WhatsApp Update: व्हॉट्सॲप युजर्ससाठी आनंदाची बातमी! अनरिड मॅसेज आणि टायपिंगसाठी आलं नवीन फीचर
व्हॉट्सॲप त्यांच्या युजर्ससाठी नेहमीच नवीन आणि खास फीचर्स रोल आऊट करते. व्हॉट्सॲपच्या नवीन फीचरमुळे युजर्सचा अनुभव अधिक मजेदार होतो. आता देखील व्हॉट्सॲपने त्यांच्या युजर्ससाठी दोन नवीन फीचर्स लाँच केले आहेत. एक फीचर टायपिंग संबंधित आहे तर दुसरं फीचर अनरिड मॅसेज संबंधित आहे.
IRCTC Down: ऐन तिकीट बुकींगवेळी आयआरसीटीसी वेबसाइट डाउन, प्रवशांनी व्यक्त केला संताप
आता युजर्ससाठी टायपिंग इंडिकेटर फीचर रोल आऊट करण्यात आलं आहे. तर दुसरं फीचर म्हणजे अनरिड मॅसेजचा रिमाइंडर असणार आहे. व्हॉट्सॲपचे नवीन फीचर युजर्सना अनरिड मॅसेज रिमाईंड करून देणार आहेत. हे दोन्ही फीचर्स युजर्ससाठी प्रचंड फायद्याचे ठरणार आहे. घाई गडबडीत आपल्याकडून काही मॅसेज ओपन करायचे राहतात. अशावेळी तुम्हाला अनरिड मॅसेज रिमाइंडर फीचर मदत करणार आहे. याबाबत WABetainfo माहिती शेअर केली आहे. हे फीचर लवकरच सर्व युजर्ससाठी उपलब्ध होणार आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
📝 WhatsApp beta for Android 2.24.25.29: what’s new?
WhatsApp is rolling out a reminder notification feature for chat messages, and it’s available to some beta testers!https://t.co/Ap4vjMlHQy pic.twitter.com/d2rPRVrSbM
— WABetaInfo (@WABetaInfo) December 7, 2024
व्हॉट्सॲपच्या नवीन फीचरमुळे यूजर्स आता महत्त्वाचे मॅसेज विसरणार नाहीत. सुमारे 4 अब्ज युजर्ससाठी हे नवीन फीचर रोलआऊट करण्यात आलं आहे. या फीचरचे नाव मेसेज रिमाइंडर्स आहे, जे तुम्हाला महत्त्वाचे अनरिड मेसेज ओपन करण्याची आठवण करून देईल.
व्हॉट्सॲपचे नवीन फीचर युजर्सना मेसेज रिमाइंडर्स फीचर युजर्सना त्या मेसेजची आठवण करून देईल जे त्यांनी अजून वाचलेले नाहीत. हे फीचर आधीपासूनच उपलब्ध आहे. पण ते केवळ स्टेटस अपडेटसाठी उपलब्ध होते. मात्र आता ते मॅसेजसाठी देखील उपलब्ध होणार आहे. हे फीचर लवकरच सर्व व्हॉट्सॲप युजर्ससाठी उपलब्ध होणार आहे.
या नवीन फीचरबाबत WABetainfo ने त्यांच्या एक्स अकाऊंटवर माहिती शेअर केली आहे. पोस्टमध्ये म्हटलं आहे की, Google Play Store वर उपलब्ध Android 2.24.25.29 अपडेटसाठी मेसेज रिमाइंडर्स फीचर दिसले आहे. या फीचमरमुळे युजर्सना न वाचलेल्या मेसेजसाठी रिमाइंडर मिळेल. WABetainfo ने या नवीन फीचरचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे.
मेसेज रिमाइंडर्स फीचर इनेबल करण्यासाठी सर्वात आधी सेटिंग्ज ओपन करा. इथे तुम्हाला रिमाइंडर टॉगल दिसेल, तो ऑन करा. टॉगल इनेबल केल्यावर, तुम्हाला न वाचलेले मॅसेज आणि व्हॉट्सॲपच्या स्टेटसचे रिमाइंडर मिळेल. हे टॉगल याआधीही वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होते. पण, हे केवळ स्टेटससाठी सुरु होते. मात्र आता हे फीचर न वाचलेल्या मॅसेजची देखील आठवण करून देणार आहे.
बोट लावताच चार्ज होणार तुमचा स्मार्टफोन! विजेचा नाही तर घामाचा वापर होणार, नेमकं प्रकरण आहे काय?
मेटाने व्हॉट्सॲपसाठी एक नवीन फीचर जाहीर केले आहे जे तुम्हाला कोणी मॅसेज केव्हा टाइप करत आहे ते पाहण्याची अनुमती देते. हे वैशिष्ट्य तुमच्या चॅट स्क्रीनच्या तळाशी ‘….’ अशा स्वरुपात व्हिज्युअल इंडिकेटर दाखवते. यात टाइप करणाऱ्या व्यक्तीचा प्रोफाईल फोटोही दिसतो. हे विशेषतः ग्रुप चॅटमध्ये उपयुक्त आहे, जेथे अनेक लोक एकाच वेळी संदेश पाठवत असतात.
या फीचरची माहिती पहिल्यांदा ऑक्टोबरमध्ये मिळाली होती. सुरुवातीला काही वापरकर्त्यांसह त्याची चाचणी घेण्यात आली. आता, iOS आणि Android दोन्ही डिव्हाइसवर व्हॉट्सॲप वापरणाऱ्या प्रत्येकासाठी ते उपलब्ध करून दिले जात आहे. हे फीचर सर्वांपर्यंत पोहोचायला थोडा वेळ लागण्याची शक्यता आहे.