Republic Day 2025: फक्त दोन दिवस बाकी! लवकरच सुरु होणार Realme चा रिपब्लिक डे सेल, या स्मार्टफोन्सवर जबदरस्त डिस्काऊंट
ई कॉमर्स कंपन्या फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनने त्यांच्या रिपब्लिक डे सेलची घोषणा केली आहे. या सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोन्स, ईअरबड्स, होम अप्लायंन्सेस अशा अनेक प्रोडक्ट्सवर डिस्काऊंट मिळणार आहे. यानंतर आता स्मार्टफोन कंपनी Realme ने देखील त्यांच्या रिपब्लिक डे सेलची घोषणा केली आहे. या Realme सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोन्स, ईअरबड्स, अशा अनेक डिव्हाईसवर डिस्काऊंट मिळणार आहे. ज्यामुळे त्यांना Realme चे अनेक डिव्हाईस कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
13 जानेवारीपासून भारतात Realme चा रिपब्लिक डे सेल सुरु होणार आहे. या सेलमध्ये, विविध Realme स्मार्टफोन्स आणि AIOT प्रोडक्ट्सवर ऑफर्स आणि डिस्काऊंट दिलं जाणार आहे. ही ऑफर केवळ मर्यादित वेळेपर्यंतच उपलब्ध असणार आहे. सेलमध्ये उपलब्ध असणाऱ्या ऑफर्स आणि डिल्स कंपनीच्या इंडिया वेबसाइट, Amazon आणि Flipkart द्वारे उपलब्ध असतील. (फोटो सौजन्य – pinterest)
Realme P2 Pro 5G वर सेलमध्ये 5,000 रुपयांपर्यंत सूट देण्यात येणार असल्याची पुष्टी करण्यात आली आहे. Realme Narzo 70 Turbo 5G आणि Realme GT 7 Pro हे दोन्ही स्मार्टफोन्स सेल दरम्यान प्रचंड डिस्काऊंटसह उपलब्ध असतील. Realme Buds T310 आणि Buds T110 वर देखील Realme प्रजासत्ताक दिनाच्या सेलमध्ये 500 रुपयांपर्यंत डिस्काऊंट दिलं जाणार आहे.
Realme स्मार्टफोन्स आणि AIoT प्रोडक्ट्सवरील ऑफर्स आणि डिस्काऊंट
आगामी Realme रिपब्लिक डे सेल दरम्यान, Realme P2 Pro 5G स्मार्टफोन 17,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध असणार आहे. स्मार्टफोनच्या नियमित सुरुवातीच्या किंमतीवर ही 4,000 रुपयांची सूट दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे, सेलमध्ये Realme GT 7 Pro ची सुरुवातीची किंमत 59,999 रुपयांऐवजी 54,999 रुपये असणार आहे. 16GB रॅम + 512GB स्टोरेजसह फोनचा टॉप-एंड व्हेरिएंट 59,999 रुपयांना उपलब्ध असेल, जो 65,999 रुपयांना लाँच करण्यात आला होता.
ग्राहक या आगामी सेलमध्ये 1,000 रुपयांच्या सवलतीसह Realme 14x खरेदी करू शकतील. Realme 14x स्मार्टफोन 13,999 रुपयांना उपलब्ध असणार आहे. Realme 13 Pro ग्राहकांना 26,999 रुपयांऐवजी 23,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. Realme Narzo 70 Turbo 5G चा बेस 6GB + 128GB व्हेरिअंट 16,999 रुपयांऐवजी 14,499 रुपयांच्या किंमतीसह विक्रीसाठी उपलब्ध असेल.
Realme GT 6T ची लाँच किंमत 30,999 रुपये आहे. मात्र सेलमध्ये तुम्ही Realme GT 6T हा 23,999 रुपयांना खरेदी करू शकता. फोनचा टॉप-एंड व्हेरिअंट 39,999 रुपयांना लाँच करण्यात आला होता. मात्र सेलमध्ये हा व्हेरिअंट 29,999 रुपयांना उपलब्ध होईल. Realme 13+ 5G स्मार्टफोन 20,999 रुपयांऐवजी 16,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो.
सेलमध्ये ग्राहकांना Realme Buds Air 6 वर 500 रुपयांची सूट मिळेल, ज्यामुळे त्याची किंमत 3,299 रुपयांऐवजी 2,799 रुपये होईल. त्याचप्रमाणे, ग्राहक Realme Buds T310 सेलमध्ये 2,199 रुपयांऐवजी 1,999 रुपयांना खरेदी करू शकतील. Realme Buds T110 ची किंमत 1,499 रुपयांऐवजी 1,099 रुपये असेल.
Realme चा प्रजासत्ताक दिन सेल 13 जानेवारी रोजी लाईव्ह होईल आणि अधिकृत Realme वेबसाइट, Amazon आणि Flipkart वर 19 जानेवारीपर्यंत चालेल. खरेदीदार रिटेल स्टोअर्सद्वारे Realme GT 7 Pro वर सवलत मिळवण्यास सक्षम असतील. Realme 14x आणि Realme 13 Pro 5G वर सवलतीचा लाभ स्टोअरद्वारे उपलब्ध होईल.