Google Pixel Phone: गुगलच्या अपडेटमुळे Pixel युजर्सवर परिणाम, नुकसान भरपाईसाठी फ्रीमध्ये देणार ही सुविधा
टेक जायंट कंपनी आणि स्मार्टफोन कंपनी गूगलने 2020 मध्ये Pixel 4a स्मार्टफोन लाँच केला होता. या स्मार्टफोनची लोकांमध्ये प्रचंड क्रेझ होती. कंपनी या Pixel 4a स्मार्टफोनसाठी Android 13 हे शेवटचे सॉफ्टवेअर अपडेट रोलआऊट केले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा या स्मार्टफोनसाठी एक नवीन अपडेट रिलीज केलं जाणार आहं. हे अपडेट या आठवड्यात रिलीज केलं जाणार असल्याची माहिती आहे.
खोल समुद्रात बुडलेला फोन सापडला, या फीचरमुळे लागला मालकाचा शोध! घटना वाचून तुम्हीही व्हाल हैराण
कंपनीने माहिती दिली आहे की, या आठवड्यात Pixel 4a डिव्हाइसेससाठी नवीन अपडेट रिलीज केलं जाणार आहे. या नवीन सॉफ्टवेअर अपडेटमुळे जुन्या Pixel स्मार्टफोनमध्ये बॅटरी परफॉर्मंस सुधारणार आहे. मात्र कंपनीने सांगितलं आहे की, काही Pixel 4a फोनमध्ये हे अपडेट बॅटरीची क्षमता कमी करू शकते आणि चार्जिंग परफॉर्मंसवर परिणाम करू शकते. नवीन अपडेटमुळे ज्या युजर्सवर परिणाम होणार आहे, अशा युजर्सना कंपनी भरपाई देखील देत आहे. अपडेटमुळे स्मार्टफोनवर परिणाम झालेल्या Pixel युजर्सना कंपनी फ्रीमध्ये बॅटरी बदलण्याची सुविधा देणार आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
गूगलच्या सपोर्ट पेजनुसार, Pixel 4a बॅटरी परफॉर्मंस प्रोग्राम अंतर्गत, गूगल 8 जानेवारीपासून सर्व Pixel 4a डिव्हाइसेसवर Android 13 ला ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर अपडेट जारी करणार आहे. गूगलने सांगितलं आहे की, काही मॉडेल्समध्ये हे अपडेट उपलब्ध बॅटरी क्षमता कमी करू शकते आणि चार्जिंग कार्यप्रदर्शनावर परिणाम करू शकते.
गूगलने म्हटले आहे, एकदा सॉफ्टवेअर अपडेट डाउनलोड झाल्यानंतर, ते लागू करण्यासाठी तुमचे डिव्हाइस स्वयंचलितपणे रीस्टार्ट होईल. या अपडेटमुळे स्मार्टफोनमधील बॅटरीची समस्या सोडवली जाईल आणि बॅटरीची स्टेबलिटी वाढून चार्जिंगसाठी लागणार वेळ कमी होईल. काही डिव्हाइसेसवर या अपडेटचा परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे संबंधित डिव्हाईसच्या बॅटरीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. अशावेळी प्रभावित युजर्स बॅटरी लेवल इंडिकेटरसारखे बदल नोट करू शकतात.
या Windows यूजर्सवर हॅकर्सची नजर, मोठा सायबर अटॅक होण्याची शक्यता! सुरक्षेसाठी आत्ताच करा हे काम
सर्व Pixel 4a युनिट्सना अपडेट मिळेल परंतु केवळ काहींनाच त्यांच्या बॅटरी कार्यक्षमतेत घट येऊ शकते. कमी झालेली बॅटरी क्षमता पाहता, प्रभावित Pixel 4a वापरकर्ते मोफत बॅटरी बदलण्याचा दावा करू शकतात. प्रभावित Pixel 4a युजर्स बॅटरी बदलण्यासाठी किंवा फोनसाठी एक वेळचे पेमेंट पर्यायांपैकी एकासाठी अर्ज करू शकतात. बॅटरी बदलण्याची सेवा भारत, युनायटेड स्टेट्स, कॅनडा, युनायटेड किंगडम, जर्मनी आणि सिंगापूरमधील वॉक-इन दुरुस्ती केंद्रांवर उपलब्ध आहे.
सर्व Pixel 4a डिव्हाइसेसना हे अपडेट मिळेल, परंतु काही डिव्हाइसेसवर याचा परिणाम होऊन बॅटरीची कार्यक्षमता कमी झाल्याचं दिसू शकते. बॅटरीची कमी झालेली क्षमता पाहता, गूगलने म्हटले आहे की प्रभावित Pixel 4a वापरकर्ते मोफत बॅटरी बदलण्याचा दावा करू शकतात. तुम्ही मोफत बॅटरी बदलण्याची निवड न केल्यास, तुम्ही गूगलच्या ऑनलाइन स्टोअरमधून नवीन Pixel फोनसाठी 50 डॉलर्स म्हणजेच अंदाजे 4,000 रुपये किंवा 100 डॉलर्स म्हणजेच अंदाजे 8,000 रुपयांचे एक-वेळ पेमेंट निवडू शकता.