या दिवशी लाँच होणार Redmi K80 सीरीज! पावरफुल प्रोसेसरसह मिळणार नवीन फीचर्स
टेक कंपनी Redmi 27 नोव्हेंबर रोजी चीनमध्ये त्यांची नवीनतम स्मार्टफोन सिरीज Redmi K80 लाँच करण्यासाठी सज्ज झाली आहे. K70 सिरीजचा उत्तराधिकारी म्हणून ही नवीनतम सिरीज लाँच केली जाणार आहे. Xiaomi च्या K लाइनअपमध्ये आणले जाणारे हे फोन प्रीमियम सेगमेंटमध्ये लाँच केले जाणारे आहेत. Redmi K80 सिरीजमध्ये कंपनी K80 आणि K80 Pro स्मार्टफोन लाँच करणार आहे.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
K80 आणि K80 Pro दोन्ही मध्ये TCL Huaxing द्वारे विकसित 2K रिझोल्यूशनसह AMOLED डिस्प्ले दिला जाणार आहे. स्क्रीनमध्ये कस्टमाइज्ड M9 ल्युमिनेसेंट मटेरियल वापरण्यात आले आहे. डिस्प्ले 1800 nits च्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करेल. K80 आणि K80 Pro दोन्ही स्मार्टफोन्सचा डिस्प्ले हार्डवेयर-लेवल आय प्रोटेक्शनसह सुसज्ज असेल. (फोटो सौजन्य – X)
Redmi K80 Pro मध्ये Qualcomm चा नवीन Snapdragon 8 Elite प्रोसेसर दिला जाऊ शकतो. हे इन-हाऊस D1 ग्राफिक्स चिपसह जोडलेले आहे, तर Redmi K80 मध्ये Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर असणे अपेक्षित आहे.
Redmi K80 मध्ये 50MP OmniVision OV50 मुख्य कॅमेरा सेन्सर, 8MP अल्ट्रावाइड लेन्स आणि 2MP मॅक्रो लेन्स असण्याची अपेक्षा आहे. सेल्फीसाठी, Redmi K80 मध्ये 20MP OmniVision OV20B फ्रंट-फेसिंग कॅमेरा दिला जाण्याची शक्यता आहे. प्रो मॉडेलमध्ये 50MP मुख्य कॅमेरा सेन्सर आहे, जो उच्च-रिझोल्यूशन 32MP अल्ट्रावाइड सेन्सर आणि 2.6x ऑप्टिकल झूम आणि 50MP ISCOELL JN5 टेलीफोटो लेन्ससह जोडलेला आहे. सेल्फीसाठी यात 20MP कॅमेरा सेन्सर देखील आहे.
Redmi KRedmi 80 स्मार्टफोनमध्ये 6500mAh बॅटरी दिली जाऊ शकते, जी 90W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. तर K80 Pro मध्ये 6000mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते, परंतु हे 120W वायर्ड चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगच्या सुविधेसह येईल अशी अपेक्षा आहे.
दोन्ही मॉडेल्समध्ये डिस्प्लेच्या खाली अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सर, टिकाऊपणासाठी मेटल मिडल फ्रेम, पुढील आणि मागे ड्रॅगन क्रिस्टल ग्लास आणि पाणी आणि धूळ संरक्षणासाठी IP68/IP69 प्रमाणपत्र असेल.
स्मार्टफोनसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
कंपनीने नुकतीच आपली नवीनतम स्मार्टफोन सिरीज Redmi A4 5G लाँच केली आहे. Redmi A4 5G चे डिझाईन फॅन्सी दिसते. Redmi A4 5G स्पार्कल पर्पल आणि स्टाररी ब्लॅक रंगात उपलब्ध आहे. Redmi A4 5G मध्ये 6.88-इंचाची HD+ LCD स्क्रीन आहे जी 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. Redmi A4 5G मध्ये Snapdragon 4s Gen 2 प्रोसेसर आहे आणि यात 4GB रॅम आणि 128GB स्टोरेजचा सपोर्ट आहे. हा प्रोसेसर 4nm फॅब्रिकेशन तंत्रज्ञानावर आधारित आहे.
Redmi A4 5G मध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा, एक सेकेंडरी कॅमेरा आणि 5MP सेल्फी कॅमेरा आहे. मागील कॅमेरा 30 fps वर 1080p पर्यंत रिझोल्यूशनमध्ये व्हिडिओ शूट करू शकतो. Redmi A4 5G Android 14 आधारित HyperOS वर चालतो. Redmi A4 5G मध्ये 5,160mAh बॅटरी आहे जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.