Oppo च्या या स्मार्टफोन्सना मिळणार ColorOS 15 अपडेट, AI फीचर्ससह परफॉर्मेंस होणार अधिक मजेदार
स्मार्टफोन कंपनी Oppo ने अनेक स्मार्टफोन्ससाठी Android 15 आधारित ColorOS 15 OS अपडेट रिलीज करण्यास सुरुवात केली आहे. कंपनीने रिलीज केलेल्या या अपडेटमध्ये अनेक मुख्य अपग्रेड आणि नवीन फीचर्स अॅड करण्यात आले आहेत. यात ट्रिनिटी इंजिन, फ्लक्स थीम, हायपर बूस्ट आणि एआय टूल्स यांचा समावेश करण्यात आला आहे. अपडेट मिळाल्यानंतर, वापरकर्त्याचा अनुभव देखील पूर्वीपेक्षा चांगला झाला असल्याचं पाहायला मिळत आहे.
Upcoming Devices: 2025 मध्ये Apple चे हे बहुप्रतिक्षित डिव्हाईस होणार लाँच, iPhone 17 चा बोलबाला
कोणत्या डिव्हाईससाठी Oppo ने नवीन अपडेट आणले गेले आहे आणि त्यात कोणती वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत, याबद्दल कंपनीने माहिती दिली आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये ColorOS 15 रिलीज झाल्यानंतर, Oppo चे अनेक स्मार्टफोन आणि टॅब्लेट आहेत ज्यांना नवीन अपडेट मिळत आहेत. अपडेट हळूहळू प्रसिद्ध होत आहे, त्यामुळे सर्व युजर्सना लवकरच त्यांच्या डिव्हाईसमध्ये अपडेट मिळणार आहे. काही युजर्सना त्याची वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
कंपनीने रिलीज केलेले हे नवीन अपडेट युजर्सासाठी प्रचंड फायद्याचं ठरणार आहे. यामध्ये युजर्सना अनेक नवीन एआय फीचर्सचा अनुभव घेता येणार आहे, ज्यामुळे त्यांची कामं पूर्वीपेक्षा अधिक सोपी होणार आहे. चला तर मग कंपनीने कोणत्या डिव्हाईससाठी हे नवीन अपडेट रिलीज केलं आहे, याबद्दल जाणून घेऊया.
AI क्लॅरिटी एन्हांसर – कलरओएसचे एआय क्लॅरिटी एन्हांसर वैशिष्ट्य क्षणार्धात कमी रिझोल्युशन पिक्चर्सची क्वालिटी वाढवते. यामध्ये खराब क्वालिटीच्या इमेजही क्रिस्टल क्लियर होतात. यामध्ये फोटोमधून अनावश्यक भागही रिमूव करता येतात. हे जुन्या फोटोंमध्ये डिटेल देखील जोडू शकते.
AI टूलबॉक्स – एआय टूलबॉक्सच्या मदतीने क्विक रिस्पॉन्स दिला जाऊ शकतो. यामध्ये एआयच्या मदतीने मजकूर समराइज केला जाऊ शकतो. तसेच, प्रगत भाषा टूल हुशारीने रिप्लाय देऊ शकतात.
AI Speak – जेव्हा तुम्ही वेब पेजवर असता तेव्हा AI Speak ते मोठ्याने वाचू शकते, त्यामुळे तुम्ही मल्टीटास्किंग करत असताना देखील अपडेट राहू शकता. हे मूळ आणि थर्ड-पार्टी वेब ब्राउझरमध्ये कार्य करते. AI सारांश वेब पेजवर देखील कार्य करते.
नव्या डिझाईनसह लाँच होणार Apple ची आगामी Smartwatch, प्लास्टिक बॉडीसह मिळणार कमाल फीचर्स
AI नोट्स – यामध्ये नोट्स ॲपमध्ये AI फीचर्स देखील आहेत. यात AI -पावर्ड डॉक्युमेंट ॲप समाविष्ट आहे. दोन्ही ॲप्स AI असिस्टेंटसोबत काम करण्यास सक्षम आहेत. यामध्ये, टेक्स्ट समराइज आणि रिराइटिंग यांसारखी कामे करता येतात.