18 वर्षांपूर्वी लाँच झाला होता पहिला iPhone! क्रांतिकारी ठरलं पहिलं मॉडेल, वाचा रोमांचक इतिहास
सध्या लोकांमध्ये आयफोनची प्रचंड क्रेझ आहे. आयफोनची किंमत प्रचंड आहे. मात्र तरी देखील आपल्याकडे आयफोन असावा असं अनेकांना वाटत. आयफोनची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. आयफोनची फोटो क्लिअॅरिटी, सिक्योरिटी फीचर्स या सर्वांमुळे आयफोन युजर्सच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. इतका लोकप्रिय असलेल्या आयफोनचं पहिलं मॉडेल कधी लाँच झाला, त्याचा इतिहास काय आहे, याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
पहिला आयफोन 9 जानेवारी 2007 ला लाँच झाला होता. हा एक टचस्क्रीन स्मार्टफोन होता, ज्यामध्ये कॅमेरा आणि वेब ब्राउझिंग सारख्या उच्च तंत्रज्ञानाची वैशिष्ट्ये होती. हा फोन त्यावेळी 2G नेटवर्कवर काम करत होता. पहिल्या आयफोन मॉडेलच्या लाँचिंग इव्हेंट दरम्यान, स्टीव्ह जॉब्सने आयफोनला एक क्रांतिकारी आणि जादुई डिव्हाईस म्हटले, जे त्यावेळी इतर स्मार्टफोनपेक्षा पाच वर्षे पुढे होते. (फोटो सौजन्य – pinterest)
आयफोन 1 मध्ये 3.5-इंच स्क्रीन, 2-मेगापिक्सेल कॅमेरा आणि, प्रथमच, कोणताही फिजिकल कीबोर्ड नव्हता. यात फोन, एक iPod आणि इंटरनेट कम्युनिकेटर एकत्र केले होते. याशिवाय, पहिल्या आयफोनमध्ये कॅपेसिटिव्ह टचस्क्रीन होती जी त्यावेळी क्रांतिकारक होती.
रिपोर्टनुसार, पहिला आयफोन लाँच झाला तेव्हा सर्व इंजिनीअर नर्वस आणि घाबरले होते. कारण जॉब्स जगासमोर पहिला आयफोन मंचावर लाँच करत होते. कारण, डेमो दाखवताना जर डिव्हाईसमध्ये काही बिघाड झाला असेल किंवा फोनने योग्य कामगिरी केली नाही तर नंतर त्यांना जॉब्सच्या रोषाला सामोरे जावे लागेल असते. परंतु, सर्व काही व्यवस्थित पार पडले, लाँच देखील यशस्वी झाले आणि नोव्हेंबर 2007 पर्यंत सुमारे 14 लाख आयफोन डिव्हाईस विकली गेली. त्यावेळी त्याची किंमत सुमारे 10.5 हजार रुपये होती.
आयफोनच्या निर्मितीच्या सुरुवातीला, स्टीव्ह जॉब्सने 9 महिन्यांत तयार केलेले डिझाइन नाकारले होते. हे 2005 च्या जवळपास घडले, आणि त्यानंतर 2007 मध्ये जगातील पहिला आयफोन रिलीज करण्यात आला. ॲपल टीमने सुरुवातीला iPod क्लिकव्हील इंटरफेसवर आधारित फोन तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले, परंतु जॉब्सने ठरवले की हा योग्य दृष्टीकोन नाही. त्याने टीमचे प्रयत्न मल्टी-टच स्क्रीन इंटरफेस वापरण्याच्या दिशेने वळवले, जे शेवटी आयफोनच्या क्रांतिकारी डिझाइनचा पाया बनले. आणि पहिल्या आयफोनने जगात क्रांती घडवून आणली.
प्रोजेक्ट पर्पल हे ॲपलच्या सीक्रेट डेवलपमेंट प्रोजेक्टचे कोडनेम होते ज्यामुळे शेवटी आयफोनची निर्मिती झाली. स्टीव्ह जॉब्सच्या दूरदृष्टीने प्रेरित होऊन 2004 मध्ये याची सुरुवात झाली. फोन, आयपॉड आणि इंटरनेट कम्युनिकेटर एका सीमलेस प्रोडक्टमध्ये एकत्रित करून जॉब्सला मोबाईल उपकरणांमध्ये क्रांती घडवायची होती. ॲपलला टचस्क्रीन डिवाइस तयार करायचे होते जे सोपे, पोर्टेबल आणि ग्राउंडब्रेकिंग होते. सुरुवातीला, हा प्रकल्प एका टॅब्लेटसाठी (जे नंतर आयपॅडमध्ये विकसित झाले) कल्पनेतून निर्माण झाला, परंतु बाजारातील संभाव्यतेमुळे फोकस फोनकडे वळला.
प्रकल्प गुप्त ठेवण्यासाठी, त्याला अंतर्गतरित्या ‘प्रोजेक्ट पर्पल’ असे संबोधण्यात आले आणि ॲपलचे अभियंते त्यांच्या मुख्यालयात पर्पल डॉर्म नावाच्या अत्यंत सुरक्षित इमारतीत काम करत होते.