महागडा TV खरेदी करण्याची कटकट कशाला? या Android प्रोजेक्टरवर मिळेल 100-इंच स्क्रीनची मजा, किंमत केवळ इतकी
डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच टेक कंपनी TecSox ने 100W चा मोबाईल चार्जर लाँच केला होता. यानंतर आता कंपनी येत्या काही दिवसांतच नवीन प्रोजेक्टर लाँच करणार आहे. TecSox LUMA LED या नावाने कंपनीचा नवीन Android प्रोजेक्टर लाँच केला जाणार आहे. आपल्या घरात मोठा टिव्ही असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण टिव्ही जेवढा मोठा असेल तेवढी त्याची किंमत जास्त असते. अशा परिस्थितीत जास्त किंमतीमुळे अनेक लोकं मोठ्या टिव्हीची खरेदी करणं टाळतात. पण आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. कारण तुम्ही आता अगदी कमी किंमतीत मोठ्या टिव्हीचा आनंद घेऊ शकणार आहात.
New Year 2025: नवीन वर्षासाठी व्हॉट्सॲप घेऊन आलाय खास फीचर्स, कॉलिंग होणार आणखी मजेदार
TecSox लवकरच TecSox LUMA LED हा नवीन Android प्रोजेक्टर लाँच करणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या प्रोजेक्टरची रचना घरातील मनोरंजन आणि व्यावसायिक सादरीकरणे वाढविण्यासाठी केली गेली आहे. या प्रोजेक्टरमध्ये अनेक नवीन वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे. ही सर्व वैशिष्ट्य अगदी परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध होणार आहेत. चला तर मग TecSox LUMA LED प्रोजेक्टरचे फीचर्स आणि किंमत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – एक्स)
TecSox LUMA LED प्रोजेक्टर कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर पांढऱ्या रंगाच्या पर्यायात उपलब्ध आहे. या प्रोजेक्टरची किंमत 3,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या प्रोजेक्टरसोबत ग्राहकांना 6 महिन्यांची वॉरंटी देखील मिळणार आहे. कॉम्पॅक्ट आणि लाइटवेट असा हा TecSox LUMA प्रोजेक्टर आउटडोर मूवी नाइट्स, ट्र्रॅवल आणि प्रजेंटेशन्स या सर्वांसाठी आदर्श आहे. यात डिस्टॉर्शन फ्री व्यूइंगसाठी ऑटो हॉरिजॉन्टल कीस्टोन आणि 4-पॉइंट करेक्शनचा फीचर आहे. याची 180° रोटेबल डिजाइन बिना इमेज क्वालिटी खराब करता वेगवेगळे प्रोजेक्शन अलाउ करते.
200 ANSI lumens सह 4K आणि 1080P रिझोल्यूशन (नेटिव्ह 720p सपोर्ट) ला सपोर्ट करत, LUMA 100 इंच पर्यंत शार्प व्हिज्युअल ऑफर करते. तसेच, यात बिल्ट-इन Android 11 सिस्टम आहे, ज्यामुळे त्यासोबत कोणत्याही बाह्य उपकरणाची गरज भासणार नाही. हे वापरकर्त्यांना ॲप्स डाउनलोड करण्यास, कंटेंट स्ट्रीम करण्यास आणि Android फीचर्समध्ये थेट एक्सेस करण्यास अनुमती देते.
वेगवान, बफर-फ्री स्ट्रीमिंगसाठी WiFi 6 आणि अखंड डिव्हाइस कनेक्टिव्हिटीसाठी TecSox LUMA ब्लूटूथ v5.0 सह सुसज्ज आहे. LUMA एक इमर्सिव्ह ऑडिओ-व्हिज्युअल अनुभव सुनिश्चित करते, असे कंपनीने म्हटले आहे.