Samsung Galaxy S25 Launch Live: असा असेल Samsung Unpacked Event, कोणते प्रोडक्ट्स होणार लाँच? जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर
Samsung Galaxy Unpacked S25 Launch Live : आज 22 जानेवारी रोजी टेक कंपनी आणि स्मार्टफोन कंपनी सॅमसंगचा यावर्षीचा पहिला आणि सर्वात मोठा ईव्हेंट म्हणजेच Samsung Unpacked Event आयोजित करण्यात आला आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये हा ईव्हेंट आयोजित केला जाणार आहे. या ईव्हेंटमध्ये अनेक नवीन प्रोडक्ट्स लाँच केले जाणार आहेत. हा ईव्हेंट सुरु होण्यासाठी अवघा काही वेळ शिल्लक आहे. या ईव्हेंटमध्ये कोणते स्मार्टफोन लाँच होणार, त्यांची किंमत काय असणार त्यांचे फीचर्स काय असतील याबद्दल सर्वचजण फार उत्सुक आहेत. तुम्ही हा ईव्हेंट घरबसल्या लाईव्ह देखील पाहू शकता.
22 Jan 2025 02:50 PM (IST)
Samsung आज लाँच होणाऱ्या S25 अल्ट्रामध्ये 200MP मुख्य कॅमेरा दिला जाऊ शकतो. असेही अनुमान आहेत की ते 8K व्हिडिओ रेकॉर्डिंगला समर्थन देऊ शकते. लाँच होण्याआधीच याने Apple च्या iPhone 16 Pro Max च्या कॅमेऱ्याशी स्पर्धा सुरू केली आहे. iPhone 16 Pro मालिकेत 48 MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा, 4K 120fps व्हिडिओ रेकॉर्डिंगसह अनेक शक्तिशाली वैशिष्ट्ये आहेत. अशा परिस्थितीत S25 Ultra ला खडतर स्पर्धेला सामोरे जावे लागेल.काही लीक्समध्ये असे सांगण्यात आले आहे की Samsung S25 Ultra मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप असेल, ज्यामध्ये नवीन सेन्सर्स दिले जातील.
22 Jan 2025 02:25 PM (IST)
दक्षिण कोरियामध्ये, लोक दरमहा 4.09 US डॉलर म्हणजेच सुमारे 350 रुपये देऊन 12 किंवा 24 महिन्यांसाठी Galaxy S25 स्मार्टफोन वापरू शकतात. म्हणजेच सुमारे 4,200 रुपयांमध्ये Galaxy S25 स्मार्टफोनचा वर्षभरासाठी आनंद घेऊ शकतील. या सेवेच्या सर्व अटींची माहिती अद्याप समोर आलेली नाही. एखाद्या वापरकर्त्याने Galaxy S25 एक वर्ष वापरल्यानंतर परत केल्यास, त्याला त्याच्या किंमतीच्या 50 टक्के क्रेडिट दिले जाईल. म्हणजेच पुढच्या S-सिरीजच्या फोनवर त्याला तेवढ्याच रकमेची सूट मिळेल.
22 Jan 2025 02:11 PM (IST)
काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की, सॅमसंग आज होणाऱ्या कार्यक्रमात प्रोजेक्ट Moohan XR हेडसेटचे डिझाईन सर्वांना आश्चर्यचकित करू शकते. कंपनीने याच महिन्यात या XR हेडसेटचा खुलासा केला होता. सॅमसंगने हे क्वालकॉम आणि गुगलच्या भागीदारीत बनवले आहे. यात गुगलची अँड्रॉइड एक्सआर ऑपरेटिंग सिस्टिम वापरण्यात आली आहे. प्रोसेसर म्हणून यात क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन XR2 Gen 2 चिपसेट दिला जाऊ शकतो. सॅमसंगचे हे आगामी उपकरण Apple च्या Vision Pro आणि Meta's Quest 3 शी स्पर्धा करेल. हे Find My Device आणि टू ॲप व्ह्यूइंग मोडला सपोर्ट करेल.
