
तरुणांच्या फसवणुकीचे प्रकार वाढले; 'त्या' चॅटच्या नादी लागू नकाच, अडचणीतच याल...
आयफोन युजर्ससाठी महत्त्वाची बातमी आहे. आयफोनच्या काही मॉडेल्सवरील व्हॉट्सॲप सपोर्ट आता बंद केला जाणार आहे. व्हॉट्सॲपच्या आगामी फीचर्सचा मागोवा घेणाऱ्या Wabetainfo ने त्यांच्या एक्स अकांटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्या मॉडेल्सवर व्हॉट्सॲप सपोर्ट बंद होणार आहे, त्यांची यादी देखील शेअर करण्यात आली आहे.
स्मार्टफोनसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
Wabetainfo ने एक्सवर आज 2 डिसेंबर रोजी एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, ‘Whatsapp मे 2025 पासून जुन्या iOS आवृत्त्यांसाठी आणि iPhone मॉडेल्ससाठी त्याचा सपोर्ट थांबवणार आहे. WhatsApp iOS 15.1 पेक्षा जुन्या आवृत्त्यांमध्ये सपोर्ट करणे थांबवेल. याचा परिणाम iPhone 5s, iPhone 6 आणि iPhone 6 Plus च्या युजर्सवर होणार आहे.’ (फोटो सौजन्य – pinterest)
Wabetainfo त्यांच्या पोस्टमध्ये एक स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. ज्यामध्ये एक नोटिफिकेशन दिसत आहे, ज्यामध्ये लिहिले आहे की, ‘Whatsapp 5 मे 2025 नंतर iOS च्या या आवृत्तीला सपोर्ट करणे बंद करेल.’ कृपया सेटिंग्ज > जनरलवर जा, त्यानंतर नवीनतम iOS आवृत्ती मिळविण्यासाठी सॉफ्टवेअर अपडेट वर टॅप करा.’ तुम्ही तुमच्या आयफोनमधील सॉफ्टवेअर अपडेट केल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सॲप वापरता येणार आहे.
WhatsApp to drop support for older iOS versions and iPhone models starting May 2025! WhatsApp will stop supporting versions older than iOS 15.1 affecting users with iPhone 5s, iPhone 6, and iPhone 6 Plus.https://t.co/rp77DJ7h27 pic.twitter.com/isliFb4mo8 — WABetaInfo (@WABetaInfo) December 2, 2024
आयफोनमध्ये व्हॉट्सॲप सपोर्ट बंद झाल्यामुळे युजर्सवर त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो. कारण हल्ली आपण आपल्या प्रत्येक कामासाठी व्हॉट्सॲपचा वापर करतो. प्रत्येक स्मार्टफोन युजरसाठी व्हॉट्सॲप अत्यंत महत्त्वाचा आहे. व्हॉट्सॲपच्या मदतीने आपली अनेक कामं अगदी सहज शक्य होतात. मात्र आता काही जुन्या आयफोन मॉडेल्सवर व्हॉट्सॲप सपोर्ट बंद होणार आहे. याचा युजर्सवर परिणाम होऊ शकतो.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
व्हॉट्सॲप एका नवीन फीचरची चाचणी करत आहे, ज्याद्वारे तुम्ही QR कोड स्कॅन करून चॅनलमध्ये सामील होऊ शकता. सध्या हे नवीन फीचर विकासाच्या टप्प्यात आहे. हे नवीन वैशिष्ट्य वापरकर्त्यांसाठी नवीन चॅनेल शोधणे आणि त्यात सामील होणे सोपे करेल. WABetaInfo च्या अहवालानुसार, हे नवीन वैशिष्ट्य सध्या Android आणि iOS च्या नवीनतम व्हॉट्सॲप बीटा आवृत्तीच्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. फोनच्या कॅमेऱ्याने QR कोड स्कॅन केल्यावर वापरकर्त्यांना थेट चॅनलवर रीडायरेक्ट केले जाईल. तेथून ते चॅनल पाहू शकतात आणि त्यांना ते आवडल्यास ते त्यात सहभागी होऊ शकतात. हे फीचर युजर्ससाठी फायद्याचा ठरणार आहे..