महागड्या रिचार्जची चिंता सोडा! केवळ 20 रुपयांत अॅक्टिव्ह राहणार दुसरं सिम; Jio, Airtel, Vi यूजर्सना TRAI चा दिलासा
अनेक स्मार्टफोन युजर्स दोन सिम कार्डचा वापर करतात. सामान्यत: नियमित कॉलिंग आणि डेटा अॅक्सेससाठी सिम वापरलं जातं. पण एखाद्यावेळी आपलं नियमित वापरलं जाणार सिमकार्ड बंद झालं किंवा काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली, तर अशावेळी आपल्याला दुसऱ्या सिमकार्डची गरज असते. त्यामुळे आपल्याला आपल्या स्मार्टफोनमधील दोन्ही सिमकार्ड अॅक्टिव्ह ठेवणं फार गरजेचं असतं.
आपण दुसरं सिमकार्ड फार क्वचित वापरतो. पण तरीही ते अॅक्टिव्ह ठेवण्यासाठी महागडे रिचार्ज प्लॅन खरेदी करावे लागतात. तथापि, गेल्या जुलैमध्ये रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढल्यानंतर, अनेकांना त्यांचे दुसरे सिम वापरणे कठीण होऊ लागले. पण आता ट्रायने दोन सिम असलेल्या युजर्ससाठी नवा नियम बनवला आहे. ट्रायने जारी केलेला हा नियम युजर्ससाठी दिलासादायक ठरणार आहे. ट्राय कन्झ्युमर हँडबुकनुसार, जर एखादे सिम कार्ड 90 दिवसांपेक्षा जास्त काळ वापरले गेले नसेल, तर ते तीन महिन्यांनंतर डिएक्टिवेट मानले जाते. मात्र आता असं होणार नाही.(फोटो सौजन्य – Pinterest)
ट्रायच्या कन्झ्युमर हँडबुकनुसार, रिचार्ज पूर्ण झाल्यानंतर तुमचे सिम 90 दिवसांपर्यंत सक्रिय राहते. म्हणजे रिचार्ज संपल्यानंतरही तुमचा नंबर तीन महिने ॲक्टिव्ह राहील. रिचार्ज प्लॅन संपल्यानंतर तुमचे सिम 90 दिवसांपर्यंत सक्रिय राहते, मात्र 90 दिवसांचा कालावधी संपल्यानंतर सिमकार्ड डिएक्टिवेट मानले जाते. अशावेळी केवळ 20 रुपये खर्च करून तुम्ही तुमचे सिमकार्ड आणखी एक महिना सुरु ठेऊ शकता.
एवढेच नाही तर 120 दिवस पूर्ण झाल्यानंतरही ट्राय तुम्हाला तुमचे सिम रिॲक्टिव्हेट करण्यासाठी 15 दिवसांचा अवधी देते. या 15 दिवसांतही सिम ॲक्टिव्ह न केल्यास, तो क्रमांक कायमचा लॉक केला जाईल आणि तो दुसऱ्या व्यक्तीला दिला जाईल. या नियमामुळे दुसरं सिम वापरणाऱ्या Jio, Airtel, Vi युजर्सना महागड्या रिचार्जपासून दिलासा मिळणार असून गरजेनुसार नंबर ॲक्टिव्ह ठेवणे सोपे होणार आहे.
120 दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर वापरकर्ते ग्राहक सेवेशी संपर्क साधू शकतात किंवा त्यांचे सिम त्वरित पुन्हा सक्रिय करण्यासाठी कंपनीच्या स्टोअरला भेट देऊ शकतात. ज्यामुळे त्यांचा नंबर लॉक होणार नाही आणि इतर कोणत्याही व्यक्तिला दिला जाणार नाही.
संचार साथी ॲप नुकतेच लाँच करण्यात आले आहे. यासोबतच ज्योतिरादित्य सिंधिया यांनी नॅशनल ब्रॉडबँड मिशन 2.0 लाँच केले. ते म्हणाले की मिशन 2.0 चे प्राथमिक उद्दिष्ट हे सुनिश्चित करणे आहे की प्रत्येक 100 पैकी किमान 60 ग्रामीण कुटुंबांना ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहे.
स्मार्टफोनचा डेटा प्लॅन संपायला आलाय? आताच या टीप्स फॉलो करा, रिचार्ज करण्याची गरज नाही
या अभियानांतर्गत, 2030 पर्यंत 2.70 लाख गावांमध्ये ऑप्टिकल फायबर केबल कनेक्टिव्हिटीचा विस्तार करण्याचे आणि ग्रामीण भागातील सर्व शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे, अंगणवाडी केंद्रे आणि पंचायत कार्यालये यासारख्या 90 टक्के संस्थांना ब्रॉडबँडने जोडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.