IRCTC DOWN: एका महिन्यात तिसऱ्यांदा ठप्प झाली IRCTC वेबसाईट, तिकीट बुक करण्यात येतात अडचणी
भारतीय रेल्वेची अधिकृत तिकीट बुकींग वेबसाईट आज 31 डिसेंबर रोजी पुन्हा एकदा डाऊन झाली आहे. ही वेबसाईट या महिन्यात आज तिसऱ्यांदा डाऊन झाली आहे. यामुळे युजर्सनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिन्ही वेळा ही वेबसाईट सकाळच्या वेळेस डाऊन झाली आहे आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तत्काळ तिकीट बुकिंगच्या वेळीच IRCTC साईट डाउन होते. यामुळे युजर्सनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे.
Google Map Update: गुगल मॅपमुळे आपण चुकीच्या ठिकाणी कसं पोहोचतो? काय आहेत कारण?
अनेकांनी भारतीय रेल्वे आणि IRCTC ला टॅग करत सोशल मिडीयावर पोस्ट शेअर केल्या आहेत. तसेच अनेकांनी मिम्स देखील शेअर केले आहेत. प्रत्येक वेळी IRCTC वेबसाईट तात्काळ तिकीट बुकींग वेळीच कशी डाऊन होऊ शकते, अशी शंका आता अनेकांनी उपस्थित केली आहे. आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर सध्या देखभालीचे काम सुरू असल्याचा मॅसेज अनेक युजर्सना मिळत आहे. त्यामुळे पुढील 1 तासासाठी बुकिंग होणार नाही. रेल्वे तिकीट बुकिंग वेबसाईट डाऊन होण्याची या महिन्यातील ही तिसरी वेळ आहे. (फोटो सौजन्य – X)
याआधी 9 डिसेंबर 2024 रोजी देखील IRCTC वेबसाइट दोन तास ठप्प झाली होती, त्यामुळे लोकांना तिकीट बुक करण्यात अडचण आली होती. आज, नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला, लोक सहलींचे नियोजन करत आहेत आणि दरम्यान, बुकिंग ठप्प झाले आहे. रेल्वेने अद्याप कोणतेही उत्तर दिलेले नाही. याआधीही रेल्वेने कोणतेही उत्तर दिले नव्हते.
@IRCTCofficial @RailMinIndia @amofficialCRIS What kind of nonsense is this during tatkal booking? No Captcha, on clicking reload showing unable to perform transaction 🤦♂️and down again #tatkal #IRCTC pic.twitter.com/ekZIawAwyi
— TheRailAnalyst (@theRailAnalyst) December 31, 2024
सोच रही हूं new year पार्टी करने “गोवा” जाऊ
लेकिन रेलवे ने तो धोखा हो दे दिया 🥺🥺IRCTC down. No Tatkal bookings#IRCTC #Tatkal
pic.twitter.com/K3v7ERxA8k— दिव्या कुमारी (@divyakumaari) December 31, 2024
#IRCTC app and web both crashed, captcha server crashed, they should stop using captcha2.0 and move to cloud, in today’s cloud world why they use datacenter and servers and try becoming phantom to do all in-house idk. This is totally un-acceptable. @RailMinIndia @IRCTCofficial… pic.twitter.com/ZoqejeRR3Z
— Akshay Shah – Founder CEO, iWebTechno | GenZDealZ (@AkshayiWeb) December 31, 2024
My money has been deducted by time of 10:02am for tatkal but still its showing processing payement , irctc is joke @IRCTCofficial @RailMinIndia
If this is the case you cant manage the website then delete the website man everyday there is issue during tatkal hours #irctcdown pic.twitter.com/k8lENvyEez— shreyas desai (@shreyas2610) December 31, 2024
Nowadays IRCTC has become a huge mafia. Just at the time of Tatkal, the site goes down into maintenance. By the time site reopens, there won’t be any tickets available. WTH is this IRCTC? @IRCTCofficial @RailMinIndia @RailwaySeva #IRCTC #railway pic.twitter.com/K1d5ti55qu
— Indian Cricket Bhakt (@BeingAncientBC) December 31, 2024
भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) च्या वेबसाइटवर आज 31 डिसेंबर 2024 रोजी पुन्हा समस्या निर्माण झाल्या आहेत. ज्यामुळे युजर्सना तिकीट बुक करण्यात अडचणी येत आहेत.तत्काळ तिकीट बुकिंग दरम्यान ही समस्या सकाळी 10 च्या सुमारास सुरू झाली. गेल्या आठवड्यातही आयआरसीटीसीच्या सर्व्हरमध्ये अशीच चूक झाली होती. सर्व्हर बंद झाल्यामुळे देशभरातील वापरकर्ते तिकीट बुक करू शकले नाहीत. आज पुन्हा हीच समस्या निर्माण झाली आहे.
POCO X7 सीरीज ची लाँच डेट कन्फर्म, फास्ट परफॉर्मेंस आणि दमदार स्पेक्सने सुसज्ज
IRCTC वेबसाईट ओपन करताच, ‘बुकिंग आणि तिकीट रद्द करणे पुढील एक तासासाठी उपलब्ध होणार नाही. या गैरसोयीबद्दल क्षमस्व.’ असा मॅसेज दिसत आहे. शिवाय ‘तिकीट/फाइल टीडीआर रद्द करण्यासाठी, कृपया कस्टमर केअर क्रमांक 14646,08044647999 आणि 08035734999 वर कॉल करा किंवा etickets@irctc.co.in वर मेल करा.’ असं देखील सांगण्यात आलं आहे.