सैफच्या घरातील चोर शोधण्यासाठी वापरले मोबाईल डेटा डंप! काय आहे ही टेक्नॉलॉजी? जाणून घ्या
बॉलीवूड जगात काल 16 जानेवारी रोजी खळबळ उडाली होती. कारण बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचे छायाचित्र समोर आले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताची ओळख पटली आहे. हल्ला झाल्यानंतर अगदी काही तासांतच पोलिसांनी तीन हल्लेखोरांना ताब्यात घेतल्याची मोठी अपडेट समोर आली.
Samsung लाँच करणार बजेट फ्रेंडली 5G स्मार्टफोन, पावरफुल फीचर्ससह लवकरच होणार एंट्री
सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेण्यापूर्वी त्यांची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी मोबाईल डेटा डंप तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. अशा स्थितीत डेटा डंप म्हणजे काय आणि त्याद्वारे आरोपींची ओळख कशी होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण अनेकांना या तंत्रज्ञानाबद्दल माहिती नाही. पण आता आम्ही तुम्हाला या तंत्रज्ञानाबद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत. (फोटो सौजन्य – pinterest)
डेटा डंपला सेलफोन डंप किंवा मोबाईल फोन डंप असेही म्हणतात. याद्वारे कोणत्याही व्यक्तीचा डेटा काढला जाऊ शकतो. या डेटामध्ये कॉल लॉग, मजकूर संदेश, ईमेल, फोटो, व्हिडिओ, एप्लिकेशन डेटा, ब्राउझिंग इतिहास आणि बरेच काही समाविष्ट आहे. सामान्यतः जेव्हा तपास यंत्रणा किंवा पोलिसांना एखाद्या गुन्हेगाराचा तपास करायचा असतो, अशावेळी सहसा मोबाईल डेटा डंपचा वापर केला जातो.
यामध्ये पोलीस आधी नेटवर्क आणि व्यक्ती कोणत्या नेटवर्क क्षेत्रात होती, याचा शोध घेतात. फोनमधील लोकेशन फीचरद्वारे हे शक्य होते. सेल टॉवर्स देखील यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. आपण स्मार्टफोनद्वारे कोणताही डेटा ऍक्सेस करतो, तो सर्व डेटा सेल टॉवर्सवर उपलब्ध राहतो. जरी वापरकर्त्याने तो डेटा हटवला तरीही तो डेटा सेल टॉवर्सवर सेव्ह राहतो.
DEMS म्हणजेच ‘डिजिटल एव्हिडन्स मॅनेजमेंट सिस्टम’ देखील फोन डंप डेटा काढण्यासाठी वापरली जाते. डीईएमएस हे असे ठिकाण आहे जे डिजिटल पुरावे हाताळण्यासाठी आणि व्यवस्थापित करण्यासाठी कार्य करते. आम्ही तुम्हाला सांगतो की हा डेटा कोणीही काढू शकत नाही. त्यासाठी तपास यंत्रणांना आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. याशिवाय दूरसंचार कंपन्यांकडेही भरपूर डेटा उपलब्ध आहे.
Tech Tips: Instagram वर ब्लू टिक मिळवणं आता अगदी सोपं! 6 स्टेप्समध्ये व्हेरिफाईड होईल तुमचं अकाऊंट
16 जानेवारीला पहाटे 2 वाजता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. मुंबईतील वांद्रे येथे एका हल्लेखोराने अभिनेत्यावर त्याच्या घरी चाकूने हल्ला केला, ज्यामध्ये सैफ गंभीर जखमी झाला. या हल्ल्यात सैफ अली खान गंभीर जखमी झाला आहे. अभिनेत्याच्या शरीरावर वेगवेगळ्या सहा ठिकाणी वार करण्यात आले होते. त्याच्या मानेवर, हातावर आणि पाठीवर खोल जखमा आहेत. शस्त्रक्रियेदरम्यान त्याच्या पाठीच्या कण्यातील चाकूचा 2.5 इंच तुकडा काढण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. सध्या अभिनेत्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असून त्याला आयसीयूमध्ये हलवण्यात आले आहे.