Vivo X200 Series: विवोची नवीन स्मार्टफोन सिरीज भारतात लाँच, अपग्रेड डिस्प्लेसह केली एंट्री
स्मार्टफोन कंपनी विवोची नवीन स्मार्टफोन सिरीज Vivo X200 Series भारतात लाँच करण्यात आली आहे. आज दिल्लीमध्ये विवोचा ईव्हेंट आयोजित करण्यात आला होता. या ईव्हेंटमध्ये ही स्मार्टफोन सिरीज लाँच करण्यात आली आहे. या स्मार्टफोन सिरीजमध्ये कंपनीने Vivo X200 आणि Vivo X200 Pro हे दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. Vivo X200 Series चा लाँचिंग ईव्हेंट कंपनीच्या युट्यूब चॅनेलवर लाँच करण्यात आला होता. या दोन्ही स्मार्टफोन्सच्या लाँचिंगबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. आता अखेर हे दोन्ही स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आले आहेत.
Vivo X200 सिरीजमध्ये भारतात प्रथमच सेमी सॉलिड स्टेट बॅटरी तंत्रज्ञान आहे. Vivo X200 मध्ये 5800mAh ची मोठी बॅटरी आहे. Vivo X200 आणि Vivo X200 Pro मध्ये MediaTek डायमेंशन 9400 प्रोसेसर देण्यात आला आहे. विवोच्या या स्मार्टफोन्समध्ये विशेष ZEISS टेलिफोटो इमेजिंग तंत्रज्ञान देण्यात आले आहे. विवोच्या या स्मार्टफोन्समध्ये ZEISS मास्टर कलर डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेसह हा उद्योगातील पहिला फोन असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. Vivo X200 Pro मध्ये 200 मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा आहे. कंपनीचे म्हणणे आहे की फोनमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा टेलीफोटो सेन्सर आहे. Vivo X200 सीरीजमध्ये ZEISS इमेज सेन्सर देण्यात आला आहे. दोन्ही स्मार्टफोन कॅमेरा फोकस असल्याचे सांगितले जात आहे.
डिस्प्ले – Vivo X200 मध्ये 6.67 इंच क्वाड-वक्र OLED LTPS डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120 Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.
बॅटरी – Vivo X200 मध्ये कंपनीने पॉवरसाठी 5800mAh बॅटरी दिली आहे. ही बॅटरी 90W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
कॅमेरा – कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, Vivo X200 स्मार्टफोनमध्ये सोनी IMX921 सेन्सरसह 50MP मुख्य कॅमेरा आहे. यासोबतच फोनमध्ये 50MP IMX882 टेलिफोटो लेन्स आणि 50MP अल्ट्रावाइड कॅमेरा देखील आहे. त्यामुळे तुमची फोटोग्राफी अधिक चांगली होईल.
डिस्प्ले – Vivo X200 Pro मध्ये 6.67 इंच क्वाड-वक्र OLED LTPS डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz पर्यंत व्हेरिएबल रिफ्रेश रेट आणि 1.63mm च्या अल्ट्रा-स्लिम बेझलला सपोर्ट करतो.
कॅमेरा – Vivo X200 Pro स्मार्टफोनमध्ये 200MP Zeiss APO टेलिफोटो कॅमेरा आहे, जो फोटोग्राफीचा उत्तम अनुभव देतो. हे Vivo V3+ इमेजिंग चिपसह येते आणि 4K HDR सिनेमॅटिक पोर्ट्रेट व्हिडिओ रेकॉर्ड करू शकते.
बॅटरी – पॉवरसाठी, प्रो मॉडेलमध्ये मोठी 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 90W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
प्रोसेसर – याशिवाय, दोन्ही मॉडेल्स MediaTek Dimensity 9400 चिपसेटवर चालतात, जे 3nm प्रोसेसर तंत्रज्ञानावर आधारित आहे.
Vivo X200 Pro स्मार्टफोन 94,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. तर Vivo X200 स्मार्टफोन 65,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. फोनची प्री बुकींग आजपासून सुरु झाली आहे. तर 19 डिसेंबरपासून फोनची सेल लाईव्ह होणार आहे. निवडक बँकाच्या क्रेडीट कार्डसह फोन खरेदी केल्यास 10 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट मिळणार आहे.