22 Jan 2025 01:42 PM (IST)
सॅमसंगने दक्षिण कोरियामध्ये AI सबस्क्रिप्शन क्लब सुरू केला आहे. यामध्ये युजर्स कंपनीचे AI पॉवर्ड होम अप्लायन्सेस भाड्याने घेऊ शकतात. आता त्यात स्मार्टफोन आणि टॅबलेटचा समावेश करण्यात आला आहे. ही सदस्यता सेवा 24 जानेवारीपासून सुरू होणार आहे. यामध्ये, फोनची आगाऊ किंमत भरण्याऐवजी, वापरकर्त्याला मासिक आधारावर शुल्क भरावे लागणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
22 Jan 2025 01:35 PM (IST)
Galaxy S25 'स्लिम' पातळ स्वरूपात येईल. 6.7-इंच किंवा 6.8-इंच डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता आहे आहे, जी S25+ वर देखील असण्याची अपेक्षा आहे. स्मार्टफोनमध्ये 200MP Samsung ISOCELL HP5 प्राथमिक कॅमेरा, 50MP ISOCELL JN5 अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 3.5x ऑप्टिकल झूमसह 50MP टेलिफोटो लेन्स असू शकतो. स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेटसह 12 जीबी रॅमसह लाँच होण्याची अपेक्षा आहे. हा फोन Android 15 आधारित One UI 7 वर चालेल.
22 Jan 2025 01:13 PM (IST)
Galaxy S25 स्लिम मॉडेल फक्त 39 देशांमध्ये लाँच केलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या यादीत अमेरिका आणि अमेरिकेची नावे नाहीत. भारतीय वापरकर्त्यांसाठी चांगली गोष्ट अशी आहे की येथे देखील Galaxy S25 स्लिम मॉडेल लाँच करण्याची तयारी सुरू आहे. ज्या मार्केटमध्ये हे लाँच केले जाणार आहे त्यामध्ये ऑस्ट्रेलिया, क्रोएशिया, इजिप्त, फ्रान्स, कझाकस्तान, फिलीपिन्स, सिंगापूर, थायलंड, यूके आणि व्हिएतनाम या देशांचा समावेश आहे.
22 Jan 2025 12:44 PM (IST)
Samsung Galaxy S25 Series आज लाँच होणार आहे. आता सॅमसंगच्या नवीन सीरिज लाँच होण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. सर्वजण नवीन सिरीजच्या लाँचची अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र नवीन सिरीज लाँच होण्यापूर्वी कंपनीच्या जुन्या स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी घट झाली आहे. Samsung Galaxy S25 Series फोन लाँच होण्यापूर्वी सॅमसंगचा आणखी एक फ्लॅगशिप फोन स्वस्त किंमतीत खरेदी करण्याची ही उत्तम संधी आहे. वास्तविक, यावेळी तुम्हाला Samsung Galaxy S24 कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. Samsung Galaxy S24 Ultra भारतात 1,34,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला होता, परंतु सध्या तो सॅमसंगच्या ऑनलाइन स्टोअरवर 1,21,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
22 Jan 2025 12:28 PM (IST)
आतापर्यंत कंपनीकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, परंतु काही रिपोर्ट्समध्ये असे सांगण्यात आले आहे की हा फोन 5,000mAh बॅटरीसह लाँच केला शकतो. बॅटरीच्या बाबतीत, S24 Ultra च्या तुलनेत अपग्रेड मिळण्याची शक्यता कमी आहे. Galaxy S25 Ultra हा टॉप-एंड फ्लॅगशिप असू शकतो. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेटसह 6.8 किंवा 6.9-इंच AMOLED QHD+ पॅनेल असण्याची अपेक्षा आहे.
22 Jan 2025 12:08 PM (IST)
काही रिपोर्ट्सनुसार S25 Ultra चा 16GB व्हेरिअंट फक्त आशियाई मार्केटसाठी उपलब्ध असणार अशी माहिती समोर आली आहे. हा प्रकार फक्त चीन, दक्षिण कोरिया, भारत आणि व्हिएतनाम सारख्या देशांमध्ये विकला जाईल, असं देखील सांगितलं जात आहे. अमेरिका आणि इतर देशांमध्ये S25 Ultra उपलब्ध करून दिले जाणार नाही.
