Google Pixel vs iPhone: टेक कंपन्यांच्या एक्सपर्ट्सची या महागड्या स्मार्टफोन्सना पसंती, फोटो पाहून व्हाल हैराण
20 जानेवारी रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यात जगभरातील नेत्यांसोबतच मोठ्या टेक कंपन्यांचे सीईओ आणि मालकही सहभागी झाले होते. मार्क झुकेरबर्ग, जेफ बेझोस, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई, एक्स मालक एलोन मस्क, ॲपलचे सीईओ टिम कुक इत्यादींनी या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली होती. कार्यक्रमात सुंदर पिचाई आणि एलोन मस्क फोन वापरताना दिसले. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर देखील प्रचंड व्हायरल झाला आहे. फोटोमुळे सुंदर पिचाई आणि एलोन मस्क कोणता फोन वापरतात हे उघड झालं आहे.
एलॉन मस्क आणि सुंदर पिचाई यांचा फोटो व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. एका फोटोत सुंदर पिचाई आणि इलॉन मस्क आपापल्या स्मार्टफोनकडे पाहताना दिसत होते. सुंदर पिचाई Google चा Pixel 9 फोन वापरत होते, तर एलोन मस्क iPhone 16 Pro वापरताना दिसत आहेत. (फोटो सौजन्य – X)
ज्या कंपन्यांचे प्रोडक्ट्स आपण वापरतो, त्या कंपन्या चालवणारे लोक कोणती प्रोडक्ट्स वापरतात हे जाणून घेण्यासाठी सामान्य लोकांना नेहमीच उत्सुकता असते. मस्कच्या फोनवरून पडदा पडला आहे. ट्रम्प यांच्या शपथविधी समारंभात मस्क आयफोन 16 प्रो वापरताना दिसला. हे ॲपलचे फ्लॅगशिप डिव्हाईस आहे आणि ते गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लाँच करण्यात आले होते. मस्ककडे असलेला आयफोन पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. कारण वास्तविक, अॅपल आणि ओपनएआय यांच्यातील भागीदारीमुळे मस्क खूश नव्हते. यामुळे त्यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या कंपन्यांमधील ॲपल उपकरणांवर बंदी घालणार असल्याचेही सांगितले होते.
These kids and their damn phones pic.twitter.com/J62IwNJgSh
— Morning Brew ☕️ (@MorningBrew) January 20, 2025
तथापि, एलॉन मस्क ॲपल फोन वापरत आहेत हे थोडे विचित्र आहे, कारण त्यांनी यापूर्वी ॲपल आणि ओपनएआयमधील भागीदारीबद्दल नाराजी व्यक्त केली होती. मस्कने म्हटले होते की जर ॲपलने ओपनएआयला त्याच्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये इंटीग्रेट केले तर मस्क त्यांच्या कंपन्यांमधील ॲपल उपकरणांवर बंदी घालतील. ॲपलचे डिव्हाईस दारात जमा केली जातील आणि सुरक्षेसाठी त्यांना खास पिंजऱ्यात ठेवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. मात्र आता मस्क स्वत: आयफोन वापरताना दिसला आहे.
स्मार्टफोनचा डेटा प्लॅन संपायला आलाय? आताच या टीप्स फॉलो करा, रिचार्ज करण्याची गरज नाही
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याकडेही आयफोन असेल, असा विचार तुम्ही करत असाल, तर तसे नाही. पिचाई स्वतःच्या कंपनीचे पिक्सेल डिव्हाईस वापरताना पाहायला मिळाले. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये सुंदर पिचाई यांच्या हातात Google Pixel 9 (Pixel 9 XL) असल्याचं पाहायला मिळत आहे. वास्तविक, एका चित्रात मस्क आणि पिचाई दोघेही एकाच वेळी त्यांचा फोन वापरताना दिसत होते. आम्ही तुम्हाला सांगतो की Pixel 9 कंपनीचा फ्लॅगशिप डिवाइस आहे. कंपनीच्या या फोनमध्ये AI असिस्टंट जेमिनी बिल्ट-इन आहे आणि तो इतर अनेक AI फीचर्सने सुसज्ज आहे.