थ कंपनी या वर्षाच्या सुरुवातीला आपली फ्लॅगशिप सिरीज लाँच करणार आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
Vivo X200 सीरीजचे स्मार्टफोन आधीच जागतिक बाजारात लाँच करण्यात आले आहेत. त्यामुळे तशाच स्पेसिफिकेशन्स आणि फिचर्ससह ही नवीन सीरिज भरतात लाँच केली जाऊ शकते.
Vivo X200 स्मार्टफोनमध्ये 6.67-इंचाचा डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. त्याच्या प्रो व्हेरिएंटमध्ये 6.78-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचा डायनॅमिक रिफ्रेश दर 0.1Hz-120Hz आहे.
Vivo X200 सिरीज MediaTek Dimensity 9400 फ्लॅगशिप चिपसेटसह लाँच केली जाणार आहे. यापूर्वी, कंपनीने Dimensity 9300 सह लास्ट जनरेशन स्मार्टफोन लाँच केला होता. हे स्मार्टफोन्स Android 15 सह रिलीज केले जातील.
Vivo X200 Pro स्मार्टफोनमध्ये 50MP Sony LYT-818 प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे, जो ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनला सपोर्ट करतो. फोनमध्ये 50MP अल्ट्रा वाइड कॅमेरा आहे. यासोबतच या फोनला 200MP Zeiss APO टेलिफोटो लेन्स देण्यात आली आहे. या फोनमध्ये V3+ इमेजिंग चिप आहे. त्यामुळे या सिरीजच्या मदतीने तुमचा फोटोग्राफीचा अनुभव आणखी मजेदार होणार आहे.
Vivo X200 स्मार्टफोनबद्दल बोलायचे झाले तर Vivo X200 मध्ये 50MP Sony IMX921 प्रायमरी कॅमेरा आहे. त्याचा प्राथमिक कॅमेरा OIS ला सपोर्ट करतो. यासोबतच फोनमध्ये 50MP अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 50MP Sony IMX882 टेलिफोटो लेन्स आहे. दोन्ही फोनमध्ये 32MP सेल्फी कॅमेरा आहे.
Vivo X200 स्मार्टफोनमध्ये 5,800mAh बॅटरी देण्यात आली आहे. यासोबतच X200 Pro मध्ये 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे. दोन्ही फोन 90W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतात. यासोबतच, Vivo X100 मध्ये 5000mAh बॅटरी आहे आणि X100 Pro मध्ये 5,400mAh बॅटरी आहे.
स्मार्टफोनसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
कंपनीने मलेशियात Vivo X200 सीरिज स्मार्टफोन 3,599 मलेशियन रिंगिट म्हणजेच सुमारे 72,200 रुपयांच्या किमतीत लाँच केला आहे. यासोबत प्रो मॉडेल 4699 मलेशियन रिंगिट म्हणजेच सुमारे 94200 रुपयांना लाँच करण्यात आले आहे. यापूर्वी, Vivo X100 मालिका कंपनीने भारतात 63,999 रुपयांच्या किमतीत लाँच केली होती. ही आगामी सिरीज देखील याच रेंजमध्ये लाँच केली जाऊ शकते.