
ChatGPT सोबत केल्या जाणाऱ्या संभाषणावर कंपनीची नजर? प्रायव्हसी आणि डेटा सेफ्टीसंबंधित या गोष्टी जाणून घ्या
सध्याच्या काळात AI चॅटबोटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. प्रत्येकजण त्याच्या सोयीनुसार वेगवेगळ्या चॅटबोटचा वापर करतात. OpenAI चे ChatGPT हे जगभरातील सर्वाधिक वापरलं जाणारं AI चॅटबोट आहे. रोज करोडो युजर्स AI चॅटबोटचा वापर करतात. शिक्षणापासून अगदी व्यवसायांपर्यंत सल्ले घेण्यासाठी आणि फोटो एडीट करण्यापासून ते फोटो तयार करण्यासाठी अनेकजण AI चॅटबोटचा वापर करत असतात. तुम्ही देखील AI चॅटबोट चॅटजीपीटीचा वापर करता का?
असे अनेक युजर्स आहेत जे त्यांच्या विविध कामांसाठी चॅटजीपीटीचा वापर करतात. याशिवाय काही युजर्स चॅटजीपीटीसोबत त्यांच्या काही फाईल्स देखील शेअर करतात. त्यामुळे या फाईल्सचे आणि चॅटजीपीटीसोबत केल्या जाणाऱ्या संभाषणाचा वापर कसा केला जातो, याबाबत अनेकांच्या मनात शंका असते. आता आम्ही तुम्हाला चॅटजीपीटीच्या डेटा आणि प्रायव्हसीसंबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – Pinterest)
OpenAI च्या प्रायव्हसी पॉलिसीनुसार, ChatGPT सोबत केले जाणारे तुमचे संभाषण रिव्ह्यु केले जाऊ शकते. सिस्टम परफॉर्मेंस पाहणे किंवा दुरुपयोग थांबवण्यासाठी तुमचे संभाषण रिव्ह्यु केले जाऊ शकते.
OpenAI त्यांच्या मॉडेलेला ट्रेनिंग देण्यासाठी आणि मॉडेल अधिक चांगलं बनवण्यासाठी चॅटजीपीटीसोबत केले जाणऱ्या संभाषण आणि इनपुट डेटाचा वापर करू शकते. कंपनीची असं म्हणणं आहे की, कंपनी जरी डेटाचा वापर करत असली तरी देखील यामध्ये युजरची ओळख जाहीर केली जात नाही.
तुम्हाला गरज वाटल्यास तुम्ही ChatGPT च्या सेटिंगमध्ये जाऊन चॅट हिस्ट्री डिसेबल करू शकता. चॅट हिस्ट्री बंद करण्याचा फायदा असा आहे की, तुमचे संभाषण कंपनीच्या मॉडेलला ट्रेनिंग देण्यासाठी वापरले जाऊ शकत नाही. चॅट हिस्ट्रिशिवाय असणारे संभाषण 30 दिवसांनंतर सिस्टममधून कायमचे डिलीट होते.
ChatGPT यूजर्सकडे त्यांचे अकाऊंट आणि त्यासंबंधित जोडलेल डेटा डिलीट करण्याचा ऑप्शन आहे. युजर्सनी एकदा डेटा डिलीट केल्यानंतर हा डेटा सिस्टममधून देखील हटवला जातो आणि तो पुन्हा रिकव्हर केला जाऊ शकत नाही.
तुम्ही ज्या फाईल्स अपलोड करता ChatGPT कडे केवळ त्याच फाईल्सचा एक्सेस असतो. या अशा फाईल्स असतात, ज्या युजर्स संभाषणादरम्यान शेअर करतात. हे चॅटबोट डिव्हाईसवर स्टोअर करण्यात आलेल्या तुमच्या इतर फाईल्स एक्सेस करू शकत नाही. याशिवाय अपलोड करण्यात आलेल्या फाईल्स देखील ठरावीक काळानंतर सिस्टममधून डिलीट होतात.
Ans: ChatGPT हा OpenAI कंपनीने विकसित केलेला एआय (Artificial Intelligence) आधारित चॅटबॉट आहे जो मानवी भाषेत संवाद साधतो आणि प्रश्नांची उत्तरे देतो.
Ans: ChatGPT हा मोठ्या भाषा मॉडेलवर (Large Language Model) आधारित आहे. तो लाखो मजकुरातून शिकलेली माहिती वापरून वापरकर्त्याच्या प्रश्नांना उत्तर देतो.
Ans: होय, ChatGPT चा फ्री व्हर्जन उपलब्ध आहे. मात्र, अधिक फीचर्ससाठी ChatGPT Plus किंवा ChatGPT Pro सारख्या पेड प्लॅन्स घ्यावे लागतात.