Realme Neo 7: मोठी बॅटरी असलेला Realme चा नवीन फोन लाँच, बजेट सेगमेंटमध्ये मिळणार बेस्ट फीचर्स
स्मार्टफोन कंपनी Realme ने त्यांचा नवीन स्मार्टफोन Realme Neo 7 चीनमध्ये लाँच केला आहे. निओ सीरीजचे नवीनतम मॉडेल म्हणून हा नवीन स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. नवीन Realme स्मार्टफोन MediaTek Dimensity 9300+ चिपसेटने सुसज्ज आहे आणि यामध्ये 50-मेगापिक्सेलच्या मुख्य सेन्सरसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
Vivo X200 Series: विवोची नवीन स्मार्टफोन सिरीज भारतात लाँच, अपग्रेड डिस्प्लेसह केली एंट्री
Realme Neo 7 स्मार्टफोन Realme GT Neo 6 मध्ये अपग्रेड म्हणून लाँच करण्यात आला आहे, परंतु यामध्ये GT ब्रँडिंग नाही. फोनमध्ये 80W जलद चार्जिंग सपोर्टसह 7,000mAh बॅटरी आहे. Realme Neo 7 ला धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी IP68 आणि IP69 रेटिंग मिळाले आहेत. (फोटो सौजन्य – X)
Realme Neo 7 स्मार्टफोन 12GB + 256GB, 12GB + 512GB, 16GB + 512GB आणि 16GB + 1TB या व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. Realme Neo 7 स्मार्टफोनच्या 12GB + 256GB रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 2,099 म्हणजेच अंदाजे 24,000 रुपये आहे. 12GB + 512GB रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 2,499 म्हणजेच अंदाजे 29,000 रुपये आहे.
16GB + 512GB रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 2,799 म्हणजेच अंदाजे 32,000 रुपये आहे. 16GB + 1TB व्हेरियंटची किंमत CNY 2,038 म्हणजेच अंदाजे 38,000 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन मीटियोराइट ब्लॅक, स्टारशिप आणि सबमर्सिबल या कलर पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे.
डुअल सिम (नॅनो) सपोर्ट असणारा हा स्मार्टफोन Realme Neo 7 अँड्रॉयड 15 बेस्ड Realme UI 6.0 वर चालतो. या स्मार्टफोनमध्ये 6.78-इंचाचा 1.5K(1,264x,2,780 पिक्सल) 8T LTPO डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यामध्ये 6,000nits पीक ब्राइटनेस, 2,600Hz टच सँपलिंग रेट आणि 93.9 टक्के स्क्रीन टू बॉडी रेशियो आहे. डिस्प्लेमध्ये DCI-P3 कलर गॅमट, 2160Hz हाय-फ्रिक्वेंसी PWM डिमिंग आणि 1Hz ते 120Hz रीफ्रेश दर देखील आहेत.
फोन ऑक्टा-कोर मीडियाटेक डाइमेंशन 9300+ प्रोसेसरवर आधारित आहे. यामध्ये 16GB रॅम आणि मॅक्जिमम 1TB आहे. हँडसेट 12GB पर्यंत वर्च्युअल रॅमला सपोर्ट करतो.
फोटोग्राफीसाठी, Realme Neo 7 मध्ये OIS सपोर्टसह 50-मेगापिक्सलचा Sony IMX882 कॅमेरा आणि 8-मेगापिक्सेलचा सेकेंडरी वाइड-एंगल कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. चांगल्या नेटवर्क कनेक्टिव्हिटीसाठी हँडसेटमध्ये स्काय कम्युनिकेशन सिस्टम 2.0 फीचर आहे आणि त्यात 7,700 मिमी स्क्वेअर व्हीसी हीट डिसिपेशन एरिया समाविष्ट आहे.
ChatGPT down: AI चॅटबोट चॅटजीपीटी डाऊन, नेटकरी अस्वस्थ! काय आहे नेमकं कारण?
Realme ने या फोनमध्ये 7,000mAh बॅटरी पॅक दिला आहे. जो 80W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. हा हँडसेट एका चार्जवर 21 तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅक आणि 14 तासांपर्यंत व्हिडिओ कॉलिंग वेळ देतो असा दावा करण्यात आला आहे. याला IP68 आणि IP69 वॉटर आणि डस्ट रेझिस्टन्स रेटिंग मिळाले आहे. स्मार्टफोनची डाइमेंशन 162.55×76.39×8.56 मिमी आणि वजन 213 ग्रॅम आहे.