Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Assembly Election: दिल्ली विधानसभेसाठी निवडणूक आयोग सज्ज, मतदारांच्या सोयीसाठी लाँच केलं QMS App

दिल्ली विधानसभेचा निवडणूक प्रचार सोमवारी संध्याकाळी सहा वाजता संपला. आता निवडणूक रॅली आणि जाहीर सभा होणार नाहीत. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होईल.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 04, 2025 | 11:09 AM
Delhi Assembly Election: दिल्ली विधानसभेसाठी निवडणूक आयोग सज्ज, मतदारांच्या सोयीसाठी लाँच केलं QMS App

Delhi Assembly Election: दिल्ली विधानसभेसाठी निवडणूक आयोग सज्ज, मतदारांच्या सोयीसाठी लाँच केलं QMS App

Follow Us
Close
Follow Us:

दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 साठी उद्या म्हणजेच 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. यावेळी मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी निवडणूक आयोग तयारी करत आहे. निवडणूक आयोगाने मतदारांच्या सोयीसाठी एक नवीन अ‍ॅप लाँच केलं आहे, ज्यामुळे मतदारांना अनेक प्रकारे फायदा होणार आहे. लोकांना मतदान करणे सोपे व्हावे म्हणून, यासाठी अनेक व्यवस्था केल्या जातात. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आयोगाने एक नवीन QMS अ‍ॅप लाँच केले आहे, ज्याच्या मदतीने मतदारांना बूथवरील बरीच माहिती उपलब्ध होणार आहे.

फोटो आणि व्हिडिओ क्लिक करताना GPS बंद करणं आहे गरजेचं, काय आहे यामागील कारण? जाणून घ्या

QMS-अ‍ॅप

दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 च्या मतदानापूर्वी दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी QMS अ‍ॅप लाँच केले आहे. मतदारांना मतदानावेळी कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी हे नवीन अ‍ॅप लाँच करण्यात आलं आहे. या अ‍ॅपद्वारे वापरकर्ते कोणत्याही मतदान केंद्राबाहेरील रांगेबद्दल अपडेट मिळवू शकतात. मतदानावेळी आपल्याला मतदान केंद्राबाहेर किती काळ वाट पाहावी लागणार आहे, मतदान केंद्राबाहेर किती रांग आहे, याबाबत QMS अ‍ॅपवरून माहिती मिळणार आहे. यासोबतच त्यांना या अ‍ॅपद्वारे मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्याचा मार्गही मिळेल. (फोटो सौजन्य – X)

मोबाईल आणि लॅपटॉप वापरकर्त्यांसाठी उपलब्ध

निवडणूक आयोगाने QMS अ‍ॅप अँड्रॉइड मोबाईल आणि लॅपटॉपसाठी उपलब्ध करून दिले आहे. हे QMS-अ‍ॅप कोणताही डेटा गोळा करत नाही किंवा कोणत्याही तृतीय पक्षासोबत डेटा शेअर करत नाही. ते गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करता येते. निवडणूक आयोगाने या अ‍ॅपला ‘तुमचा मतदान दिवसाचा साथीदार!’ असे नाव दिले आहे.

🚨📢 Voting Made Easier Queue Management Solution(QMS) at Polling Stations for Delhi Assembly Election 2025!

🗳The QMS mobile app enhances your voting experience by offering live:-

1. Queue Updates:
Real-time status of queues at
your polling station

2. Estimated Waiting Time:… pic.twitter.com/JbweE4tHet

— DCP OUTER DELHI (@dcpouter) January 31, 2025

हे असतील फायदे

या अ‍ॅपचे एकाच वेळी अनेक फायदे होणार आहेत. त्याच्या मदतीने, मतदारांना मतदान केंद्राबाहेर किती वेळ घालवता येईल हे कळू शकेल. अशा परिस्थितीत, मतदार संपूर्ण योजना आखून घराबाहेर पडेल. त्याला मतदान केंद्राबाहेर असणाऱ्या रांगेचीही माहिती मिळणार आहे. जर केंद्रावर लांब रांग असेल तर मतदार त्याचे इतर काम पूर्ण करून मतदान केंद्रावर पोहोचू शकतो. नेव्हिगेशनमुळे, त्याला मतदान केंद्राकडे जाण्यासाठी कोणालाही रस्ता विचारण्याचीही गरज भासणार नाही.

दिल्ली विधानसभा निवडणुक

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार सोमवारी संध्याकाळी 5 वाजता संपला. आता 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार केला. अनेक नेत्यांनी रोड शोच्या माध्यमातून मतदारांची मने जिंकण्याचा प्रयत्न केला. बुधवारी, दिल्लीतील हाय प्रोफाइल जागा नवी दिल्ली, कालकाजी, विश्वास नगर आणि जंगपुरा या सर्व 70 विधानसभा जागांसाठी एकाच वेळी मतदान होणार आहे.

AI वापरून Hackers करतायत प्लॅन! सर्वात मोठ्या सायबर अटॅकची तयारी सुरु, 250 करोड Gmail अकाउंट्स धोक्यात

दिल्ली केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या मते, राजधानीतील 13,766 मतदान केंद्रांवर 1.56 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील, त्यापैकी 83.76 लाख पुरुष आणि 72.36 लाख महिला मतदार आहेत. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, मतदान बुधवार, 5 फेब्रुवारी रोजी होईल. दिल्लीत मतदान प्रक्रिया या दिवशी सकाळी 7 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालेल. तथापि, जे लोक संध्याकाळी 5 वाजल्यानंतरही मतदानासाठी रांगेत उभे आहेत त्यांनाही मतदान करण्याची संधी मिळेल. निवडणूक आयोगाने मतदानादरम्यान कोणत्याही प्रकारच्या एक्झिट पोल सर्वेक्षणावर बंदी घातली आहे.

Web Title: Tech news election commission launched new app qms app for delhi assembly election which help voters

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2025 | 11:08 AM

Topics:  

  • Delhi Assembly Election
  • Tech News

संबंधित बातम्या

Free Fire Max: यूनिक Gloo Wall Skin फ्रीमध्ये मिळवण्याची हीच योग्य संधी, नवीन कोड्स क्लेम करताच मिळणार भरगोस रिवॉर्ड्स
1

Free Fire Max: यूनिक Gloo Wall Skin फ्रीमध्ये मिळवण्याची हीच योग्य संधी, नवीन कोड्स क्लेम करताच मिळणार भरगोस रिवॉर्ड्स

तुम्हीही Google Pay वरून फक्त पेमेंट करताय? हे 5 हिडन फिचर्स वाचून तुम्हीही व्हाल चकित
2

तुम्हीही Google Pay वरून फक्त पेमेंट करताय? हे 5 हिडन फिचर्स वाचून तुम्हीही व्हाल चकित

Airtel घेऊन आलाय खास प्लॅन, 200 रुपयांहून कमी किंमतीत मिळणार 15GB डेटा! 90 दिवसांसाठी मिळणार JioHotstar सब्सक्रिप्शन
3

Airtel घेऊन आलाय खास प्लॅन, 200 रुपयांहून कमी किंमतीत मिळणार 15GB डेटा! 90 दिवसांसाठी मिळणार JioHotstar सब्सक्रिप्शन

OTP न मागताच स्कॅमर्स रिकामं करणार तुमचं बँक अकाऊंट! लोकांना फसवण्याची ही आहे नवी पद्धत, असा होतो फ्रॉड
4

OTP न मागताच स्कॅमर्स रिकामं करणार तुमचं बँक अकाऊंट! लोकांना फसवण्याची ही आहे नवी पद्धत, असा होतो फ्रॉड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.