Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Upcoming iPhone: 2025 मध्ये लाँच होणार Apple चे 5 नवे iPhone, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स

2025 मध्ये एकूण 5 नवीन आयफोन मॉडेल्स लाँच करणार आहेत. 2025 मध्ये, अ‍ॅपल iPhone SE 4 हा स्वस्त आयफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. या आयफोनची लाँच डेट आणि किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 21, 2025 | 12:05 PM
Upcoming iPhone: 2025 मध्ये लाँच होणार Apple चे 5 नवे iPhone, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स

Upcoming iPhone: 2025 मध्ये लाँच होणार Apple चे 5 नवे iPhone, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स

Follow Us
Close
Follow Us:

टेकजायंट कंपनी अ‍ॅपलने 2024 च्या सप्टेंबर महिन्यात iPhone 16 सिरीज लाँच केली होती. या सिरीजला युजर्सचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता यंदा 2025 मध्ये कंपनी त्यांचे 5 नवीन आयफोन लाँच करणार असल्याचं समोर आलं आहे. कंपनी यंदा मार्चपासून, नवीन Macs, iPads आणि iPhones सिरीज लाँच करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे यंदा कोणते आयफोन लाँच होणार आणि त्यांची किंमत काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महागड्या रिचार्जची चिंता सोडा! केवळ 20 रुपयांत अ‍ॅक्टिव्ह राहणार दुसरं सिम; Jio, Airtel, Vi यूजर्सना TRAI चा दिलासा

लीक झालेल्या रिपोर्ट्सनुसार, 2025 मध्ये एकूण 5 नवीन आयफोन मॉडेल्स लाँच केले जातील, जे पूर्वीपेक्षा अधिक अपग्रेड आणि प्रगत वैशिष्ट्यांसह सुसज्ज असतील. त्यांची किंमत काय असेल याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र यातील एक आयफोन अतिशय स्वस्त किंमतीत लाँच केला जाणार आहे. अ‍ॅपलने घोषणा केली आहे की, ते त्यांचा स्वस्त आयफोन लवकरच लाँच करणार आहेत. त्यामुळे हा आयफोन 2025 मध्ये लाँच केला जाऊ शकतो, अशी आशा आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

हे पाच iPhone 2025 मध्ये लाँच होणार

2025 मध्ये लाँच होणाऱ्या आयफोनमध्ये iPhone SE 4, आयफोन 17, आयफोन स्लिम किंवा एअर, iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max यांचा समावेश असणार आहे. या आयफोन्सचे अपेक्षित स्पेसिफिकेशन्स शेअर करण्यात आले आहेत, त्याबद्दल जाणून घेऊया.

iPhone SE 4

2025 मध्ये, अ‍ॅपल आपल्या ग्राहकांना iPhone SE 4 सह एक मोठे सरप्राईज देणार आहे, ज्याला iPhone 16E म्हणून देखील ओळखले जाऊ शकते. आतापर्यंत SE मॉडेल्सनी ग्राहकांच्या मनावर अपेक्षित छाप सोडली नव्हती, परंतु यावेळी Apple नवीन आणि आधुनिक डिझाइन लाँच करणार आहे. हा कंपनीचा सर्वात स्वस्त आयफोन असणार आहे. हा बजेट आयफोन फेस आयडीला सपोर्ट करेल आणि त्यात अ‍ॅपलच्या नवीन एआय तंत्रज्ञानाचाही समावेश असेल. याशिवाय, यात सिंगल रियर कॅमेरा असेल आणि त्याची किंमत जवळपास 600 डॉलर म्हणजेच सुमारे 48,600 रुपये असण्याची शक्यता आहे. ज्या वापरकर्त्यांना कमी किंमतीत स्मार्ट फीचर्स हवे आहेत त्यांच्यासाठी हा आयफोन उत्तम पर्याय ठरू शकतो.

iPhone 17

iPhone 17 ची लाँच डेट अद्याप शेअर करण्यात आली नसली तरी त्याच्या वैशिष्ट्यांबद्दल चर्चा आधीच सुरु झाली आहे. लीकनुसार, आयफोन 17 चे बेस मॉडेल प्रोमोशन डिस्प्ले आणि हाय रिफ्रेश रेट सपोर्टसह येईल. याशिवाय, iPhone 17 च्या बेस मॉडेलमध्ये प्रो-लेव्हल चिपसेट आणि कॅमेरा अपग्रेड देखील समाविष्ट असणार आहेत. हे लीक खरे असल्यास, आयफोन 17 एक शक्तिशाली अपग्रेड असल्याचे सिद्ध होऊ शकते.

iPhone Slime किंवा Air

अ‍ॅपल आयफोन प्लस मॉडेल बंद करू शकते आणि नवीन आयफोन स्लिम किंवा एअर लाँच सादर करू शकते, जे उत्कृष्ट डिझाइनसह येऊ शकते. आयफोन स्लिम व्हेरिअंट 5.5 मिमी स्लिम बॉडी आणि सिंगल रियर कॅमेरासह येईल, ज्यामुळे तो अ‍ॅपलचा सर्वात स्लिम आयफोन ठरणार आहे. तथापि, बॅटरीचा आकार लहान असू शकतो. या स्टायलिश आणि प्रीमियम स्मार्टफोनची किंमत 1 लाख रुपयांपेक्षा जास्त असू शकते.

Google Pixel vs iPhone: टेक कंपन्यांच्या एक्सपर्ट्सची या महागड्या स्मार्टफोन्सना पसंती, फोटो पाहून व्हाल हैराण

iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max

2025 मध्ये अ‍ॅपल iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max हे दोन फोन देखील लाँच करणार असल्याचं सांगितलं जात आहे. जे उत्तम अपग्रेडसह येऊ शकतात. नवीन डिस्प्ले तंत्रज्ञानासह, या फोनमध्ये अंडर-डिस्प्ले कॅमेरा असू शकतो, तर कॅमेरा सिस्टममध्ये पेरिस्कोप लेन्ससारखे मोठे बदल देखील दिसू शकतात. या शक्तिशाली वैशिष्ट्यांसह, आयफोन 17 प्रो व्हेरिअंटची किंमत वाढण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे ते आणखी प्रीमियम आणि हाय-एंड डिव्हाइसेस बनू शकतात.

Web Title: Tech news apple will launch 5 new iphone in 2025 know the specifications in details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2025 | 12:05 PM

Topics:  

  • Tech News

संबंधित बातम्या

14,999 रूपयांच्या किमतीत लाँच झाला ‘हा’ 5G फोन, 5000mAh बॅटरीसह 64MP कॅमेरा; वाचा वैशिष्ट्य
1

14,999 रूपयांच्या किमतीत लाँच झाला ‘हा’ 5G फोन, 5000mAh बॅटरीसह 64MP कॅमेरा; वाचा वैशिष्ट्य

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा
2

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल
3

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर
4

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.