22 Jan 2025 11:53 AM (IST)
Galaxy S25 मालिकेत 'Now Brief' फीचर असू शकते. हे वापरकर्त्याला वेळेनुसार महत्त्वाची माहिती दाखवेल. या फीचरमध्ये 'गुड मॉर्निंग स्क्रीन' असेल, ज्यामुळे हवामानाची माहिती मिळेल. त्याचप्रमाणे तुम्हाला 'फॉर युवर रूट' स्क्रीनवर नकाशे आणि म्यूजिक ओपन करण्याची सुविधा मिळेल. रात्री फोनवर 'Sumary of the Night' स्क्रीन दिसेल, जी दिवसभरातील संस्मरणीय क्षण आणि फिजिकल हालचालींची माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे.
22 Jan 2025 11:45 AM (IST)
Samsung Galaxy Ring 2 लाँच करू शकतो किंवा या इव्हेंटमध्ये त्याच्याशी संबंधित घोषणा करू शकतो. कंपनीने नुकतीच पुष्टी केली होती की आता यात दोन नवीन आकार जोडले जात आहेत, जेणेकरुन ते मोठ्या बोटातही सहज बसू शकेल. त्याचा सेन्सर सुधारला गेला आहे आणि तो आता दीर्घ बॅटरी आयुष्यासह लाँच केला जाऊ शकतो. या इव्हेंटमध्ये सॅमसंग प्रोजेक्ट Moohan XR हेडसेट लाँच करेल अशी अपेक्षा आहे. हे Google च्या Android XR प्लॅटफॉर्मवर विकसित केले गेले आहे.
22 Jan 2025 11:36 AM (IST)
सॅमसंग या इव्हेंटमध्ये OneUI 7 देखील लाँच करू शकतो. डिझाईन आणि सुरक्षेसाठी यामध्ये अनेक अपग्रेड्स देण्यात आले आहेत. यामध्ये, वापरकर्ते कस्टमाइजेबल लॉक स्क्रीन, पुन्हा डिझाइन केलेले कॅमेरा कंट्रोल आणि होम स्क्रीन विजेट्स इत्यादी पाहू शकतात. तसेच थेफ्ट डिटेक्शन लॉक देखील OneUI 7 मध्ये दिलं जाऊ शकतं.
22 Jan 2025 11:23 AM (IST)
आज लाँच होणाऱ्या स्मार्टफोन सिरीजची किंमत काय असेल याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे. आज लाँच होणाऱ्या फोनची किंमत किती असेल ते जाणून घ्या. तुम्हाला सध्याच्या S24 सीरीजपेक्षा Samsung Galaxy S25 Series स्मार्टफोनसाठी जास्त किंमत मोजावी लागेल. Galaxy S25 च्या बेस वेरिअंटची किंमत जवळपास 81,000 रुपये असू शकते. Samsung Galaxy S25+ ची प्रारंभिक किंमत 95,000 रुपये असण्याची अपेक्षा आहे आणि फ्लॅगशिप डिव्हाइस Galaxy Ultra च्या बेस व्हेरिएंटसाठी सुमारे 1.18 लाख रुपये द्यावे लागतील. मात्र, कंपनीकडून अधिकृत किंमतीची माहिती देण्यात आलेली नाही.
22 Jan 2025 11:14 AM (IST)
Galaxy S25 मालिकेतील सर्व मॉडेल्समध्ये नवीनतम Snapdragon 8 Elite चिपसेट असण्याची अपेक्षा आहे. यामध्ये नवीनतम गॅलेक्सी एआय वैशिष्ट्यांचा समावेश देखील केला जाऊ शकतो. हे स्मार्टफोन Android 15 वर आधारित One UI 7 वर चालतील. कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास, यात 50MP प्राथमिक सेन्सर, 12MP अल्ट्रा-वाइड आणि 10MP टेलिफोटो लेन्स दिले जाऊ शकतात. म्हणजेच प्रत्येक मॉडेलला किमान 12GB रॅम मिळणे अपेक्षित आहे, तर अल्ट्रा मॉडेलला 16GB रॅम आणि 1TB पर्यंत स्टोरेज मिळणे अपेक्षित आहे.
