Realme Price Drop: Realme च्या या प्रीमियम फोनवर तब्बल 10,000 रुपयांचं डिस्काऊंट! अशा प्रकारे घ्या सुवर्णसंधीचा फायदा
Realme GT 6T: 2024 मध्ये टेक कंपनी Realme ने त्यांचा Realme GT 6T स्मार्टफोन लाँच केला होता. मे महिन्यात हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला. काही दिवसांतच या स्मार्टफोनने सर्वत्र धुमाकूळ घातला. Realme GT 6T हा टॉप रेटेड स्मार्टफोन ठरला. हा स्मार्टफोन आता तुम्हाला कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. Realme च्या स्मार्टफोनवर तुम्हाला तब्बल 10 हजार रुपयांचं डिस्काऊंट मिळणार आहे. Realme GT 6T अॅमेझॉनवर डिस्काऊंट ऑफरसह खरेदी करण्याची संधी आहे. हा फोन यावर्षी मे महिन्यात लाँच करण्यात आला होता. चला तर मग फोनवरील डिल्स आणि ऑफर्सबद्दल जाणून घेऊया.
Realme 14 Pro Series 5G: लवकरच लाँच होणार Realme ची नवीन सिरीज, पाणी आणि धुळीपासून राहणार सेफ
Realme GT 6T भारतात चार व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. Realme GT 6T स्मार्टफोनचे 8GB + 128GB मॉडेल 30,999 रुपये, 8GB + 256GB मॉडेल 32,999 रुपये, 12GB + 256GB मॉडेल 35,999 रुपये आणि 12GB + 512GB मॉडेल 39,999 रुपयांना लाँच करण्यात आलं. यापैकी, अॅमेझॉनवर 512GB मॉडेलवर 10,000 रुपये डिस्काऊंट उपलब्ध आहे, ज्यामुळे फोनची किंमत 29,998 रुपये झाली आहे. (फोटो सौजन्य – X)
त्याचप्रमाणे, 8GB + 128GB व्हेरिअंटवर 7,000 रुपयांचे डिस्काउंट कूपन आहे, जे किंमत 23,998 रुपयांपर्यंत कमी करू शकते. तर, 8GB + 256GB आणि 12GB + 256GB साठी, अॅमेझॉनवर सर्व बँक कार्डांसह 6,000 रुपयांची झटपट सूट उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, तुम्ही Amazon ICICI बँकेचे क्रेडिट होल्डर असल्यास, तुम्हाला 5 टक्के कॅशबॅक मिळेल. जर तुम्ही फोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. Realme चा हा फोन पर्पल, फ्लूइड सिल्वर आणि रेजर ग्रीन कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
डिस्प्ले – Realme GT 6T मध्ये 2,789 x 1,264 पिक्सेल आणि 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.78-इंच LTPO वक्र AMOLED पॅनेल आहे. हा Realme फोन 2500Hz इन्स्टंट टच सॅम्पलिंग रेट, 2160Hz PWM dimming आणि 6000 nits पीक ब्राइटनेस सह येतो. फोनला फ्रंटला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 संरक्षण आहे. तसेच, हे धूळ आणि स्प्लॅश प्रतिरोधकतेसाठी IP65 रेटिंगसह येते.
प्रोसेसर – तसेच, स्नॅपड्रॅगन 7+ Gen 3 प्रोसेसर या फोनमध्ये उपलब्ध आहे.
कॅमेरा – फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. या सेटअपमध्ये 50MP Sony LYT 600 प्राथमिक कॅमेरा आणि 8MP अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आहे. फोनच्या पुढील बाजूस सेल्फीसाठी 32MP कॅमेरा देण्यात आला आहे.
बॅटरी – Realme GT 6T मध्ये बॅटरी 5,500mAh आहे आणि 120W SuperVOOC फास्ट चार्जिंग समर्थित आहे. हे Android 14 आधारित कस्टम OS वर चालते.