Upcoming Smartphones: 2025 मध्ये हे स्मार्टफोन्स घालणार धुमाकूळ, वाचा कोणात्या ब्रँड्सचा समावेश
येत्या काही दिवसांतच वर्ष 2024 संपणार आहे. 2024 मध्ये अनेक नवीन स्मार्टफोन लाँच झाले आहेत. डिसेंबर 2024 मध्ये देखील अनेक स्मार्टफोन्स लाँच होत आहेत. यातील काही स्मार्टफोन्स बजेट किंमतीत लाँच झाले आहेत, त्यामुळे या स्मार्टफोन्सना युजर्सचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 2024 मध्ये लाँच झालेल्या या स्मार्टफोन्सनंतर आता लोकं 2025 मध्ये लाँच होणाऱ्या स्मार्टफोन्सची वाट बघत आहेत.
Year Ender 2024: यावर्षी मोबाईल युजर्ससाठी बदलले अनेक नियम, वाचा संपूर्ण यादी
लोकांच्या नजरा पुढील वर्षी लाँच होणाऱ्या स्मार्टफोन्सकडे लागल्या आहेत. 2025 मध्ये नवीन हाय-एंड स्मार्टफोन पुन्हा बाजारात येत आहेत. यामध्ये वनप्लस, सॅमसंगपासून स्वस्त आयफोनपर्यंत अनेक ब्रँड्सचा समावेश आहे. चला, 2025 मध्ये कोणते स्मार्टफोन लाँच होणार आहेत, यावर एक नजर टाकूया. (फोटो सौजन्य – pinterest)
टेक कंपनी OnePlus ने जाहीर केलं आहे की, कंपनीचा पुढील फ्लॅगशिप फोन OnePlus 13 पुढील वर्षी म्हणजेच 13 जानेवारी 2025 ला लाँच होईल. हा स्मार्टफोन नवीनतम स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपने सुसज्ज आहे. यात पाणी आणि धूळ प्रतिरोधासाठी IP69 रेटिंग देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन ग्रीन-लाइन-फ्री डिस्प्ले टेक्नोलॉजीने सुसज्ज आहे. हा स्मार्टफोन Android 15-आधारित OxygenOS 15 वर चालेल. या स्मार्टफोनमध्ये हॅसलब्लॅड ट्यूनिंगसह कॅमेरा सेटअप असणार आहे.
Samsung चा नवीन फ्लॅगशिप फोन जानेवारी 2025 मध्ये लाँच केला जाऊ शकतो. लीक्स नुसार, त्याच्या आधीच्या मॉडेल सारखे दिसले तरी, या फोनमध्ये अनेक मस्त फीचर्स असू शकतात. ज्यामुळे फोन वापरण्याचा अनुभव अधिक मजेदार होणार आहे. हा Android 15-आधारित OneUI 7 सह येणारा पहिला स्मार्टफोन असेल.
Asus ROG Phone 9 आधीच जागतिक स्तरावर लाँच करण्यात आला आहे. 2025 मध्ये ही स्मार्टफोन सिरीज भारतीय बाजारात लाँच केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. हा फोन खास गेमर्ससाठी तयार करण्यात आला आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिप आणि उत्कृष्ट कार्यप्रदर्शन राखण्यासाठी चांगली कूलिंग सिस्टम असेल. तसेच, वेगवान 165Hz डिस्प्ले आणि 5,800 mAh बॅटरी मोबाइल गेमर्ससाठी एक उत्तम पर्याय असू शकतो. हा स्मार्टफोन Snapdragon 8 Elite सह सुसज्ज असेल.
2025 च्या पहिल्या तिमाहीत Xiaomi 15 लाँच होण्याची अपेक्षा आहे. इतर हाय-एंड Android स्मार्टफोनच्या तुलनेत, Xiaomi 15 आकाराने अधिक कॉम्पॅक्ट असेल. यात 6.36-इंच स्क्रीन आणि लीका ट्यूनिंगसह ट्रीपल कॅमेरा सेटअप असेल. छोट्या आकाराच्या या फोनमध्ये 5,400 mAh ची मोठी बॅटरी असण्याची शक्यता आहे.
Apple चा सर्वात परवडणारा iPhone SE 4 देखील 2025 मध्ये लाँच होणार आहे. त्यात Apple Intelligence सपोर्ट असणार आहे. लीकनुसार, iPhone SE 4 मध्ये iPhone 14 आणि iPhone 15 सारखे काही खास फीचर्स मिळू शकतात.