गाणी ऐकण्याची मजा आता होणार दुप्पट! या सब्सक्राइबर्सना मिळणार 4 महिन्यांसाठी Apple Music चा फ्री अॅक्सेस, जाणून घ्या सविस्तर
Tata Play ने त्यांचा एंटरटेनमेंट पोर्टफोलियो आणखी मजबूत करण्यासाठी Apple Music सोबत पार्टनरशिप केल्याची घोषणा केली आहे. कंपनीने केलेल्या या नवीन भागिदारीचा उद्देश त्यांच्या सब्सक्राइबर्सना आणखी जास्त फायदे देणे असा आहे. कंपनीच्या या भागिदारीचा युजर्सना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. या भागिदारीनंतर कंपनी एक खास ऑफर घेऊन आली आहे. या ऑफरअंतर्गत युजर्सना Apple Music चे 4 महिन्यांचे सब्सक्रीप्शन मोफत मिळणार आहे.
कंपनीने त्यांच्या युजर्सना Apple Music च्या सर्विसचा अॅक्सेस एका एक्सक्लूसिव प्रमोशनल ऑफर अंतर्गत देत आहे. ही ऑफर Tata Play च्या सर्व प्लॅटफॉर्म्स जसे Binge, Mobile आणि Fiber वर उपलब्ध असणार आहे. या भागिदारीद्वारे युजर्स Apple Music च्या गाण्यांचे कलेक्शन आणि क्यूरेटेड प्लेलिस्ट्सचा आनंद घेऊ शकणार आहेत. टाटा प्लेच्या वाढत्या ग्राहक वर्गाला अधिक एकात्मिक आणि वैविध्यपूर्ण मनोरंजन अनुभव देण्याच्या दिशेने हे एक पाऊल आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Tata Play ने एका प्रेस रिलीजमध्ये सांगितलं आहे की, त्यांनी Apple Music सोबत नवीन पार्टनरशिप केली आहे. या भागिदारीअंतर्गत युजर्सना ठरावीक कालावधीसाठी Apple च्या म्यूजिक स्ट्रीमिंग सर्विसचा अॅक्सेस फ्री दिला जाणार आहे. हा कालावधी संपल्यानंतर युजर्सना ही सेवा वापरण्यासाठी 119 रुपये प्रतिमहिना खर्च करावे लागणार आहेत, जो कंपनीचा नियमित प्लॅन आहे. ही ऑफर Tata Play च्या सर्व प्लॅटफॉर्म्स जसे Tata Play Binge, Tata Play Mobile अॅप आणि Tata Play Fiber वर उपलब्ध आहे.
कंपनीच्या या नवीन भागिदारीअंतर्गत नवीन युजर्सना 4 महिन्यांसाठी Apple Music चे फ्री सब्सक्रिप्शन ऑफर केले जाणार आहे, तर जुन्या एलिजिबल यूजर्सना 3 महिन्यांसाठी फ्री ट्रायल दिला जाणार आहे. ही ऑफर Tata Play च्या सर्व DTH, OTT आणि ब्रॉडबँड कस्टमर्ससाठी लागू करण्यात आली आहे. ज्यामुळे त्यांना चाचणी कालावधी दरम्यान जास्तीचे पैसे खर्च न करता Apple Music चा फ्री अॅक्सेस मिळणार आहे.
ऑफर अॅक्टिवेट करण्यासाठी युजर्सना Tata Play अकाऊंटवरून एक प्रोमो कोड रिडीम करावा लागणार आहे. मोफत कालावधी संपल्यानंतर युजर्सना नियमित प्लॅन खरेदी करावा लागणार आहे. या भागीदारीचा उद्देश टाटा प्लेचे ग्राहक मूल्य वाढवणे आणि टीव्ही आणि ब्रॉडबँडच्या पलीकडे संगीत स्ट्रीमिंगपर्यंत मनोरंजनाचा अनुभव वाढवणे आहे. तसेच, यावर्षीच्या सुरुवातीला Apple ने TuneIn सह भागिदारी केली होती, ज्यामुळे त्यांचे सहा क्यूरेटेड रेडियो स्टेशन्स जगभरात पोहोचवले जाऊ शकतील. यामुळे Apple ने पहिल्यांदाच त्यांच्या अॅपच्या बाहेर रेडिओ सेवा उपलब्ध करून दिली.
Ans: Apple Music ही Apple कंपनीची एक म्युझिक स्ट्रीमिंग सेवा आहे, जिथे तुम्ही लाखो गाणी, पॉडकास्ट आणि रेडिओ स्टेशन ऐकू शकता.
Ans: होय, Apple Music वापरण्यासाठी मासिक सब्सक्रिप्शन घ्यावे लागते, पण नव्या युजर्सना काही काळासाठी फ्री ट्रायल मिळते.
Ans: भारतात सध्या Individual, Student आणि Family असे तीन मुख्य प्लॅन्स आहेत. किंमत 59 रुपयांपासून सुरू होते






