Sanchar Saathi: 'संचार साथी' लाँच, आता मोबाईलवरून चोरी आणि सायइबर फ्रॉडची तक्रार करणं होणार अधिक सोपं
सध्या चोरी आणि सायबर फ्रॉडच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दररोज चोरी आणि सायबर फ्रॉडच्या अनेक घटना ऐकायला मिळतात. या सर्व घटनांची तक्रार करण्यासाठी एक नवीन ॲप लाँच करण्यात आलं आहे. संचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी शुक्रवारी 17 जानेवारी रोजी संचार साथी ॲप लाँच केले आहे. सायबर फ्रॉड आणि चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेत हे नवीन ॲप लाँच करण्यात आलं आहे.
संचार साथी ॲपच्या मदतीने कोणताही ग्राहक मोबाइल फोनच्या माध्यमातून मोबाइल फोन चोरीपासून सायबर फ्रॉडपर्यंत कोणतीही तक्रार करू शकणार आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये फक्त संचार साथी ॲप डाउनलोड करायचे आहे. संचार साथी ॲप गुगल प्ले आणि ॲपल ॲप स्टोअर या दोन्हींवरून डाउनलोड करता येईल. तुम्हाला गुगल प्ले आणि ॲपल ॲप स्टोअरवर Sanchar Saathi सर्च करावं लागणार आहे. यानंतर पेजवर दिसणारे ॲप तुमच्या स्मार्टफोनमध्ये इंस्टॉल करा. आणि लॉग इन करून तुमची तक्रार करा. (फोटो सौजन्य – X)
संचार साथी ॲपच्या मदतीने ग्राहकाला त्याच्या नावाने जारी केलेल्या मोबाईल कनेक्शनची माहितीही मिळू शकणार आहे. अनेक वेळा ग्राहकांना त्यांच्या नावावर किती मोबाईल फोन कनेक्शन सुरू आहेत हे माहीत नसते. या सुविधेमुळे अनधिकृत मोबाईल कनेक्शनला आळा बसेल. ॲपच्या मदतीने मोबाईल हँडसेटची सत्यता सहज तपासता येते. तुम्ही ॲप वापरून संशयास्पद कॉल आणि एसएमएसची तक्रार देखील करू शकता.
ज्योतिरादित्य सिंधिया यांनी संचार साथी ॲपसह राष्ट्रीय ब्रॉडबँड मिशन 2.0 लाँच केले. ते म्हणाले की मिशन 2.0 चे प्राथमिक उद्दिष्ट हे सुनिश्चित करणे आहे की प्रत्येक 100 पैकी किमान 60 ग्रामीण कुटुंबांना ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहे. या अभियानांतर्गत, 2030 पर्यंत 2.70 लाख गावांमध्ये ऑप्टिकल फायबर केबल कनेक्टिव्हिटीचा विस्तार करण्याचे आणि ग्रामीण भागातील सर्व शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे, अंगणवाडी केंद्रे आणि पंचायत कार्यालये यासारख्या 90 टक्के संस्थांना ब्रॉडबँडने जोडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ग्रामीण भागात 100 एमबीपीएस इंटरनेट स्पीड साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे जेणेकरून ग्रामीण भारतात मजबूत डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करता येतील.
दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी शुक्रवारी सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशनच्या कार्यक्रमात सांगितले की, 5G सेवेचा विस्तार आणि 2030 पर्यंत 6G सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने, 2000MHz स्पेक्ट्रमची आवश्यकता असेल तर सध्या देशात 1100MHz स्पेक्ट्रम उपलब्ध आहे. हे पाहता 687 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रममध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
iPhone खरेदी करण्यासाठी Apple Store ला जाण्याची गरज नाही! कंपनीने लाँच केला नवीन App
ही सुधारणा विविध सरकारी मंत्रालयांकडे उपलब्ध असलेल्या स्पेक्ट्रममधून केली जाईल. या 687MHz स्पेक्ट्रमपैकी 328MHz स्पेक्ट्रम लिलावाद्वारे दूरसंचार कंपन्यांना तात्काळ उपलब्ध करून दिला जाईल. 687 MW च्या उपलब्धतेमुळे एकूण 1587MHz स्पेक्ट्रम उपलब्ध होईल आणि उर्वरित 413MHz स्पेक्ट्रम देखील 2030 पर्यंत 2000MHz स्पेक्ट्रमची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी शेड्यूलच्या आधी उपलब्ध करून दिला जाईल.