फोटोग्राफीचा अनुभव होणार लयभारी! Samsung घेऊन येतोय 500 MP कॅमेऱ्यावाला स्मार्टफोन, काय आहे कंपनीचा प्लॅन?
जगभरात लोकप्रिय असणारी स्मार्टफोन कंपनी सॅमसंग या महिन्यात त्यांची नवीनतम स्मार्टफोन सिरीज Galaxy S25 लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही सिरीज 22 जानेवारीला लाँच केली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. मात्र कंपनीने अद्याप अधिकृतपणे याबाबत घोषणा केली नाही. आता समोर आलेल्या अहवालांत असं सांगितलं जात आहे, कंपनी 500 MP कॅमेरा विकसित करत आहे, जो आगामी गॅलेक्सी डिव्हाईसमध्ये दिला जाऊ शकतो. Galaxy S25 सिरीजमध्ये 500 MP कॅमेरा असणार का, याबाबत कंपनीने अद्याप कोणतीही माहिती दिली नाही. (फोटो सौजन्य – pinterest)
BSNL ची ही सेवा लवकरच होणार बंद, लाखो युजर्सवर परिणाम! 15 जानेवारीपर्यंत पूर्ण करा हे काम
टिपस्टर @Jukanlosreve ने माहिती दिली आहे की कंपनी Galaxy डिव्हाईससाठी 500MP कॅमेरा विकसित करत आहे. हा सेन्सर सध्याच्या iPhones मध्ये सापडलेल्या Sony च्या Exmor RS सेन्सरपेक्षा जास्त प्रगत असू शकतो. शिवाय कंपनी Apple साठी नवीन कॅमेरा सेन्सर देखील बनवत आहे. Galaxy S25 सीरीजमध्ये 500MP कॅमेरा दिला जाणार का, याबाबत अद्याप कोणतेही अपडेट समोर आलं नाही. जरी ही लेन्स Galaxy S25 सीरीजमध्ये उपलब्ध नसली तरी कंपनी आगामी Galaxy सीरीजमध्ये ही लेन्स वापरू शकते.
Exclusive: Samsung is currently developing a “3-layer stacked” image sensor in a PD-TR-Logic configuration for Apple.
This sensor is more advanced than Sony’s existing Exmor RS, and I believe it cannot be ruled out as a potential candidate for the main sensor.
Samsung is…
— Jukanlosreve (@Jukanlosreve) January 1, 2025
कंपनी आपल्या Galaxy डिव्हाइसमध्ये 500 MP कॅमेरा देऊ शकते. असे झाले तर फोटोग्राफी आणखी चांगली होईल. 500 MP कॅमेरा असलेला स्मार्टफोनमुळे युजर्सचा फोटोग्राफी अनुभव अधिक भारी होईल. सॅमसंग सध्या आपल्या फोनमध्ये 200 MP कॅमेरा ऑफर करत आहे. पण, लवकरच कंपनी आपल्या Galaxy डिव्हाईसमध्ये 500 MP कॅमेरा देऊ शकते.
सॅमसंग पहिल्यांदाच 500 मेगापिक्सेल कॅमेरा असलेला स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. त्यामुळे हा नवीन स्मार्टफोन फोटोग्राफीच्या जगात खळबळ उडवणार यात काही शंकाच नाही. कंपनी Galaxy S25 Ultra मध्ये 500 MP कॅमेरा देण्याची शक्यता सर्वांनी वर्तवली आहे. असे झाल्यास 500 मेगापिक्सेल कॅमेराच्या शर्यतीत सॅमसंग इतर कंपन्यांच्या पुढे जाईल.
Galaxy S25 सिरीजच्या वैशिष्ट्यांबद्दल अनेक लीक्स समोर आले आहेत. असे सांगण्यात आले आहे की Galaxy S25 सीरीजमध्ये 12GB रॅम ऑफर केला जाऊ शकतो. या सिरीजच्या कोणत्याही मॉडेलमध्ये सध्याच्या S24 सिरीजप्रमाणे 8GB रॅम असणार नाही. S25 Ultra मध्ये 16GB रॅम असू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, Galaxy S25 सीरीजमध्ये Google चे प्रीमियम AI फीचर्स मोफत उपलब्ध होऊ शकतात. Galaxy S25 मॉडेल्ससह कंपनी 3-12 महिन्यांसाठी Gemini AI Premium मोफत देऊ शकते. दोन्ही कंपन्या गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या डिव्हाईससाठी भागीदारी करत आहेत.
Apple ची ती चूक पडली महागात, कंपनीला भरावा लागणार करोडोंचा दंड! युजर्सना मिळणार इकते पैसे
किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, नवीन Galaxy S25 सीरीज फोनची किंमत Galaxy S24 सीरीजपेक्षा 5,000-7,000 रुपये जास्त असू शकते. Galaxy S25 ची किंमत सुमारे 84,999 रुपये, Galaxy S25+ ची किंमत सुमारे 1,04,999 रुपये आणि S25 Ultra ची किंमत सुमारे 1,34,999 रुपये असण्याची अपेक्षा आहे.