नवीन वर्षात Apple ची खास भेट! या दोन दिवसांसाठी Apple TV+ वर सर्व काही विनामूल्य उपलब्ध
अॅपल आपल्या युजर्ससाठी नेहमीच नवीन गिफ्ट घेऊन येत असतो. कंपनीचे काही गिफ्ट युजर्ससाठी फार मजेदार असतात. असंच एक खास गिफ्ट आता अॅपल पुन्हा एकदा घेऊन आला आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला टेक कंपनी ॲपल लोकांना एक मोठी भेट देणार आहे. कंपनीने जाहीर केले आहे, नवीन वर्षात युजर्सना 2 दिवस Apple TV+ मोफत पाहण्याची संधी मिळणार आहे. या दोन दिवसांच्या तारखा देखील कंपनीने जाहिर केल्या आहेत.
IRCTC DOWN: एका महिन्यात तिसऱ्यांदा ठप्प झाली IRCTC वेबसाईट, तिकीट बुक करण्यात येतात अडचणी
टेक जायंट कंपनी असणाऱ्या अॅपलने जाहीर केले आहे की वर्षाच्या पहिल्या वीकेंडला म्हणजे 4 आणि 5 जानेवारीला लोक Apple TV+ वर पूर्णपणे मोफत स्ट्रीम पाहू शकणार आहेत. 4 आणि 5 जानेवारीला Apple TV+ वर युजर्सना ॲपलचे ऑरिजनल चित्रपट आणि शो मोफत पाहण्याची संधी मिळणार आहे. 4 आणि 5 जानेवारीला Apple TV+ वरील शो पाहण्यासाठी युजर्सना कोणतेही पैसे देण्याची आवश्यकता नाही किंवा कोणतेही प्लॅन विकत घेण्याची गरज नाही. याचा अर्थ असा की वर्षाच्या पहिल्या वीकेंडला Apple TV+ वर वापरकर्ते पुरस्कार विजेते चित्रपट आणि शोचा मोफत आनंद घेऊ शकणार आहेत. (फोटो सौजन्य – pinterest)
Apple च्या मते, 4 आणि 5 जानेवारी रोजी, वापरकर्ते कोणत्याही सबस्क्रिप्शनशिवाय Apple Originals स्ट्रीम पाहण्यास सक्षम असतील. यासाठी त्यांना फक्त Apple TV+ ॲप ओपन करावे लागणार आहे. हे ॲप ॲपल डिव्हाईसवर आधीपासूनच इंस्टॉल आहे. हे ॲप लॅपटॉप, स्मार्टफोन आणि स्मार्ट टीव्ही इत्यादींवरही इंस्टॉल केले जाऊ शकते. त्यामुळे 4 आणि 5 जानेवारीला युजर्स कोणत्याही डिव्हाईसवर Apple TV+ इंस्टॉल करून मोफत स्ट्रीमिंगचा आनंद घेऊ शकणार आहेत.
आम्ही तुम्हाला सांगतो की सेव्हरेन्स सीझन 2, मिथिक क्वेस्ट आणि प्राइम टार्गेटसह अनेक ओरिजनल कंटेट या महिन्यात Apple TV+ वर सुरु होणार आहे. नवीन वर्षात युजर्सना हे शो पाहता यावेत, आणि या शोचा आनंद घेता यावा, यासाठी कंपनीने ही खास योजना आणली आहे.
Apple TV+ वर दोन दिवस मोफत स्ट्रीमिंगची ही पहिलीच वेळ आहे. कंपनीला आशा आहे की लोक या योजनेतील कंटेंट पाहून नवीन प्लॅन खरेदी करतील. यासोबतच कंपनी या ॲपच्या नवीन सदस्यांसाठी 7 दिवसांच्या फ्री-ट्रायलचा प्रचार करत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की कंपनी कोणत्याही नवीन Apple डिव्हाइसच्या खरेदीवर 3 महिन्यांसाठी Apple TV+ चे मोफत सबस्क्रिप्शन देत आहे.
Google Map Update: गुगल मॅपमुळे आपण चुकीच्या ठिकाणी कसं पोहोचतो? काय आहेत कारण?
भारतात Apple TV+ चा मंथली प्लॅन 99 रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. हा प्लॅन 195 रुपयांच्या Apple One प्लॅनमध्ये देखील समाविष्ट आहे. या प्लॅनमध्ये Apple TV+ सोबत, 200GB iCloud डेटा, Apple Arcade आणि Apple Music चे सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहे. त्यामुळे युजर्सना कमी खर्चात Apple TV+ सोबतच अनेक गोष्टींचा आनंद घेता येणार आहे.