Airtel, Jio की Vi कोणत्या कंपनीचे नवीन रिचार्ज प्लॅन सर्वात स्वस्त? जाणून घ्या सविस्तर
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) च्या आदेशानंतर भारतातील टेलिकॉम कंपन्या Jio, Airtel आणि Vi ने त्यांचे नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन लाँच केले. या नवीन प्लॅनमध्ये केवळ कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा देण्यात आली आहे. ज्या युजर्सना इंटरनेट डेटाची गरज नाही, अशा युजर्ससाठी हे नवीन रिचार्ज प्लॅन लाँच करण्यात आले आहेत. कंपनीने पहिल्यांदा कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा देणारे नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केले, तेव्हा त्यांनी नवीन योजना आणण्याऐवजी सध्याच्या योजनांचे फायदे कमी केले होते. मात्र युजर्सच्या तक्रारीनंतर कंपनीने नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केले ज्यामध्ये केवळ कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा असणार आहे.
Aadhaar-Ration Link: घरबसल्या रेशनकार्डशी आधार करा लिंक, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
ज्या युजर्सना त्यांच्या मोबाईलमध्ये इंटरनेटची गरज नसते, अशा युजर्ससाठी कंपनीने नवीन रिचार्ज प्लॅन लाँच करावे, ज्यामध्ये केवळ कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा असेल, असे आदेश ट्रायने दिले होते. ट्रायने दिलेल्या आदेशानंतर Jio, Airtel आणि Vi या तिन्ही कंपन्यांनी नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत. तिन्ही कंपन्यांनी लाँच केलेले हे प्लॅन केवळ अमर्यादित कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा देणारे आहेत. यामध्ये युजर्सना इंटरनेट डेटा ऑफर केला जात नाही. मात्र या तिन्ही कंपन्यांपैकी कोणती कंपनी सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन ऑफर करते तुम्हाला माहिती आहे का? (फोटो सौजन्य – Pinterest)
देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी जिओने दोन नवीन प्रीपडे रिचार्ज प्लॅन लाँच आहेत. पहिला प्लॅन 1,748 रुपयांचा आहे. त्याची वैधता 336 दिवसांची आहे. पॅकच्या वैधतेदरम्यान, वापरकर्त्यांना अमर्यादित विनामूल्य कॉलिंग आणि 3,600 एसएमएसची सुविधा मिळणार आहे. या प्लॅनची रोजची किंमत 5.20 रुपये आहे. यामध्ये कोणताही डेटा फायदा नाही. कंपनीचा दुसरा रिचार्ज 448 रुपयांचा आहे. यामध्ये 84 दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित कॉलिंग आणि 1,000 एसएमएस उपलब्ध आहेत. या दोन्ही रिचार्ज प्लॅनमध्ये इंटरनेट डेटा उपलब्ध नाही.
देशातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी एअरटेलनेही दोन नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत. कंपनी 1,849 रुपयांच्या वार्षिक प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि 3,600 एसएमएस ऑफर करत आहे. त्याची वैधता पूर्ण 365 दिवसांसाठी आहे. त्याची रोजची किंमत 5.06 रुपये आहे. एअरटेलचा कमी वैधता असलेला दुसरा प्लॅन 469 रुपयांचा आहे. यामध्ये कॉलिंग आणि 900 एसएमएस 84 दिवसांसाठी उपलब्ध असतील.
चीनच्या DeepSeek ने ChatGPT ला टाकलं मागे, अमेरिकेच्या अॅप स्टोअरवर मारली बाजी
देशातील तिसरी सर्वात मोठी खाजगी दूरसंचार कंपनी Vi ने देखील आपला पूर्वीचा एकमेव प्लॅन बदलून दोन नवीन प्लॅन लाँच केले आहेत. पहिल्या प्लॅनमध्ये, कंपनी 1,849 रुपयांमध्ये 365 दिवसांच्या वैधतेसह कॉलिंग आणि 3,600 एसएमएस देत आहे. त्याची रोजची किंमत सुमारे 5 रुपये आहे. कंपनीचा दुसरा प्लॅन 470 रुपयांचा आहे. त्याची वैधता 84 दिवस आहे. वैधतेदरम्यान विनामूल्य अमर्यादित कॉलिंग आणि 900 एसएमएस उपलब्ध असतील. यामध्ये देखील इंटरनेट डेटा उपलब्ध नाही