22 Jan 2025 10:59 AM (IST)
Galaxy S25 आणि Galaxy S25 Plus मधील सर्वात मोठा फरक डिस्प्लेच्या आकारात असेल. Galaxy S25 मध्ये 6.2-इंचाचा FHD+ 120Hz डिस्प्ले असेल, तर S25 Plus मध्ये थोडा मोठा 6.7-इंचाचा स्क्रीन असेल. Galaxy S25 Ultra हा 6.8 इंच डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. Galaxy S25 Ultra हा या सिरीजमधील सर्वात मोठा डिस्प्लेवाला फोन असणार आहे. सिरीजमधील तिन्ही फोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेटने सुसज्ज असतील. Galaxy S25 Ultra हा टॉप-एंड फ्लॅगशिप असेल. Galaxy S25 'स्लिम' पातळ स्वरूपात येईल. यामध्ये 6.7-इंच किंवा 6.8-इंच डिस्प्ले असण्याची अपेक्षा आहे.
22 Jan 2025 10:42 AM (IST)
दक्षिण कोरियाची कंपनी Samsung आज ईव्हेंटमध्ये आपली फ्लॅगशिप सीरीज Galaxy S25 लाँच करणार आहे. यामध्ये Galaxy S25, Galaxy S25 Plus आणि Galaxy S25 Ultra असे तीन फोन लाँच केले जाण्याची शक्यात आहे. तसेच या ईव्हेंटमध्ये Samsung Galaxy S25 Slim देखील लाँच केला जाऊ शकतो. कंपनी हा स्मार्टफोन लाँच करून सर्वांना आश्चर्यचकित करू शकतेतो, परंतु त्याची अपेक्षा कमी आहे. सॅमसंगचे म्हणणे आहे की या फोनमध्ये असे AI फीचर्स दिले जातील, जे आजपर्यंत कोणत्याही फोनमध्ये उपलब्ध नाहीत. Samsung Galaxy S25 Series चे काही स्पेसिफिकेशन्स देखील समोर आले आहेत.
22 Jan 2025 10:29 AM (IST)
आज सॅमसंगच्या ईव्हेंटमध्ये कोणते प्रोडक्ट्स लाँच होणार याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज Samsung Galaxy Unpacked 2025 मध्ये Samsung Galaxy S25 सिरीज, OneUI 7, Galaxy Ring 2 आणि प्रोजेक्ट मूहन XR हेडसेट लाँच केले जाणार आहेत. Samsung Galaxy S25 सिरीज मध्ये Galaxy S25, Galaxy S25 Plus आणि Galaxy S25 Ultra हे स्मार्टफोन लाँच केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय एक खास गोष्ट म्हणजे या ईव्हेंटमध्ये कंपनी Galaxy S25 Slim लाँच करण्याची शक्यता आहे. Galaxy S25 Slim लाँच झाल्यास सर्वचजण आश्चर्यचकित होणार आहेत, यात काही शंकाच नाही.
22 Jan 2025 10:19 AM (IST)
Galaxy Unpacked इव्हेंट 22 जानेवारी रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 11.30 वाजता सुरू होणार आहे. हा ईव्हेंट कंपनीच्या वेबसाइटवर, अधिकृत YouTube चॅनेलवर आणि सोशल मीडिया हँडल्सवर पाहिला जाऊ शकतो. हा इव्हेंट Samsung.com, Samsung Newsroom आणि त्याच्या अधिकृत YouTube चॅनेलवर लाईव्ह-स्ट्रीम केला जाईल.
22 Jan 2025 09:51 AM (IST)
सॅमसंग गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंट 2025 आज 22 जानेवारीला सॅन जोस, कॅलिफोर्निया येथे आयोजित करण्यात आला आहे. हा ईव्हेंट भारतीय वेळेनुसार रात्री 10.30 वाजता सुरु होणार आहे. यावर्षीचा सॅमसंगचा हा पहिला आणि सर्वात मोठा ईव्हेंट आहे. या ईव्हेंटमध्ये अनेक नवीन प्रोडक्ट्स लाँच केले जाणार आहेत. कंपनीने या ईव्हेंटबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
💙 like this post to witness the next evolution of #GalaxyAI
A true AI companion is coming — are you ready for #GalaxyUnpacked? pic.twitter.com/djbjSNo82Q
— Samsung Mobile (@SamsungMobile) January 6, 2025