Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google Map Update: गुगल मॅपचे हे फीचर्स तुमच्यासाठी ठरू शकतात डोकेदुखी, वापरण्यापूर्वी विचार करा

गुगल मॅप त्यांच्या युजर्ससाठी सतत नवनवीन अपडेट आणि फीचर्स घेऊन येत असतो. गुगल मॅपच्या लोकप्रिय टाइम फीचरमध्ये वापरकर्त्यांना कोणत्या ठिकाणी किती गर्दी आहे याची माहिती मिळते. मात्र, हे फीचर योग्य माहिती देत ​​नाही.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 04, 2024 | 12:00 PM
Google Map Update: गुगल मॅपचे हे फीचर्स तुमच्यासाठी ठरू शकतात डोकेदुखी, वापरण्यापूर्वी विचार करा

Google Map Update: गुगल मॅपचे हे फीचर्स तुमच्यासाठी ठरू शकतात डोकेदुखी, वापरण्यापूर्वी विचार करा

Follow Us
Close
Follow Us:

जगातील लोकप्रिय टेक कंपनी गुगल अनेकदा नवीन फीचर्सवर काम करत असते. देशात वापरल्या जाणाऱ्या बहुतांश स्मार्टफोनमध्ये गुगलचे अनेक ॲप्स आणि फीचर्स दिलेले आहेत. यातील एक लोकप्रिय गुगल प्लॅटफॉर्म म्हणजे गुगल मॅप. गुगल मॅप गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे गुगल मॅपमुळे आठवडाभरात दोन अपघात झाले आहेत. यातील एका अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. तर एका अपघतात तीन जण जखमी झाले आहेत. या अपघातानंतर गुगल मॅपनवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या घटनानंतर गुगल मॅपचा वापर करायचा की नाही याबाबत अनेकांना शंका आहे.

गुगल मॅपसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

गुगल मॅप त्यांच्या युजर्ससाठी सतत नवनवीन अपडेट आणि फीचर्स घेऊन येत असतो. कोणताही मार्ग शोधण्यासाठी देशातील बहुतांश लोक गुगल मॅपची मदत घेतात. गुगल मॅप्सचा वापर इतर शहरांमधून येणाऱ्या लोकांना सुरक्षित मार्ग दाखवण्यासाठी केला जातो. अलीकडच्या काळात गुगल मॅपमध्ये अनेक नवीन फिचर्स जोडण्यात आले आहेत. पण यातील काही फीचर्स युजर्ससाठी काहीच कामाचे नाहीत. खरं तर हे फीचर्स युजर्ससाठी डोकेदुखी ठरू शकतात आणि नवीन आव्हाने देखील निर्माण करू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)

गुगल मॅपचे टाइमलाइन फीचर

कोणतीही अज्ञात जागा शोधण्यासाठी गुगल मॅप जितके उपयुक्त आणि फायदेशीर आहेत, तितकेच माय टाइमलाइन फीचर निरुपयोगी आहे. या फीचरमध्ये, गुगल मॅप युजरने भेट दिलेल्या सर्व ठिकाणांची नोंद ठेवली जाते. याचा अर्थ तुम्ही कुठे रोमिंग करत आहात याचा डेटा गुगलकडे आहे. अशा परिस्थितीत या फीचरमुळे अनेकांना आपला डेटा लीक होण्याची भीती आहे. कारण आपण कोणत्या वेळी कोणत्या ठिकाणी आहोत, ही माहिती कोणाकडेही असणं धोकादायक असू शकतं.

गुगल मॅपचे पॉपुलर टाइम फीचर

गुगल मॅपच्या लोकप्रिय टाइम फीचरमध्ये वापरकर्त्यांना कोणत्या ठिकाणी किती गर्दी आहे याची माहिती मिळते. तसेच, यानुसार, लोक त्यांच्या वेळेची योग्य निवड करू शकतात. मात्र, हे फीचर योग्य माहिती देत ​​नाही, म्हणजेच काहीवेळा गर्दी नसतानाही एखाद्या ठिकाणाची चुकीची माहिती दिली जाते, असा दावा अनेक युजर्सनी केला आहे. अशा परिस्थितीत हे फीचर युजर्सची दिशाभूल करते.

टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

गुगल मॅपचे एक्सप्लोर टॅब फीचर

गुगल मॅपच्या निरुपयोगी फीचरमध्ये एक्सप्लोर टॅब फीचरचा देखील समावेश केला जाऊ शकतो. या फीचरच्या मदतीने यूजर्स त्यांच्या आजूबाजूचा परिसर अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेऊ शकतात. पण कधी कधी हे फीचर तुम्हाला अचूक माहिती देत ​​नाही. तसेच, हे फीचर वापरकर्त्यांच्या वैयक्तिक पसंतीनुसार माहिती शेअर करत नाही, म्हणूनच हे वैशिष्ट्य असणे निरुपयोगी आहे.

ऑफलाइन मॅप फीचर

गुगल मॅप्सवर बरेच लोक ऑफलाइन मॅप फीचर वापरतात. परंतु या फीचरमध्ये ऑफलाइन नकाशे डाऊनलोड केल्यानंतर जुना डेटा आणि माहिती मिळत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. अशा परिस्थितीत, इंटरनेट नसताना, या मॅप फीचरवर अवलंबून राहणे खूप धोकादायक ठरू शकते, कारण त्यात नवीन माहिती उपलब्ध नाही. अशावेळी अपघात होण्याची शक्यता अधिक वाढते.

Web Title: Tech news useless features of google map it will create problem for you think before use them

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2024 | 12:00 PM

Topics:  

  • google map new feature

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.