काय सांगता! दरमहिना फक्त 299 रूपये देऊन घरी आणा 'हा' ब्रँड न्यू स्मार्टफोन; काय आहे Flipkart ची ऑफर?
टेक कंपनी POCO ने काही दिवसांपूर्वीच त्यांचा ब्रँड न्यू स्मार्टफोन POCO C75 लाँच केला आहे. हा नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारात नुकताच लाँच झाला आहे. या फोनची पहिली सेल 19 डिसेंबरपासून ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर लाइव्ह झाली. तुम्ही हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. POCO C75 हा नवीनतम फोन Snapdragon 4s Gen 2 प्रोसेसर आणि मोठ्या बॅटरीने सुसज्ज आहे. यामध्ये मोठा डिस्प्ले आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट सारखे फीचर्स आहेत.
Upcoming Smartphones: 2025 मध्ये हे स्मार्टफोन्स घालणार धुमाकूळ, वाचा कोणात्या ब्रँड्सचा समावेश
तुम्ही POCO चा हा ब्रँड न्यू स्मार्टफोन POCO C75 खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही POCO C75 फोन फ्लिपकार्टवरून 299 रुपयांच्या मासिक EMI वर खरेदी करू शकता. यावर अनेक बँक ऑफर्सही दिल्या जात आहेत. त्याची किंमत आणि इतर फीचर्सबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X)
Poco C75 5G स्मार्टफोन 7,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन केवळ 4GB + 64GB या एकाच व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. Poco C75 5G स्मार्टफोन Aqua Blue, Enchanted Green आणि Silver Stardust कलर पर्यायांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. फ्लिपकार्टवरून हा फोन खरेदी केल्यावर, तुम्हाला Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डवर 5 टक्के कॅशबॅक मिळणार आहे.
कूपनसह 2500 रुपयांची अतिरिक्त सूट मिळू शकते. हा फोन 299 रुपये प्रति महिना EMI वर उपलब्ध आहे. 24 महिन्यांसाठी 417 रुपयांच्या मासिक ईएमआयवर देखील याचा लाभ घेता येईल.
डिस्प्ले – नवीनतम स्मार्टफोन 6.88-इंचाची HD+ (720 x 1,600 पिक्सेल) स्क्रीन 120Hz च्या रीफ्रेश दरासह आणि 600 nits पर्यंत कमाल ब्राइटनेससह लाँच करण्यात आला आहे. त्याचा आस्पेक्ट रेशो 20:9 आहे.
प्रोसेसर – कार्यक्षमतेसाठी, फोनमध्ये ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 4s Gen 2 प्रोसेसर देण्यात आला आहे, जो 4GB RAM आणि 64GB ऑनबोर्ड स्टोरेजसह जोडलेला आहे. हा फोन Xiaomi च्या Android 14 आधारित HyperOS स्किनवर चालतो.
Year Ender 2024: यावर्षी मोबाईल युजर्ससाठी बदलले अनेक नियम, वाचा संपूर्ण यादी
कॅमेरा – Poco C75 मध्ये 50MP प्रायमरी रियर कॅमेरा देण्यात आला आहे, सोबत मागील बाजूस एक अनस्पेसिफाइड सेकेंडरी सेन्सर आणि समोर 5-मेगापिक्सेल सेन्सर आहे.
बॅटरी – Poco C75 मध्ये 18W वायर्ड चार्जिंग सपोर्टसह 5,160mAh बॅटरी देण्यात आली आहे.
फीचर्स – कंपनीने Poco C75 ला साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसह सुसज्ज केले आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यात आली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, 5G, 4G VoLTE, Wi-Fi, ब्लूटूथ 5.3, GPS, एक 3.5mm ऑडिओ जॅक आणि USB टाइप-सी पोर्ट सारखी वैशिष्ट्ये प्रदान केली आहेत. त्याला धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी IP52 रेटिंग आहे.