चीनच्या DeepSeek ने ChatGPT ला टाकलं मागे, अमेरिकेच्या अॅप स्टोअरवर मारली बाजी
चायनीज AI स्टार्टअप DeepSeek ने अमेरिकेतील Apple च्या अॅप स्टोअरवर धुमाकुळ घातला आहे. सोमवार, 27 जानेवारी रोजी चायनीज AI स्टार्टअप DeepSeek अमेरिकेच्या अॅप स्टोअरवरील सर्वाधिक रेट केलेले मोफत ॲप बनले आहे. DeepSeek ने OpenAI च्या ChatGPT सोबत स्पर्धा करत त्याला मागे टाकलं आहे. पूर्व चीनमधील हांगझोउ येथील एका स्टार्टअपने डीपसीक विकसित केले आहे. हे स्टार्टअप आपल्या अनोख्या नवकल्पनांसाठी ओळखले जाते. आता या ॲपने अमेरिकेच्या अॅप स्टोअरवर बाजी मारली आहे.
ॲप डेटा रिसर्च फर्म सेन्सर टॉवरच्या मते, डीपसीक-व्ही3 पॉवर्ड एआय असिस्टंट मॉडेलने 10 जानेवारी रोजी रिलीज झाल्यापासून प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. DeepSeek डेव्हलपर दावा करतात की DeepSeek-V3 मॉडेल अनेक ओपन-सोर्स मॉडेल्सपेक्षा चांगले कार्य करते. हे जागतिक स्तरावर काही हाय क्लोज्ड-सोर्स मॉडलला प्रतिस्पर्धी आहे. त्याच्या लोकप्रियतेमुळे, हा चॅटबॉट अमेरिकेतील ऍपल ॲप स्टोअरवर चॅटजीपीटीला मागे टाकण्यात यशस्वी झाला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
हे चीनी AI स्टार्टअप जागतिक स्तरावर AI च्या जगात आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या शर्यतीत ही त्याच्यासाठी मोठी उपलब्धी मानली जात आहे. स्टार्टअपला एआयच्या बाबतीत अमेरिकेला आव्हान द्यायचे आहे.
डीपसीकच्या यशावरून हे दिसून येते की चीन एआयच्या जगात आपली पकड मजबूत करण्यासाठी काम करत आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या अहवालानुसार, DeepSeek संशोधकांनी अहवाल दिला की DeepSeek-V3 मॉडेलला Nvidia च्या H800 चिप्स वापरून प्रशिक्षण देण्यात आले होते, ज्याची प्रशिक्षणाची किंमत $6 दशलक्षपेक्षा कमी होती. 2023 मध्ये Hangzhou मध्ये स्थापन झालेली DeepSeek ही AI मॉडेल्स रिलीझ करणाऱ्या अनेक चिनी टेक फर्मपैकी एक आहे, परंतु यूएसमध्ये मान्यता मिळवणारी ती पहिली आहे. जरी याआधीही, इतर अनेक देशांच्या AI मॉडेलने जगभरात लक्ष वेधून घेतले आहे, परंतु DeepSeek चे AI अमेरिकेत सर्वाधिक प्रभावशाली ठरत आहे.
बाजारात आधीच अनेक चॅटबॉट्स आहेत. सर्वात लोकप्रिय ChatGPT आहे, ज्याने US मधील App Store वर मागे टाकले आहे. हे मायक्रोसॉफ्ट कॉपायलटशी देखील स्पर्धा करत आहे. DeepSeek चे AI ChatGPT आणि Gemini सारख्या मोठ्या AI मॉडेल्सना आव्हान देत आहे.
एप्रिल 2023 मध्ये सुरू झालेला DeepSeek AI च्या क्षेत्रात खूप वेगाने प्रगती करत आहे. मानवापेक्षा अधिक हुशार असणारे एआय तयार करणे हे त्यांचे ध्येय आहे. अलीकडे, त्यांनी ‘R1’ नावाचे नवीन AI मॉडेल जारी केले, जे OpenAI मधील आघाडीच्या AI मॉडेलशी स्पर्धा करते. ‘R1’ ने ॲप स्टोअर आणि AI क्षेत्रात फार कमी वेळात खूप लोकप्रियता मिळवली आहे. त्याची खासियत म्हणजे ते अतिशय जलद आणि विचारपूर्वक काम करते. DeepSeek दावा करतात की त्यांचा AI चॅटबॉट सर्वोत्कृष्ट आहे, परंतु त्यांनी OpenAI आणि Google सारख्या मोठ्या कंपन्यांपेक्षा DeepSeek तयार करण्यासाठी खूप कमी पैसे खर्च केले आहेत.