WhatsApp सिक्योरिटीचा दावा खोटा? मार्क झुकरबर्गच्या या उत्तराने वाढलं करोडो यूजर्सचं टेंशन
जगातील प्रत्येक स्मार्टफोन युजर व्हॉट्सॲपचा वापर करतो. व्हॉट्सॲप हे जगात सर्वाधिक वापरले जाणारे इन्स्टंट मॅसेजिंग ॲप आहे. व्हॉट्सॲपचे जगात करोडो युजर्स आहेत, ज्यांची संख्या 295 कोटींहून अधिक आहे. व्हॉट्सॲप त्यांच्या युजर्ससाठी अनेक नवीन फीचर्स रोलआऊट करत असते, यामध्ये अनेक सिक्योरिटी फीचर्स देखील असतात. व्हॉट्सॲपच्या या सिक्योरिटी फीचर्समुळे युजर्सचे चॅट्स सुरक्षित राहतात, असा दावा कंपनीकडून नेहमी केला जातो.
या सर्व सिक्योरिटी फीचर्सशिवाय व्हॉट्सॲपमध्ये एंड-टू-एंड एन्क्रिप्शन नावाचे एक फीचर देखील आहे, ज्याच्या मदतीने युजर्सचे चॅट्स फक्त सेंडर आणि रिसिव्हर या दोघांपर्यंत मर्यादित असतात, असा दावा कंपनीकडून नेहमी केला जातो. मात्र आता व्हॉट्सॲपबाबत कंपनीने केलेला हा दावा खोटा आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याचं कारण म्हणजे मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी व्हॉट्सॲपच्या प्रायव्हसी आणि सिक्योरिटीबाबत एक विधान जारी केले आहे. यानंतर जगभरातील करोडो यूजर्स तणावाखाली आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
खरंतर, मार्क झुकरबर्गने 11 जानेवारी 2025 रोजी एका निवेदनात म्हटले आहे की CIA सारख्या अमेरिकन अधिकारी म्हणजेच सेंट्रल इंटेलिजेंस एजन्सी जर वापरकर्त्याच्या डिव्हाइसवर प्रत्यक्ष प्रवेश करत असतील तर ते युजर्सचे व्हॉट्सॲप चॅट्स वाचण्यास सक्षम असतील. त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की व्हॉट्सॲपचे एंड-टू-एंड एन्क्रिप्शन वापरकर्त्यांच्या गोपनीयतेची पूर्ण काळजी घेते. तथापि, जर एखाद्या एजन्सीला वापरकर्त्याच्या डिव्हाइसवर प्रवेश असेल तर त्याद्वारे ते व्हॉट्सॲप चॅट्समध्ये देखील प्रवेश करू शकतात. मार्क झुकरबर्गच्या या विधानामुळे ता व्हॉट्सॲप युजर्सची चिंता वाढली आहे.
जो रोगन एक्सपीरियन्स चॅनलवर केलेल्या पॉडकास्टमध्ये विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना मार्क झुकरबर्ग म्हणाला की, व्हॉट्सॲपचे एन्क्रिप्शन फीचर मेटा सर्व्हरसाठी आहे. यामध्ये मॅसेज, फाइल्स इत्यादी सर्व्हरद्वारे केले जाणारे संप्रेषण सुरक्षित ठेवले जाते, परंतु डिव्हाइस नाही. जर कोणत्याही सरकारी एजन्सीने वापरकर्त्याच्या डिव्हाइसमध्ये प्रवेश केला तर ते या डिव्हाइसद्वारे केलेल्या चॅट्समध्ये प्रवेश करू शकतात. म्हणजेच कोणत्याही एजंसीला स्मार्टफोन युजरच्या डिव्हाईसचा अॅक्सेस असेल तर संबंधित एजंसी युजरच्या व्हॉट्सॲपमध्ये देखील प्रवेश करू शकते.
तथापि, मेटा सीईओने असेही सांगितले की जर पिगासस सॉफ्टवेअर इत्यादीसारखे कोणतेही स्पायवेअर डिव्हाइसमध्ये इंस्टॉल केले असेल तर एजंसीला डिव्हाइसमध्ये प्रवेश असेल. अशा परिस्थितीत एजंसी व्हॉट्सॲप चॅटमध्ये प्रवेश करू शकतात. हे धोके लक्षात घेऊन, व्हॉट्सॲपवर अलीकडेच अनेक गोपनीयता वैशिष्ट्ये जोडण्यात आली आहेत, ज्यामध्ये अदृश्य संदेश इत्यादींचा समावेश आहे. हे वैशिष्ट्य विशिष्ट वेळी डिव्हाइसमधून चॅट हटवते. अशा स्थितीत व्हॉट्सॲप युजर्सच्या चॅट्ची प्रायव्हसी कायम राखली जाते.