अरे व्वा! आता तुमचं WhatsApp अकाऊंट फेसबुक आणि इंस्टाग्रामसोबत करू शकता लिंक, काय आहे प्रोसेस?
व्हॉट्सॲपने त्यांच्या युजर्ससाठी अनेक अपडेट ॲड केले आहेत, जेणेकरून युजर्सना व्हॉट्सॲपचा वापर अधिक मजेदार वाटावा. यामध्ये असे अनेक अपडेट ज्याबद्दल युजर्सना माहिती नाही. अशाच एका अपडेटबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्ही तुमचं व्हॉट्सॲप अकाऊंट मेटाचे इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबूक आणि इंस्टाग्रामसोबत लिंक करू शकता. यासाठी तुम्हाला तुमचं व्हॉट्सॲप अकाउंट सेंटरशी लिंक करावं लागणार आहे. यासाठी सर्वात आधी तुम्हाला काही सोपी प्रोसेस फॉलो करावी लागणार आहे. यानंतर तुमचं व्हॉट्सॲप अकाऊंट इंस्टाग्राम आणि फेसबूकसोबत लिंक केलं जाईल.
या प्रोसेसनंतर तुम्ही व्हॉट्सॲप स्टेटस थेट फेसबुक किंवा इन्स्टाग्रांम स्टोरीवर शेअर करू शकता. ज्यामुळे तुम्ही एकाच अकाऊंटसह फेसबूक आणि इंस्टाग्रामसारख्या एकाधिक मेटा ॲप्सवर देखील लॉग इन करू शकता. हे वैशिष्ट्य तुमच्या आवडीनुसार काम करणार आहे. म्हणजेच तुम्हाला जेव्हा तुमचे व्हॉट्सॲप स्टेटस फेसबुक किंवा इन्स्टाग्रांम स्टोरीवर शेअर करण्याची इच्छा असेल तेव्हा हे अपडेट सुरु ठेवा, अन्यथा तुम्ही हे अपडेट बंद करू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)
या फीचरचा मुख्य उद्देश म्हणजे मेटाचे वेगवेगळे ॲप्स तुम्ही सहज वापरू शकता. तुम्ही जर अनेकदा व्हॉट्सॲपवर स्टेटस अपडेट करत असाल आणि फेसबूक आणि इंस्टाग्राम वापरत असाल तर तुम्ही या फीचरच्या मदतीने या प्लॅटफॉर्मवर व्हॉट्सॲप स्टेटस थेट शेअर करू शकता. तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी पोस्ट करण्याची गरज भासणार नाही, ज्यामुळे तुमचा वेळ आणि मेहनत वाचेल आणि तुम्ही तुमच्या मित्रांशी सहजपणे कनेक्ट राहू शकता.
सिंगल अकाउंट लॉगिन तुम्हाला व्हॉट्सॲप किंवा इतर मेटा ॲप्समध्ये सहजपणे लॉग इन करू देते, विशेषत: जेव्हा तुम्ही डिव्हाइस बदलता किंवा लॉग आउट करता. हे वैशिष्ट्य तुमच्या आवडीनुसार काम करत असले तरी, तुमचा अवतार मॅनेज करण्यासाठी आणि ॲप्सवर AI स्टिकर्स कस्टमाईज करण्यासाठी हे वैशिष्ट्य भविष्यात वापरण्याची मेटाची योजना आहे.
या अपडेटमुळे युजर्सची सुरक्षा धोक्यात येऊ शकते अशी शक्यता अनेकांनी वर्तवली होती, मात्र याबाबत मेटाने स्पष्टीकरण दिलं आहे. मेटा म्हणते की, युजर्सची गोपनीयता त्यांच्यासाठी खूप महत्वाची आहे. व्हॉट्सॲपमध्ये एंड-टू-एंड एन्क्रिप्शन आहे, याचा अर्थ तुमचे मॅसेज आणि कॉल सुरक्षित राहतात. खाते केंद्राशी कनेक्ट केल्याने तुमच्या सुरक्षिततेवर कोणताही परिणाम होणार नाही, असे कंपनीचे म्हणणे आहे.
बर्थ-डेथ सर्टिफिकेटसाठी रांगेत थांबण्याची गरज नाही! केवळ एक क्लिक आणि WhatsApp द्वारे होणार काम
हे वैशिष्ट्य हळूहळू जगभरात आणले जाईल, त्यामुळे वापरकर्त्यांनी वेळोवेळी त्यांचे व्हॉट्सॲप सेटिंग्ज तपासत राहावे.